AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार, कसा असेल कार्यक्रम?; वाचा…

Balasaheb Thorat on Congress Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात कधी प्रवेश करणार? हा सगळा कार्यक्रम कसा असेल?; शिंदे गटातील नेत्यांच्या हमरीतुमरीवर काँग्रेसची प्रतिक्रिया; म्हणाले, यांनी सरकारची प्रतिमा पूर्णपणे... वाचा सविस्तर बातमी...

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार, कसा असेल कार्यक्रम?; वाचा...
| Updated on: Mar 02, 2024 | 10:57 AM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | 02 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. हा सगळा कार्यक्रम कसा असेल? याबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे. राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे. 12 तारखेला गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि आपल्या या मार्गाने जे वाडा मार्गाने ते आपल्याकडे येते आहे. 16 तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामातच 16 तारखेला ते संवाद करतील. ठाण्यात जांभळी नाका येथे सकाळी राहुल गांधी याची 16 तारखेला स्टेज नसणारी सभा होणार आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“न्याय मागणारी न्याय यात्रा”

भारत जोडो न्याय यात्रा ही मुलुंडला थांबणार दादर चैत्यभूमी या ठिकाणी समारोप असणार आहे. 17 तारखेला सार्वत्रिक मीटिंग आघाडी म्हणून मुंबईला घेण्यात येणार आहे. देशामधील ज्या पद्धतीचे वातावरण सुरू आहे. त्यासाठी ही विशेष यात्रा आहे. 2014 पासून मोदी कारभार करत आहे, देशापुढे अनेक प्रश्न आहेत. लोकशाहीवर आघात होत आहे. या सर्व गोष्टीवरती न्याय मागणारी न्याय यात्रा आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

मित्र पक्षांनाही आमंत्रण- थोरात

ज्या ठिकाणी अडचणी आहेत. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. मोदी यांच्या अनेक सभा सुरू आहे. मात्र मणिपूरमध्ये जाऊ शकले नाही. राजकारण आणि सत्ता डोळ्यासमोर ठेवून सर्व भारतीय जनता पक्षाच कार्यपद्धती दिसत आहे. रॅलीमध्ये आणि पब्लिक मिटिंगसाठी मित्र पक्षांना आम्ही आमंत्रण दिलं आहे, असं थोरात म्हणाले. देश हा सर्वांचा आहे. लोकशाहीमध्ये संवाद साधण्याचा राहुल गांधी ठाण्यात साधणार आहे. तरुण पिढी मोठ्या संख्येने येणार आहे, असंही ते म्हणाले.

संवाद सभा होणार

16 तारखेला राहुल गांधी ठाण्यातील जांभळी नाका या ठिकाणी संवाद साधणार आहेत. भिवंडीतुन सुरुवात होणार आहे. मणिपूर वाईट इतिहास आहे. महागाई वाढलेली आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये दंगल सुरू आहे. हे आम्हाला दिसत आहे. देशात राज्यात दंगल सुरू आहे. त्यासाठीच न्याय यात्रा हे काम करत आहे. महागाई च्या विरोधात ही न्यायात्र काम करत आहे. लोकशाही टिकावी यासाठी ही न्याय यात्रा आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.