शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडूनच युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, वरुण सरदेसाईंच्या दौऱ्यादरम्यान शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची मुलाखती घेतल्यानंतर कल्याण पूर्वेतील युवासेना पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडूनच युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, वरुण सरदेसाईंच्या दौऱ्यादरम्यान शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
कल्याण पूर्वेचे युवासेना पदाधिकारी संजय मोरे
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 12:53 AM

कल्याण (ठाणे) : युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची मुलाखती घेतल्यानंतर कल्याण पूर्वेतील युवासेना पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ही मारहाण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच केली असल्याचे आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे चिन्हं आहेत. या प्रकरणाची चौकशी करुन या संदर्भात कारवाई करणार असल्याचे वरुण सरदेसाई यांनी सांगितले आहे.

वरुण सरदेसाईंनी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या

युवा युवासेना सचिव वरुण सरदेसाई गेल्या दोन दिवसांपासून कल्याणमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान सरदेसाई यांनी युवासेनेत पदांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची मुलखती घेतल्या. शनिवारी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात शिवसेना शाखेत सरदेसाई यांनी युवासेना नेता दीपेश म्हात्रे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांचा मुलाखती घेतल्या.

संजय मोरेंना मारहाण

कल्याण पूर्वेचे युवासेना पदाधिकारी संजय मोरे हे वरुण सरदेसाई आणि दीपेश मात्रे यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीनंतर संजय मोरे हे आपल्या घरी जात असताना शिवसेना शाखेच्या पाठीमागे ते पायी जात असताना त्यांना मारहाण करण्यात आली. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप संजय मोरे यांनी केला आहे.

मोरेंची पक्षश्रेष्ठींकडे न्यायाची हाक

या मारहाणीत त्यांच्या कानाला आणि पोटात दुखापत झाली आहे. मोरे यांनी या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्यांना तक्रार अर्ज दाखल करा, असा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी तक्रार अर्ज दाखल करत न्यायाची मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडेही न्यायाची मागणी केली आहे.

महेश गायकवाडांकडून कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार

या प्रकरणानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कॅमेऱ्यावर काही बोलण्यास नकार दिला. दुसरीकडे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल. ती कारवाई होईल तेव्हा होईल. पण या प्रकरणामुळे कल्याण पूर्वेत शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

वरुण सरदेसाई यांचं मनसेच्या अमित ठाकरेंना उत्तर

दरम्यान, वरुण सरदेसाई यांच्या दौऱ्याआधी मनसे नेते अमित ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली शहराचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांवरुन शिवेसेनेवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. “त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा त्यांना अधिकार आहे. गेली पंचवीस वर्ष कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला. हा विश्वास खरा करण्यासाठी शिवसेना नेते-पदाधिकारी दिवस-रात्र काम करत आहेत. स्थानिक पातळीवर कोण काम करतं ते नागरिकांना माहिती आहे. येत्या निवडणुकीत नागरीक पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील”, अशा शब्दात वरुण सरदेसाई यांनी अमित ठाकरे यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं होतं.

हेही वाचा : स्थानिक पातळीवर कोण काम करतंय ते नागरिकांना माहिती, अमित ठाकरेंच्या टीकेला वरुण सरदेसाई यांचं उत्तर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.