AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; क्राईम ब्रँच 5 टीमची धडक कारवाई

Thane Rave Party Police Raid : 31st च्या पार्टीच्या नावा खाली तरूणाईचा 'धिंगाणा'; ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा... नव वर्षाच्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाही केली आहे. क्राईम ब्रँच 5 च्या टीमने छापा टाकून ही कारवाई केली आहे.

ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; क्राईम ब्रँच 5 टीमची धडक कारवाई
| Updated on: Dec 31, 2023 | 12:05 PM
Share

ठाणे | 31 डिसेंबर 2023 : 2023 वर्षातील आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवं वर्ष सुरू होत आहे. ठिकठिकाणी नव वर्षाचं स्वागत केलं जात आहे. अशातच या नव वर्षांच्या या पार्ट्यांमध्ये काही ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. ठाण्यातील रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांकडून मोठी कारवाई केली गेली आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई केली आहे. ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगत रेव पार्टी करत असताना 100 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्याकडून संयुक्त रित्या कारवाई करण्यात आली आहे.

ठाण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई

नव वर्षाच्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाही केली आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कासार वडवली गावात या रेव्ह पार्टीचं रात्री आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीवर पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्राईम ब्रँच 5 च्या टीमने छापा टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईत 95 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यात 5 मुलींचा ही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. रेव्ह पार्टीत पकडलेल्या सर्व आरोपीचे मेडिकल चेकअप करून, ठाणे कासारवडवली पोलीस ठाणे आणि क्राईम ब्रँच 5 च्या कार्यालयात नेण्यात येणार आहे.

तरूणांकडून अमली पदार्थांचं सेवन

ठाण्यात सुरु असलेल्या या रेव्ह पार्टीत ड्रग्स, एल एस डी, गांजा, चरस, दारू या अमलीपदार्थांचं सेवन केलं जात होतं. डीजेच्या तालावर नशेबाज तरुण थिरकत होती. क्राईम ब्रँचच्या टीमला याची माहिती मिळाली. त्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांचं आज सकाळी ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात आणलं गेलं. त्याचं मेडिकल चेकअपही करण्यात आलं आहे.

मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद पार्टीमध्ये सामील झाले होते. चरस ,गांजा, अल्कोहोल, एमडी अशा विविध नशा करण्यासाठी अमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आलं होतं. तसंच कासारवडवली लगत रेव्ह पार्टीच्या ठिकाणावरून 25 मोटरसायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. याबाबत आज ठाणे गुन्हे शाखा पोलीस पत्रकार परिषद घेणार आहे

वसई-विरारमध्येही कारवाई

अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 1 कोटी 47 लाखांचं ड्रग्ज पकडलं आहे. यामुळे वसई-विरार नालासोपार परिसरात खळबळ माजली आहे. या पथकाने नालासोपाऱ्याच्या प्रगती नगर परिसरात ही कारवाई करून दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.