AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकल्प पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आमच्याकडं, एकनाथ शिंदे यांचा टोला

ठाण्यात पुलाच्या उद्घाटनानंतर रंगली श्रेयवादाची लढाई सुरू झाली. श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात दुसऱ्यांदा वाकयुध्द रंगले.

प्रकल्प पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आमच्याकडं, एकनाथ शिंदे यांचा टोला
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 13, 2022 | 7:29 PM
Share

ठाणे : सर्वांच्या प्रयत्नातून प्रकल्प पूर्ण होत असतात. महापौर, आमदार, खासदार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. या पुलासाठी ठाणे महापालिकेनं खर्च केला. कोणताही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इच्छशक्ती लागते. ती आमच्याकडं आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ठाण्यात पुलाच्या उद्घाटनांतर ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्हाला रस भांडणात की विकासात कशात आहे. आजपासून पुलाचे उद्घाटन झाले आहे. त्यामुळे आता वाहातूक कोंडी होणार नाही. एरोली टनेलचे काम जोरात सुरू आहे. त्याचे काम लवकर होईल. ज्यांनी या पुलाला मदत केली त्यांचे आभार मानतो. शिळ फाट्याची वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

ठाण्यात पुलाच्या उद्घाटनानंतर रंगली श्रेयवादाची लढाई सुरू झाली. श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात दुसऱ्यांदा वाकयुध्द रंगले, पुल आम्ही बनवला म्हणणाऱ्या आव्हाडांना पैसे कोणाच्या सरकारने दिले, असा प्रतिप्रश्न श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांना केला. मी आणि शिंदे साहेबांनी एकत्र काम केले. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. तीन महिन्यांपूर्वी मला मनेसेचे नेते म्हणत होते की पुलाचे उद्घाटन करू. मात्र मुख्यमंत्री आल्याशिवाय उद्घाटन होणार नाही मी असं म्हटलं, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर आले. कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या मार्गिकेचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. नवीन पुलाची आवश्यकता होती. त्यामुळं या पुलाचं काम पूर्ण झालं. प्रकल्प हा लोकांच्या फायद्यासाठी झाला पाहिजे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल. एमएमआरडीए आणि स्थानिक महापालिका काम करते. मेट्रोसुद्धा पुढं जात आहे. पब्लिक सेवा चांगली होणं आवश्यक आहे. शहरातली अडचणीची ठिकाण कमी केली पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश