AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress Protest : गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची निदर्शने, मोदी सरकारचा निषेध

महिला कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडर उलटा ठेवून तसेच चुलीवर अन्न शिजवून मोदी सरकारचा निषेध केला. मोदी सरकारचा निषेध, मोदी सरकार हाय हाय, वाह रे मोदी तेरा खेल; सस्ती दारू महंगा तेल अशा जोरदार घोषणा दिल्या.

Congress Protest : गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची निदर्शने, मोदी सरकारचा निषेध
गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची निदर्शनेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 08, 2022 | 11:45 PM
Share

ठाणे : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस महागाईचा आगडोंब उसळत आहे. आता घरगुती गॅस सिलिंडर (Gas Cylinder)च्या दरात सुमारे 55 रूपयांची दरवाढ (Hike) करण्यात आली आहे. या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे-पालघर विभागीय अध्यक्षा ऋताताई आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस (Nationalist Mahila Congress)च्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. देशातील मोदी सरकार अर्थव्यवस्थेची घट रोखण्यात आणि बेरोजगारीला आळा घालण्यात अपयशी ठरले आहे. आपल्या देशातही गती मंदावली आहे. केंद्र सरकारची चुकीची आर्थिक धोरणे याला कारणीभूत ठरत आहेत, असा आरोप करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली.

चुलीवर अन्न शिजवून मोदी सरकारचा निषेध

यावेळी महिला कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडर उलटा ठेवून तसेच चुलीवर अन्न शिजवून मोदी सरकारचा निषेध केला. मोदी सरकारचा निषेध, मोदी सरकार हाय हाय, वाह रे मोदी तेरा खेल; सस्ती दारू महंगा तेल अशा जोरदार घोषणा दिल्या. या प्रसंगी ऋताताई आव्हाड यांनी, जगभरात देशाची ओळख ही अर्थव्यवस्थेच्या वाढीने अधोरेखित होत असते. अर्थव्यवस्था मजबूत असेल तर देशाची प्रगतीकडे वाटलाच सुरू राहते, उत्पादन व रोजगार निर्मिती प्रक्रिया सुरु राहते. पण, मोदी सरकारला याच्याशी काही देणेघेणे नाही. आज घरगुती गॅस सिलिंडरचे दर अकराशे रूपयांच्या घरात गेली आहे. एकूणच भारताची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने सुरू झाली आहे, अशी टीका केली.

या आंदोलनात ठाणे शहराध्यक्षा सुजाता घाग आणि कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, नगरसेविका वाहिदा खान, आरती गायकवाड, वर्षा मोरे, अंकिता शिंदे, सुलोचना पाटील, फुलबानो पटेल, साबिया मेनन, कांता गजमल, राणी देसाई, शशिकला पुजारी, माधुरी सोनार, ज्योती निबंर्गी, स्मिता पालकर, शुभांगी कोळपकर, वंदना लांडगे, वंदना हुंडारे, सुवर्णा खिलारी, हाजीबेगम शेख, सुजाता गायकवाड, अनिता मोरे, भानुमती पाटील, पूनम वालिया, सुर्या चौधरी, सोमाडे, निर्मला यादव, फोरो पटेल, मंजू येकणकर, संजीवनी रेड्डी, सुहाणी बारणे, कल्पना नार्वेकर, दिघे मॅडम, विजया दामले, स्नेहल चव्हाण, सावित्री घिसिंग, पूजा जाधव, विशाल खामकर, विक्रांत घाग, सचिन पंधरे, राहुल नंदा, असिफ सिद्धगी, स्वप्निल आवटे, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे, शहर सरचिटणीस रवींद्र पालव आदी महिला सहभागी झाल्या होत्या. (Thane Nationalist Womens Congress protests against gas price hike)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.