AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माकडांच्या संशयास्पद मृत्यूमुळे स्थानिक…, उष्माघात की विषप्रयोग?

माथेरानला अधिक पर्यटक पाहायला मिळतात, तिथं माकडं सुध्दा अधिक आहेत. तिथं येणाऱ्या पर्यटकांकडून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं खायला मिळतं. त्यामुळे त्यांनी तिथचं ठिय्या मांडला आहे.

माकडांच्या संशयास्पद मृत्यूमुळे स्थानिक..., उष्माघात की विषप्रयोग?
monkey deathImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 03, 2023 | 10:52 AM
Share

निनाद करमरकर, माथेरान : माथेरानच्या (matheran) आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या माकडांचा सकाळी तडफडून मृत्यू झाल्याचं निदर्शनास आल्यावर स्थानिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. या माकडांचा मृत्यू (moncky death) उष्माघाताने झाला? की त्यांच्यावर कुणी विषप्रयोग केला? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पर्यटक तिथं गेल्यानंतर माकडांना खायला देतात, तर कधी त्यांचे फोटो काढतात. काही जणांनी माकडासोबत रिल्स तयार केले आहे. सोशल मीडियावर तिथल्या माकडांचे अनेक व्हायरल (viral video) रिल्स सुध्दा तुम्हाला पाहायला मिळतील. रात्रीच्यावेळी विषप्रयोग केल्याचा संशय तिथल्या स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

उष्माघात की विषप्रयोग?

माथेरान रेल्वे स्टेशन विभागात सकाळच्या दरम्यान सात ते आठ लहान मोठी माकडे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. एकूण आठ माकडांपैकी दोन माकडे तडफडत होती, तर उर्वरीत सहा माकडे अगोदरच मृत्यूमुखी पडलेली होती. तिथल्या स्थानिकांनी त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही इलाज होऊ शकला नाही. रात्रीच्यावेळी या माकडांवर कुणी विषप्रयोग तर केला नाही ना ? की अन्य काही कारणांमुळे यांचा मृत्यू झाला आहे ? अशा चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. मृत्यू पावलेल्या माकडांना वनखात्याच्या अधिकारी वर्गाने शवविच्छेदन करण्यासाठी नेले असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर ह्या माकडांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला आहे, हे स्पष्ट होईल अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते, माथेरान, चंद्रकांत सुतार यांनी दिली.

त्यांचं शवविच्छेदन केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उजेडात येईल

ज्या माकडाचा मृत्यू झाला आहे, त्या माकडांचे मृतदेह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांचं शवविच्छेदन केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उजेडात येईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. हे प्रकरण सगळीकडं व्हायरल झालं आहे. अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्याचबरोबर दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.