इमारतीच्या कॉलमला तडे, मुंब्र्यातील पाच मजली इमारतीतून 36 कुटुंबांना हलवलं

मुंब्र्यात एक पाच मजली इमारत खाली करण्यात आली आहे. या इमारतीला तडे गेले होते (TMC succeeds in shifting 36 families from dangerous building in Mumbra).

इमारतीच्या कॉलमला तडे, मुंब्र्यातील पाच मजली इमारतीतून 36 कुटुंबांना हलवलं
इमारतीच्या कॉलमला तडे, मुंब्र्यातील पाच मजली इमारतीतून 36 कुटुंबांना हलवलं


ठाणे : मुंब्र्यात एक पाच मजली इमारत खाली करण्यात आली आहे. या इमारतीला तडे गेले होते. याशिवाय ठाण्यात मुसळधार पाऊस पडतोय. त्याचबरोबर हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या इमारतीतील नागरिकांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलं आहे. संबंधित इमारतीत जवळपास 36 कुटुंब वास्तव्यास होते. त्या सर्वांची तात्पुरती व्यवस्था ही एका शाळेत करण्यात आली आहे (TMC succeeds in shifting 36 families from dangerous building in Mumbra).

36 कुटुंबांचं सुखरुप स्थलांतरण

संबंधित इमारतीचं नाव श्री साई अपार्टमेंट असं आहे. या इमारतीच्या कॉलममध्येच तडे गेले होते. याबाबत अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने इमारतीत राहणाऱ्यांना बाहेर पडण्याचं आवाहन केलं. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीदेखील यासाठी प्रयत्न केले. अखेर प्रशासनाला इमारतीत राहणाऱ्या सर्व 36 कुटुंबांना सुखरुप इमारतीतून बाहेर काढण्यात यश आलं (TMC succeeds in shifting 36 families from dangerous building in Mumbra).

इमारत आधीपासून धोकायदायक इमारतींच्या यादीत

ही इमारत आधीपासून महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत होती. पण तरीदेखील तिथे नागरिक राहत होते. मुंबईच्या मालाड येथील मालवणी परिसरात नुकतीच चार मजली इमारत कोसळण्याची दुखद घटना घडली. मुंबईत दर पावसात अशा इमारत कोसळण्याच्या दुर्घटना समोर येत आहेत. इमारत कोसळून मोठी जीवितहानी होती. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने मुंब्र्यातील इमारत खाली केली.

मालाड दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात 9 जून रोजी रात्री चार मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले 10 वर्षाच्या आतील आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

व्हिडीओ बघा :

संबंधित बातम्या:

Malad building collapse : एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू, दूध आणण्यास गेलेले मोहम्मद रफी बचावले

Malad Building Collapsed | मी बाहेर पडलो आणि तीन इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या, मालाड इमारत दुर्घटना नेमकी कशी घडली?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI