AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराबाहेर पडू नका, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहा; ठाणे पालिका आयुक्तांचे आवाहन

ठाण्यात कालपासून (9 जून) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले (TMC Vipin Sharma appeals to citizens over heavy rain)

घराबाहेर पडू नका, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहा; ठाणे पालिका आयुक्तांचे आवाहन
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 7:31 PM
Share

ठाणे : ठाण्यात कालपासून (9 जून) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. एका ठिकाणी इमारतीची संरक्षण भिंत कोसळली. यामुळे सोसायटीत उभ्या असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत (TMC Vipin Sharma appeals to citizens over heavy rain).

महापौर आणि आयुक्तांचं नागरिकांना आवाहन

ठाणे शहरात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या तीन दिवसात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहावे तसेच आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्किंग करा, असं आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे (TMC Vipin Sharma appeals to citizens over heavy rain).

ठाण्याचे महापौर आणि आयुक्तांच्या नेमक्या सूचना काय?

1) नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. 2) पाऊस सुरु असताना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी थांबावे. 3) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास विजेचे खांब आणि झाडाखाली उभे राहू नये तसेच आपली वाहने 4) रस्त्यावर झाडाखाली उभी न करता सुरक्षित ठिकाणी पार्किंग करावीत. 5) पाऊस सुरु असतानास झाडाखाली असताना किंवा रस्त्यावर चालताना मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री नंबर जारी

दरम्यान, ठाणे महापालिकेच्यावतीने मान्सून कालावधीत आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून प्रभाग समितीनिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री – १८०० २२२ १०८ आणि हेल्पलाईन – ०२२ २५३७१०१० या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा : बाळासाहेब की दि. बा. पाटील?, राज्य सरकारचं ठरलं, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबद्दल मोठा निर्णय!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.