कोरोनाचा असाही इफेक्ट; ठाण्यातील हजारो जण घरातून बेपत्ता

Rohit Dhamnaskar

Rohit Dhamnaskar |

Updated on: Jan 30, 2021 | 10:25 PM

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून 2020 या वर्षामध्ये एकूण 1364 पुरुष आणि 1870 महिला बेपत्ता झाल्या आहेत. | missing complaint increases in Thane

कोरोनाचा असाही इफेक्ट; ठाण्यातील हजारो जण घरातून बेपत्ता

ठाणे: कोरोनाच्या आपत्तीमुळे गेल्या वर्षभरात लोकांच्या जीवनात मोठे बदल झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कामधंदे बंद झालेत. या सगळ्यामुळे साहजिकत हे लोक प्रचंड निराशही झाले आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्यात याच नैराश्यातून अनेकांनी घर सोडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यापैकी अनेकजण आजही बेपत्ता आहेत. (Missing complaints increases in Thane after Coronavirus pandamic)

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून 2020 या वर्षामध्ये एकूण 1364 पुरुष आणि 1870 महिला बेपत्ता झाल्या आहेत. यापैकी 315 पुरुष आणि 302 महिला सापडल्या आहेत. तसेच 169 पैकी 154 मुले आणइ 451 पैकी 396 मुलींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. एकूण बेपत्ता व्यक्तींची संख्या ३२३४ असून यावरून दिवसाला सरासरी सुमारे पाच महिला आणि तीन पुरुष बेपत्ता होत असल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता होण्यामागची कारणे वेगवेगळी असल्याचे सांगितली जात असली तरी, मात्र कोरोना हे मुख्य कारण समोर येत आहे, अशी माहिती ठाणे पोलीस सहायक आयुक्त सुनील बाजारे यांनी दिली.

कोरोना संकटामुळे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम

कोरोनाच्या संकटामुळे नोकरीधंदे बंद पडल्याने आणि आर्थिक संकट ओढावल्याने अनेकजण मानसिकरित्या खचले आहेत. त्यामुळे अनेक लोक घर सोडून गेले आहेत. एखादी महिला किंवा पुरुष बेपत्ता झाल्यास त्यांचे नातेवाईक पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार देतात. त्यानंतर पोलिसांकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जातो. रेल्वे स्टेशन, बस स्थानक तसेच अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बेपत्ता व्यक्तींचे फोटो चिकटवले जातात. तसेच संपर्क नंबरही दिलेले असतात. जेणेकरून व्यक्ती दिसल्यास लोक फोन करून माहिती देतील.

परंतु अनेक प्रकरणांमध्ये बेपत्ता व्यक्तीचा वर्षानुवर्षे शोध लागत नाही. नातेवाईकही शोध घेऊन थकतात. तसेच अल्पवयीन मुलगी किंवा मुलगा अचानक बेपत्ता झाल्यास पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. अशा प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीसही वेगाने तपास करत मुलांचा शोध घेतात. लोक अशाप्रकारे घराबाहेर पडण्याची कारणे अनेक आहेत. त्यात प्रेमसबंध ,घरातील भांडण ,कौटुंबिक वाद .. व अजून एक कारण समोर आले आहे ते म्हणजे करोनामुळे झालेला मानसिक त्रास, असे पोलिसांनी सांगितले.

ठाणे पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटकडून विशेषकरून हरवलेल्या, बेपत्ता तसेच अपहरण झालेल्या मुलांना शोधून काढण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली जात आहे. आतापर्यंत अनेक मुलांचा शोध घेऊन पालकांशी भेट घडवून आणली गेली.

कोणत्या कारणामुळे किती बेपत्ता

घरात काहीही न सांगता निघून गेलेले – 1508

प्रेमप्रकरण- 183

कौटुंबिक वाद- 63

इतर कारणे- 1480

(Missing complaints increases in Thane after Coronavirus pandamic)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI