AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पोलिसांकरिता विशेष घरं, राज्य सरकारचा विचार : एकनाथ शिंदे

फक्त पोलिसांकरिता विशेष घरं बांधण्याचा राज्य सरकारचा विचार आहे,” असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (state government houses police Eknath Shinde)

आता पोलिसांकरिता विशेष घरं, राज्य सरकारचा विचार : एकनाथ शिंदे
महाराष्ट्र पोलीस
| Updated on: Feb 17, 2021 | 11:44 PM
Share

ठाणे :म्हाडाच्या घरामध्ये पोलिसांकरिता काही घरं आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलिसांना विशेष कोटा दिला जाईल. तसेच फक्त पोलिसांकरिता विशेष घरं बांधण्याचा राज्य सरकारचा विचार आहे,” असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. ते ठाण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. (state government is planning to build houses for police said Eknath Shinde)

फक्त पोलिसांसाठी विशेष घरं

यावेळी बोलताना, “राज्यात म्हाडा अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये पोलिसांसाठी काही घरं आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. तसेच पोलिसांकरिता विशेष घरं बांधण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. कोरोनामुळे अनेक प्रकल्प आणि योजना रखडल्या होत्या. तरी या योजनांना आता आर्थिक पाठबळ देऊन पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पोलीस वर्षाचे बारा महिने आणि दिवसाचे चोवीस तास आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यांना आपण सहकार्य केले पाहिजे,” असे ते म्हणाले.

मुंबईत 300 घरांची लॉटरी

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते 11 फेब्रुवारी रोजी मुंबईतील बीडीडी चाळीतील 300 रहिवाशांसाठी म्हाडाची लॉटरी यांच्या हस्ते काढण्यात आली होती. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते. बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी काढलेल्या लॉटरीबद्दल आदित्य ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गृहनिर्माण खात्याचं कौतुक केलं होतं.

दरम्यान, महिनाभरापासून ठाण्याच्या वाहतूक विभागातर्फे रस्ते सुरक्षा अभियान राबविले गेले. या अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बुधवारी या कार्यक्रमाची सांगता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झाली.

इतर बातम्या :

MHADA lottery 2020-2021 : म्हाडाच्या घरांची लॉटरी, विजेत्यांची नावं उद्या जाहीर होणार

आदित्य ठाकरे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांच्या खात्याने करुन दाखवलं!

पोलिसांच्या वेशात ज्वेलर्सवर दरोडा, पोलीस कोठडीतून दरोडेखोरांचं पलायन, पोलिसांसमोर आव्हान

(state government is planning to build houses for police said Eknath Shinde)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...