खळबळजनक ! घराच्या गच्चीवर मृतावस्थेत आढळले पती-पत्नीचे मृतदेह
हा अपघाती मृ्त्यू आहे की घात पात याबद्दल शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच जोपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल येत नाही तोपर्यंत काहीही सांगता येत नसल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

शिर्डी : कोपरगाव तालुक्यातील (Kopargaon taluka) आपेगाव घटना एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून येथे एका वृद्ध दाम्पत्याचे (elderly couple) मृतदेह घराच्या गच्चीवर आढळून आले आहेत. यामुळे आपेगाव गावात एकच खळबळ उडाली आहे. तर दत्तात्रय गंगाधर भुजाडे ( वय 75 वर्ष ) आणि राधाबाई दत्तात्रय भुजाडे ( वय 65 वर्षे ) अशी मृतांची नावे असल्याचे कळत आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (sudden death recorded) झाली आहे. तर पती पत्नीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील आपेगाव परिसराच्या शिवारात दत्तात्रय भुजाडे यांचे घर आहे. येथे दत्तात्रय गंगाधर भुजाडे आणि राधाबाई दत्तात्रय भुजाडे हे वृद्ध दाम्पत्य राहत होते. तर त्यांचा मुलगा जालिंदर हा पुण्याला कामानिमित्त असतो. दरम्यान तो गेली दोन दिवस आपल्या आई-वडिलांशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ते फोन उचलत नव्हते. यामुळे जालिंदर यांनी आपल्या एका मित्राला गावी जाऊन काय नक्की झालं आहे हे पाहण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे १ जून रोजी त्याने आपेगाव परिसराच्या शिवारात असणाऱ्या घरात जाऊन पाहीले असता घराचे दार आतून बंद असल्याचे आढळले. त्यामुळे जालिंदर यांच्या मित्राणे घराला लागून असणाऱ्या विद्युत पोलवरून वर जात पाहीले असता हे वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत आढळले.
दरम्यान याची माहिती जालिंदर यांच्या मित्राने जालिंदर यांना दिली. तसेच या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांनाही दिली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पाहणी केली. तसेच हा अपघाती मृ्त्यू आहे की घात पात याबद्दल शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच जोपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल येत नाही तोपर्यंत काहीही सांगता येत नसल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. अधिक तपास कोपरगाव तालुका पोलिस करत आहे.
