घड्याळ चिन्हावरून जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला; म्हणाले, यांनी…

Jitendra Awhad on NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादी पक्ष- घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे; शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांचा टोला, जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले? घड्याळ चिन्हावरून टोला लगावताना जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

घड्याळ चिन्हावरून जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला; म्हणाले, यांनी...
जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 3:50 PM

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | ठाणे 03 मार्च 2024 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर त्यांनी दावा सांगितला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने याबाबतचा निर्णय दिला. आता आज ठाण्यात बोलताना त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा- मुंब्रा मतदार संघात एका कार्यक्रमात बोलताना घड्याळ या निशाणीवरून त्यांनी अजित पवार गटाला चोर म्हणत टीका केली.

अजित पवार गटाला टोला

आमचं घड्याळ चोरलं गेलं आहे. आता आमची निशाणी तुतारी आहे. लक्षात ठेवा कोण एक धोकेबाज या विभागात कामच केलं नाही. तो ही घड्याळ घेऊन प्रचार करेल. मात्र तुम्ही हा नका विचार करू की ही जितेंद्र आव्हाड यांची घडी आहे. ही माझा हातातून चोरली गेलेली घडी आहे. तुम्ही त्या घड्याळाची वाट पाहू नका. त्या घडीचा वेळ बदललेला आहे. त्या घड्याळाची वेळ आता 4-20 आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

आता तुतारीकडे लक्ष द्या- आव्हाड

आधी घड्याळाची वेळ 10-10 होती. आता 4-20 झाला आहे चोरट्यांनी पाकीट मारला आणि माझी घडी काढून घेतली. त्यानंतर माझी निशाणी आता तुतारी आहे.. तुतारी ही निशाणी आपली आहे. आतापासून लक्षात ठेवा की जितेंद्र आव्हाड यांची निशाणी म्हणजे तुतारी… नागरिकांनी एकच आवाज करत तुतारी शब्द उच्चार करत एकच घोषणा केली. लग्नात देखील तुतारी वाजवली जाते, असं म्हणत आव्हाडांनी तुतारीकडे लक्ष वेधत तुतारी वाजवायला सांगितलं.

“यांनी घड्याळ चोरलं!”

युद्धात देखील सैनिक जातात तेव्हा देखील तुतारी वाजवली जाते. राम जेव्हा वनवासात गेले होते त्या दरम्यान आणि अयोध्येत परत आले तेव्हा देखील तुतारी वाजवली गेली होती. हे चोर आमची घडी घेऊन गेले. पाकीट मार हे सर्व आहेत. आता घडीला वोट द्या, म्हणून तुमच्याजवळ येतील. पण त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. मतदान करताना दोनदा विचार करा, असं आव्हाड म्हणाले. तुम्ही जितेंद्र आव्हाड यांची घडी चोरली आता आम्ही त्या चोरांना वोट देणार नाही. आता कोणाला वोट देणार? तुतारीला…, असं आव्हाड म्हणाले.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.