Plastic Action : प्लास्टिक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई

सदर मोहिमेतंर्गत महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लास्टिक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण 123 किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून 52 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Plastic Action : प्लास्टिक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई
प्लास्टिक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 22, 2022 | 12:58 AM

ठाणे : महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टिक (Plastic), थर्माकोल (Thermocol) सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी अकस्मात धडक कारवाई (Action) करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदी संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये सुमारे 123 किलो प्लास्टिक जप्त करून 52 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा 2006 अंतर्गत महाराष्ट्र शासनद्वारे प्लास्टिक व थर्माकोल इत्यादीपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तुंवर बंदी घालण्यात आली आहे. तथापि ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदर बंदी मोडून प्लास्टिक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे.

प्लास्टिक जप्त करून 52 हजार 500 रुपये दंड वसूल

सदर मोहिमेतंर्गत महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लास्टिक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण 123 किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून 52 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, उप आयुक्त मनीष जोशी व आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेच्या 9 प्रभाग समितीमधील स्वच्छता निरीक्षक तसेच विभागातील कर्मचारी आदींनी केली.

याआधीच्या कारवाईत 119 किलो प्लॅस्टिक जप्त

ठाणे महापालिकेने सोमवारीही प्लॅस्टिक आणि थर्माकॉलवर कारवाई करत 119 किलो प्लॅस्टिक जप्त केले. यावेळी 19 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला. महापालिकेने प्लॅस्टिक विरोधी कारवाई अधिक तीव्र केली आहे. महापालिकेकडून रोज धाडसत्र सुरु असून दंड वसुली सुरु आहे. (Thane Municipal Corporation action on establishments using plastic and thermocol)