… तर मंत्रालयात सोमवारी विष प्राशन करू, छावा संघटनेचा इशारा; मराठा आंदोलन पेटणार?

छावा संघटनेने सरकारच्या निषेधार्थ विष प्राशन करण्याचा इशारा दिलाय. (Chhawa organization poison maratha)

... तर मंत्रालयात सोमवारी विष प्राशन करू, छावा संघटनेचा इशारा; मराठा आंदोलन पेटणार?
छावा संघटनेचे पदाधिकारी
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 4:25 PM

जालना : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात मराठा समाज आक्रमक झालेला आहे. त्यासाठी मराठा संघटनांची मागील कित्येक दिवसांपासून आंदोलनं, मोर्चे सुरु आहेत. या माध्यमातून मराठा समाज त्यांच्या समम्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकार आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. आझाद मैदानात सुरु असलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप छावा संघटनेने काला आहे. तसेच सरकारच्या निषेधार्थ विष प्राशन करण्याचा इशाराही या संघटनेने दिलाय. सोमवारी छावा संघटनेचे पदाधिकारी मुंबईतील मंत्रलयात विष प्राशन करणार आहेत. संघटनेच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण, नोकर भरती, नोकर भरतीतील नियुक्त्या आदी विविध मुद्द्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे. जानेवारी महिन्यातील 20 तारखेपासून हे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा आजचा 28 वा दिवस आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही, असा आरोप छावा संघटनेने केले आहे.

तसेच, वरील मागण्यांना घेऊन राज्य सरकारशी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, राज्यशासन कुठल्याही प्रकारची दाद देत नाही, असे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय. सरकारच्या याच भूमिकेमुळे सोमवारी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी छावा संघटनेचे कार्यकर्ते तसेच जालन्याचे जिल्हाध्यक्ष मंत्रालयात बसून विष प्राशन करतील असा निर्वाणीचा इशारा येथील छावा संघटनेने दिला आहे.

…तर मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपनेसुद्धा राज्य सरकारवर वेळोवेळी टीका केलेली आहे. ‘मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढा. नाही तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल,’ असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी 24 जानेवारी रोजी दिला होता.

‘मराठा समजाचा आक्रोश थांबला असेल त्यांची ताकद संपली असेल असं सरकारला वाटत असावं. त्यामुळेच आंदोलनाचा आवाज या सरकारच्या कानावर जात नाही. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारचा एकही प्रतिनिधी आलेला नाही. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार असून केवळ मराठा समजाला खेळवा-खेळवीचं राजकारण हे सरकार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. ठाकरे सरकारच्या मनात पाप आहे. सर्व भरत्या सुरू केल्या आहेत. सोंग आणि ढोंग करण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली होती.

दरम्यान, छावा संघटनेच्या विष प्राशन करण्याच्या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

‘पवार साहेब, इकडे लक्ष द्या’; मराठा क्रांती मोर्चाचे आझाद मैदानात बॅनर्स!

… तर मराठा आरक्षणासाठी उपोषणला बसू; प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.