सरकार म्हणत 2 डोसला लोकल प्रवासाची परवानगी, मात्र लसींचा तुटवडा असल्यानं नालासोऱ्यात रात्रभर रांगा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर वसई विरार नालासोपाऱ्यात लसीकरण केंद्रावर आदल्या दिवशीच्या दुपारी 3 वाजल्यापासूनच रांगा लागायला सुरुवात झाली.

सरकार म्हणत 2 डोसला लोकल प्रवासाची परवानगी, मात्र लसींचा तुटवडा असल्यानं नालासोऱ्यात रात्रभर रांगा
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 8:25 AM

पालघर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर वसई विरार नालासोपाऱ्यात लसीकरण केंद्रावर आदल्या दिवशीच्या दुपारी 3 वाजल्यापासूनच रांगा लागायला सुरुवात झाली. वसई विरार महापालिकेला शासनाकडून 4 हजार 850 कोव्हिशिल्डच्या लस उपलब्ध झाल्याने 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 17 लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस मिळणार आहे. त्यासाठी दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्रभर महिला, पुरुष रांगेत बसले आहेत.

लसीकरणासाठी रात्रभर लोक कसे जागरण करत आहेत या वास्तवाचा नालासोपारा पूर्व नगीनदासपाडा पाडा येथील महापालिकेच्या रुग्णालयासमोरून रात्री 1 वाजता घेतलेला टीव्ही 9 मराठीचा हा खास आढावा.

वसई विरार महापालिकेच्या 17 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. नालासोपारा पूर्वकडील तुलिंज हॉस्पिटल हे सर्वात मोठे आहे. याठिकाणी 300 लस सकाळी 8 वाजल्यापासून नागरिकांना मिळणार आहेत. त्यातील 150 पहिला डोससाठी तर 150 दुसरा डोसवाल्या नागरिकांसाठी आहेत.

लसीकरण केंद्रात थोड्या लसी उपलब्ध झाल्यानंतर नागरिक आपल्याला लस मिळावी म्हणून अन्नपाणी, मुलं बाळ घरात सोडून लसीकरण केंद्राच्या समोर रांगेत बसले. 12 ते 13 तास रात्रभर रांगेत बसूनही डोस मिळेल की नाही याची शाश्वती नाही. सरकारने डोस घ्या सांगितलं, पण रांगेत थांबूनही लस मिळत नाही. मग नागरिकांनी काय करावं? अशा संतप्त प्रतिक्रियाही नागरिक देत आहेत. लसीकरणासाठी महापालिकेच्या तुलिंज रुग्णालयासमोर रातभर बसलेल्या नागरिकांकडून लसींच्या तुटवड्यावर संताप व्यक्त केला जातोय.

हेही वाचा :

नाशिकमध्ये लस घेण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांगा, 3 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शहरात लसीचा साठा

औरंगाबाद मनपाचा मोठा निर्णय, आता आरोग्य पथक घरोघरी जाऊन लसीकरण करणार

“कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय, संभाव्य धोका पाहता लसीकरणाचा वेग वाढवा”

व्हिडीओ पाहा :

Queues for Corona vaccination dose from midnight in Nalasopara

Non Stop LIVE Update
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.