‘मी पुन्हा येईन!’ आतापर्यंत झाली चेष्टा, आज मात्र वाढली धाकधूक, सत्ताधा-यांच्या पोटात गोळा?

अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन या ओळींनी महाराष्ट्रातील सोशल मीडिया ढवळून निघाला. राजकीय नेते तेवढ्या त्यांच्या ना ना त-हा असतात. नागपूरकर देवेंद्र फडणवीस ही त्याला अपवाद नाहीत. त्यांच्या या वाक्याचं समाज माध्यमांवर पार पानिपत झालं. हे वाक्य चेष्टेचा विषय झाला. पण आज त्याच वाक्यानं पुन्हा मी येईनचा नारा दिल्याने सत्ताधा-यांच्या पोटात गोळा उठला आहे.

'मी पुन्हा येईन!' आतापर्यंत झाली चेष्टा, आज मात्र वाढली धाकधूक, सत्ताधा-यांच्या पोटात गोळा?
मी पुन्हा येईनImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 4:49 PM

मी पुन्हा येईन!’ (I will come back again) या वाक्यानं महाराष्टाचं कमाल, अमर्यादीत मनोरंजन केलं. विनोदी चुटकुल्यांपासून ते नथीतून बाण मारण्यापर्यंत या वाक्यानं राजकारणातच काय पार गावच्या पारापासून ते मुंबईच्या विधानभवनापर्यंत धुमाकूळ घातला आहे. एखाद्याचं हसं करायचं असेल, अथवा हसावयचं असेल तर ‘मी पुन्हा येईन!’ एवढं वाक्यचं एक रसरशीत फॉर्म्याट झाला होता. टिकटॉक, युट्यूब, फेसबूक, इन्स्टावरील अनेक व्हिडिओत या वाक्यानं मनोरंजनाचा आणि हास्याचं निखळ आनंद मिळवून दिला. या वाक्याला महाराष्ट्रानं हसोबा करुन टाकलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Former CM Devendra Fadnavis) यांचे हे वाक्य अनेकदा चेष्टेचा विषय म्हणून गेल्या दोन-अडीच वर्षांपासून चघळल्या जात आहे. शेलक्या शब्दात भाजपचा समाचार घेण्यासाठी आघाडीतील अनेक नेते या वाक्याचा आतापर्यंत वापर करत होते. मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या एका बंडाळीने या वाक्याला पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय पटलावर आरुढ केले आहे. या वाक्यानं आघाडीच्या मनात आज धडकी भरवली नसेल कशावरुन? आता हे वाक्य चेष्टेचा नव्हे तर धोक्याचा विषय म्हणून समोर आले आहे.त्यामुळे कोणाच्या पोटात गोळा उठला असेल हे वेगळं सांगायला नको.

ही कॅम्पेन ठरली डोकेदुखीची?

निवडणुका आल्या की, प्रत्येक राजकीय पक्ष अभिनव पद्धतीने त्यांची कॅम्पेन करतो. मुळात राजकारणात हा प्रकार रुढ केला तो, भाजपनेच, त्यांची प्रचाराची अनेक टॅगलाईन लोकांच्या आजही स्मरणात आहेत. त्याआधारे ब्रँडिंग करणे आणि जनाधार मिळवणे भाजपने अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारपासून सुरु केले. त्यात त्यांना चांगला प्रतिसाद ही मिळाला. शायनिंग इंडिया कंम्पेनला देशाने डोक्यावर घेतले होते. अशीच एक कॅम्पेन देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आली.’मी पुन्हा येईन!’ ही त्यांची टॅगलाईन गाजली. मात्र त्यानंतर सत्ता समीकरणं बदलली आणि हीच टॅगलाईन पर्यायाने त्यांची आणि पक्षाची डोकेदुखी वाढवणारी ठरली. शिवसेनेने काडीमोड करत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा केला आणि या टॅगलाईनच्या खाली कोण एक जाळ उठला, त्याची धग गेल्या दोन अडीच वर्षांपासून भाजप सहन करत होता. महारष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पूर्वी फडणवीस यांनी विधानसभेतील शेवटच्या भाषणात ‘मी पुन्हा येईन!’ चा नारा दिला होता. पण प्रत्यक्षात हे वाक्य त्यांना उतरवता आले नाही. पण या स्वप्नापासून ते मागेही हटले नाहीत.

हे सुद्धा वाचा

राजकारणात सर्व काही माफ असतं, राव

गेल्या एक दोन वर्षांपासून केंद्र सरकार सर्व सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करुन राज्यातील नेत्यांना धाकटपेश्याखाली दबावात ठेवत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने वारंवार केला आहे. महाराष्ट्राने कधी नव्हे ते अनेक प्रसंगातून सूडाचे राजकारणही अनुभवलं आहे. ईडी, सीबीआय या यंत्रणांच्या ससेमि-यात हे सरकार टिकवून ठेवण्याचे कसब ही महाविकास आघाडीने जपले. परंतू. राज्यसभेपासून सरकार अंतर्गतचा कलह समोर आला. त्यात शिवसेनेतील अंतर्गत कलहाने तर कहरच गाठला. राज्यात 21 जून रोजी जो नाट्यप्रयोग सुरु झाला आहे, त्याचे किती अंक होतात, हे सत्ताधा-यांपेक्षा आजघडीला विरोधकांना जास्त माहित असल्याचे एकूण या नाटकांच्या नेपथ्याकारांच्या हालचालींवरुन कयास बांधता येतो. पण प्रेमात, राजकारणात सर्व काही माफ असते, असं म्हणतात. त्यामुळे कुरघोडीच्या या राजकारणात ‘मी पुन्हा येईन!’चा अंक हसण्यावर नेणारा तर नक्कीच नाही, उलट धडकी भरवणारा आहे, हे सांगायला आता काय चाणक्याची वाट थोडीच पहायची.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.