पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी भिवंडीच्या तरुणाचा सहयाद्री ते हिमालय 2000 किमी पायी प्रवास!

भिवंडीचा तरुण भरपावसात रायगड ते सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी पायी निघाला आहे. सिद्धार्थ गणाई असं त्या तरुणाचं नाव आहे.

पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी भिवंडीच्या तरुणाचा सहयाद्री ते हिमालय 2000 किमी पायी प्रवास!
भिवंडीचा तरुण पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी भरपावसात रायगड ते सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी पायी निघाला आहे.
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 11:31 AM

भिवंडी : टेकडी किंवा डोंगर चढताना भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र भिवंडीचा तरुण पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी भरपावसात रायगड ते सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी पायी निघाला आहे. सिद्धार्थ गणाई असे तरुणाचे नाव असून त्याने रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून प्रवासाला सुरुवात केली. (The youth of Bhiwandi traveled 2000 km on from Sahyadri to Himalaya over message of Save the environment)

पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी सह्याद्रीच्या दिशेने निघाला

भिवंडीतील वापगाव येथील मैत्रिकुल या मुलांच्या वसतिगृहात सिद्धार्थ राहतो. सिद्धार्थचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. मात्र वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दोन वर्षे त्याने अंधेरीच्या एका पुलाखाली आपले बालपण काढले. पाच वर्षांपूर्वी सह्याद्री सर करण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. घरच्या परिस्थितीमुळे ते पूर्ण करता आले नाही. मात्र आता कितीही संकट आले तरी मागे फिरायचे नाही, असा वसा घेत सह्याद्रीच्या दिशेने तो निघाला आहे.

‘एक झाड माणुसकीचे, एक पाऊल परिवर्तनाचे’

सिद्धार्थ जेव्हा पुढच्या प्रवासाला निघतो तेव्हा वाटेतील प्रत्येक व्यक्तीला ‘एक झाड लावून उपक्रमात सहभागी व्हा, एक झाड माणुसकीचे, एक पाऊल परिवर्तनाचे’ असा संदेश देतो. निसर्गाची होत चाललेली कत्तल आणि निसर्गाचा कोप याला आपणच जबाबदार आहोत. प्रयत्न करणारे पण आपणच आहोत. ही परिस्थिती बदलण्यासाठी हा एक छोटा प्रयत्न करत असल्याची भावना सिद्धार्थने व्यक्त केली. या वेळी मार्गक्रमण करत असताना आपत्ती व्यवस्थापन ग्रुप शहापूर यांनी त्यास सुका मेवा व फळांची भेट दिली

70 दिवसांत प्रवास पूर्ण करणार

सिद्धार्थ दिवसाला 35 ते 40 किलोमीटर अंतर पायी प्रवासाला निघतो. रायगडमधून सुरू केलेला पायी प्रवास ठाणे, नाशिकमार्गे मध्य प्रदेश राज्यातून जाणार आहे. ‘सह्याद्री ते हिमालय’ असा दोन हजार किलोमीटरचा पायी प्रवास 70 दिवसांत पूर्ण करण्याची इच्छा सिद्धार्थने व्यक्त केली.

(The youth of Bhiwandi traveled 2000 km on from Sahyadri to Himalaya over message of Save the environment)

हे ही वाचा :

निसर्गप्रेमी अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम, मुंबईत दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष, वेलींचं संगोपन आणि संवर्धन होणार

सयाजी शिंदेंकडून स्वत: आगीत उतरुन वणवा विझवण्याचा प्रयत्न

साताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.