AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल केला; ऋषिराज सावंत प्रकरणात मोठं ट्विस्ट, महत्त्वाची माहिती समोर

आपला मुलगा ऋषीराज सावंत हा बेपत्ता नाहीये, तो मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता.  माझा मुलगा कुठल्याही अनोळखी मुलांसोबत नाही तर तो त्याच्या मित्रांसोबत आहे. अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

...म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल केला; ऋषिराज सावंत प्रकरणात मोठं ट्विस्ट, महत्त्वाची माहिती समोर
| Updated on: Feb 11, 2025 | 7:09 PM
Share

सोमवारी माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचं पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याच्या बातमीनं एकच खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी देखील तपासाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं नसून ते  मित्रांसोबत बँकॉक निघाले होते अशी माहिती समोर आली, याबद्दल खुद्द तानाजी सावंत यांनीच माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत?  

आपला मुलगा ऋषीराज सावंत हा बेपत्ता नाहीये, तो मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता.  माझा मुलगा कुठल्याही अनोळखी मुलांसोबत नाही तर तो त्याच्या मित्रांसोबत आहे. तो बेपत्ता झाला किंवा त्याचे अपहरण झाले असा कुठलाही प्रकार नाही. मात्र तो नेहमी घरातून बाहेर पडताना सागूंन जातो. मात्र यावेळी तसं काही झालं नाही, म्हणून आम्हाला चिंता वाटली, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट आलं आहे.

या प्रकरणात सिहंगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ऋषिराज सावंत यांच्या बँकॉक जाण्याला त्यांचे वडील तानाजी सावंत आणि पत्नी यांचा विरोध होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क करून बँकॉकला निघालेले विमान हवेतून फिरवून पुन्हा थेट पुण्यात आणले गेले. ऋषिराज यांनी बँकॉकला जाण्यासाठी तब्बल 68 लाख रुपये मोजले होते. हवेतील विमान पुन्हा माघारी बोलवण्यासाठी काहीतरी ठोस कारण हवं होतं त्यासाठी सिहंगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती या प्रकरणात समोर आली आहे. ऋषिराज सावंत यांच्यासह त्यांचे मित्र संदीप वसेकर आणि प्रवीण उपाध्ये हे बँकॉकला निघाले होते.

दरम्यान या प्रकरणात सोमवारी रात्री पोलिसांकडून ऋषिराज सावंत यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यावेळी माहिती देताना त्यांनी म्हटलं की, मी व्यावसायिक कारणासाठी बँकॉककला निघालो होते, माझं अपहरण झालं नसल्याचं ऋषिराज यांनी म्हटलं.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...