AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! कर्जमाफीची तारीख समोर, CM फडणवीसांची मोठी घोषणा

Farmer Loan Waiver : लवकरच सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची थेट तारीख सांगितली आहे.

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!  कर्जमाफीची तारीख समोर, CM फडणवीसांची मोठी घोषणा
CM Fadnavis Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 17, 2026 | 5:54 PM
Share

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. आता लवकरच सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची थेट तारीख सांगितली आहे. आज पुण्यातील कृषी महाविद्यालयात सिंचन नगर मैदानात पुणे ॲग्री हॅकॅथॉन 2026 पारितोषिक वितरण व समारोप समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी बाबत माहिती दिलेली आहे. तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही याबाबत भाष्य केले आहे.

CM फडणवीसांनी सांगितली कर्जमाफीची तारीख

काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी जून महिन्यात सरकार कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आता याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आज पुण्यातील कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, यावेळी फडणवीसांनी म्हटले की, ‘कर्जमाफीच्या संदर्भात आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे, या संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे, काही जिल्ह्यांची माहिती आम्ही मागवली आहे, ती आल्यानंतर 30 जून पूर्वी कर्जमाफी आम्ही करणार आहोत. ‘

शेतकरी समाधानी असावा ही सरकारची भूमिका

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले की, ‘अजित दादा पवार आपल्यामध्ये नाहीत, शेतीत बांधावर जाणार नेता, धारा काढणारा नेता आपल्यात राहिला नाही पण त्यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत आहोत. शेतमालासा चांगला बाजारभाव कसा मिळेल हे आम्ही पाहत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कायमच मदत केली आहे. शेतकरी सुखी समाधानी राहिला पाहिजे ही मुख्यमंत्री यांची भूमिका आहे.

सरकारने शेतकऱ्यांना वीज सवलत दिली

पुढे बोलताना भरणे यांनी म्हटले की, पूर्वीचे अनुदान वाटप आणि आताचे अनुदान वाटप यात खूप फरक आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांनी शेतकऱ्यांना वीज सवलत दिली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्तवाचे निर्णय घेणारी ही मंडळी आहे. शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत राज्य सरकारने केली. एआयचे धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. लवकर कर्ज माफीचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री घेतील. खताच्या पुरवठ्याबाबत थोडी अडचण आहे, तीही सोडवली जाईल.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?