Maharashtra Rain : पुण्यात पावसाचा धुमाकूळ! धरणं ओव्हर फ्लो, भिडे बाबा पूल पाण्याखाली

हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला होता. पुण्यात मागील तीन दिवस मुसळधार पाऊस पडला आहे. पुण्याजवळील अनेक धरण ओव्हर फ्लो झाली आहे. खडकवासला धरणातदेखील 100 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सायंकाळी 4 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा 18 हजार 491 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.

Maharashtra Rain : पुण्यात पावसाचा धुमाकूळ! धरणं ओव्हर फ्लो, भिडे बाबा पूल पाण्याखाली
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 9:47 PM

पुणे : राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. पुण्यातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे( heavy rains) पुण्यातील(Pune) भिडे बाबा पूल(Bhide Baba bridg) पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पाणी वाहू लागल्याने या पुलावरून वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे पूल पाण्याखाली गेला आहे.

मुठा नदी पात्रात खडकवासला धरणाचे पाणी सोडले

हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला होता. पुण्यात मागील तीन दिवस मुसळधार पाऊस पडला आहे. पुण्याजवळील अनेक धरण ओव्हर फ्लो झाली आहे. खडकवासला धरणातदेखील 100 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सायंकाळी 4 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा 18 हजार 491 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.

नदीपात्रात पार्क केलेली वाहने पाण्याखाली गेली

मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह झाल्याने पुण्यातील डेक्कन परिसरातील बाबा भीडे पूल पाण्याखाली गेला आहे. सर्वत्र पाणी साचल्याने नदी पात्रातील सर्व रस्ते बंद वाहतुकीसाठी करण्यात आले आहे. नदीपात्रात पार्क केलेली वाहने तसेच ढोल ताशापथकांचे मंडपदेखील पाण्याखाली गेले आहेत.

बाबा भिडे पुल पाण्याखाली

बाबा भिडे पूल हे पुणेकरांसाठी पाण्याचा मोजमाप ठरण्याचे माध्यम आहे. भिडे पुल पाण्याखाली गेला की भरपूर पाऊस झाला असा पुणेकरांचा दरवर्षीचा अंदाज आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. खबरदारी म्हणून या पुलावरुन वाहतुक बंद ठेवण्याल आली आहे. नदी पात्रातून प्रवास न करण्याचं आवाहन देखील प्रशासनांनी पुणेकरांना केले आहे.

पुण्यातील धरण भरली, पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला

पुण्याजवळील सर्व धरण परिसरात चांगला पाऊस पडला आहे. यामुळे पुण्यातील सर्व धरण भरली असून पुणेकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे. पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरले आहे. भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदी पात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. मुळशी धरण जलाशय पातळीत देखील वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा जोर कायम

हवामान खात्याने राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ (vidarbha) आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट दिला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुर स्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना पूर आल्यामुळं अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर अनके जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.