राज्याच्या विकासात सहकारक्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण – गडकरी

महाराष्ट्राच्या विकासामध्ये सहकार क्षेत्राचे भरीव योगदान आहे. राज्यातील विविध व्यवसायाला सहकाराची जोड मिळाल्याने ते व्यवसाय भरभराटीस आल्याचे प्रतिपाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

राज्याच्या विकासात सहकारक्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण - गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 2:17 PM

मुंबई – महाराष्ट्राच्या विकासामध्ये सहकार क्षेत्राचे भरीव योगदान आहे. राज्यातील विविध व्यवसायाला सहकाराची जोड मिळाल्याने ते व्यवसाय भरभराटीस आल्याचे प्रतिपाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते वैकुंटभाई मेहता, सर विठ्ठलदास ठाकरसी, प्रा. धनंजय गाडगीळ यांच्या तैलचित्राच्या अनावरण प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील उपस्थिती होती. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, राज्याच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. ही बँक स्थापन करण्यामध्ये वैकुंटभाई मेहता, सर विठ्ठलदास ठाकरसी आणि प्रा. धनंजय गाडगीळ यांची भूमिका महत्त्वाची होती. सहाकार क्षेत्रामुळे राज्याचा झालेला कायापालट आपण सर्वांनीच अनुभवला आहे.

भारत कृषीप्रधान देश 

भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे योगदान केवळ 10 ते 12 टक्के आहे. जोपर्यंत कृषी क्षेत्राला सहकाराची जोड मिळत नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्राचा विकास होणे शक्य नसल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी एक किस्सा देखील सांगितला, मी सोलापूरवरून कराडला जात होतो. तेव्हा पाटबंधारे विभागातील काही अभियंते माझ्यासोबत होते. या भागात जाण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. मात्र तरी देखील मी गाडीतूनच त्या अभियंत्यांना सांगायचो की, या भागात पाणी पोहोचले आहे. या भागामध्ये पाणी पोहोचले नाही. हा भाग दुष्काळी आहे.  जेव्हा ते गाडीतून खाली उतरले तेव्हा त्यांनी मला एक प्रश्न केला. तुम्ही तर या भागामध्ये पहिल्यांदाच आला आहात मगा तुम्ही सर्व अचूक कसे ओळखले. तेव्हा मी त्यांना म्हणालो सोपे आहे. ज्या-भागाचा विकास झाला आहे, त्याचाच अर्थ तिथे पाणी पोहोचले आहे. आणि जो भाग मला ओसाड वाटला तिथे पाणी पोहोचले नसल्याचे मी सांगितले.

सहकार क्षेत्राची जोड हवी 

गडकरी पुढे म्हणाले की, केवळ पाण्यानेच प्रश्न सुटत नाही, तर त्याला सहकाराची देखील जोड हवी असते. हे सांगण्यासाठी त्यांनी कोल्हापूरचे उदाहारण दिले. कोल्हापूर प्रमाणेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाणी उपलब्ध आहे. मात्र कोल्हापूर हा देशातील सर्वात जास्त जीडीपी असलेला जिल्हा आहे. तर पाणी असून देखील विदर्भातील काही जिल्ह्यांचा विकास झाला नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे कोल्हापूरमध्ये सहकाराला फार वर्षांपूर्वी सुरुवात झाली. त्याची फळे आता दिसत असल्याचे गडकरी यांनी म्हटले.

संबंधित बातम्या 

VIDEO: आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करणार नाही, आधी आत्महत्या थांबवा; राज ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

Crime: गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृण हत्या, मित्रानेच वादातून केला खून, औरंगाबादेत थरार!

VIDEO: साहेब, हातजोडून विनंती आहे सातवा वेतन आयोग लागू करा, नाही तर आज 37 गेले, उद्या 370 होतील; एसटी कामगारांचा ‘कृष्णकुंज’वर टाहो

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.