AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MHADA lottery 2020-2021 : म्हाडाच्या घरांची लॉटरी, विजेत्यांची नावं उद्या जाहीर होणार

MHADA lottery 2020-2021 : म्हाडाची मुंबईची लॉटरी (MHADA lottery Mumbai) उद्या गुरुवारी 11 फेब्रुवारीला दुपारी जाहीर होणार आहे.

MHADA lottery 2020-2021 : म्हाडाच्या घरांची लॉटरी, विजेत्यांची नावं उद्या जाहीर होणार
Mhada
| Updated on: Feb 11, 2021 | 2:49 PM
Share

मुंबई : म्हाडाची मुंबईची लॉटरी (MHADA lottery Mumbai) उद्या गुरुवारी 11 फेब्रुवारीला दुपारी जाहीर होणार आहे. बीडीडी चाळीतील रहिवाश्यांसाठी ही लॉटरी सोडत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील 300 घरांची लॉटरी निघणार आहे. दुपारी 12.30 वाजता ही लॉटरी निघेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

विरार येथील पोलिसांच्या घरांची लॉटरी आज काढण्यात आली. कोणी शिरढोण इथे घराचीही लॉटरी काढणार आहोत. ज्या पोलिसांना घरं हवी आहेत त्यांनी कोकण म्हाडाशी संपर्क साधावा. पोलीस, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना घरं उपलब्ध करून देणार, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

कोळीवाड्यात SRA योजना नाही

दरम्यान, कोळीवाडे ही गावठाणे आहेत. गरजेनुसार पूर्व परंपरेने ही घरं बांधली आहेत. जरी ही बैठी घरं असली तरी तिथे SRA योजना लागू होणार नाही. कोळीवाड्यांना FSI देऊन त्यांचा विकास व्हावा असा प्रयत्न आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

7500 घरांसाठी सोडत

दरम्यान  लवकरच म्हाडा कोकण मंडळात अर्थात ठाणे, कल्याण परिसरात तब्बल 7500 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये म्हाडा ही लॉटरी जाहीर करणार आहे.

घरं कुठे?

म्हाडाची घरं ठाण्यात भंडारली आणि गोटेघर इथं आहेत. तिकडे कल्याणमध्ये शिरडोने कोणी इथल्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येईल. ही लॉटरीची प्रक्रिया मार्चमध्ये सुरु होणं अपेक्षित आहे. ही सोडत मे मध्ये जाहीर होऊ शकते.

म्हाडा म्हणजे काय?

म्हाडा अर्थात ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण’ (Maharashtra Housing and Area Development Authority) ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे. सरकार या अंतर्गत वेगवेगळ्या समाज घटकांसाठी घरं बांधते. म्हाडा अंतर्गत आतापर्यंत राज्यात लाखो घरं बांधून झाली आहेत. (MHADA Chairman to be changed)

संबंधित बातम्या 

 मुंबईतही म्हाडाची लॉटरी निघणार – गृहनिर्माण मंत्री आव्हाडांची घोषणा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.