एल्गारचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा : बाळासाहेब थोरात

एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा आहे", अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat on Bhima Koregaon) यांनी दिली.

एल्गारचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा : बाळासाहेब थोरात
Follow us
| Updated on: Feb 18, 2020 | 3:32 PM

अहमदनगर : “दलित, आंबेडकरवादी विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा डाव असून, एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat on Bhima Koregaon) यांनी दिली. “पुरोगामी व्यासपीठ असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणे, चौकशी करणे चुकीचं आहे. कोणाविरोधात पुरावे असतील तर त्याचं समर्थन आम्ही करत नाही. दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांचा खून झाला त्यामुळे पुरोगामी विचारवतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. NIA कडे तपास देण्याची वेळ पाहिली तर सगळा तपास संशयास्पद वाटत आहे”, असं बाळासाहेब थोरात  (Balasaheb Thorat on Bhima Koregaon)म्हणाले.

कोणी वेगळं वागलं असेल, काही पुरावा असेल तर त्याची बाजू आम्ही घेणार नाही.  परंतु जे कवी होते, विचारवंत होते, त्यांनी पुरोगामी विचार मांडला. त्यांची चौकशी विचार करायला लावणार आहे. दाभोळकरांना मारलं गेलं, कलबुर्गींना मारलं गेलं, पानसरेंची हत्या झाली. या पुरोगामी विचारवंतांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे का असं वाटतं. असंही वाटतं की जी पुरोगामी चळवळ, दलित, आंबेडकरवादी चळवळ आहे तिलाच नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव आहे का? हे सर्व काळजीचं वाटतं. एनआयएकडे तपास देणे, तिचा वेळ-काळ हे संपूर्ण पाहिलं, तर सगळा देश-समाज सर्वजण त्याकडे काळजीच्या स्वरुपाने पाहतोय, संशयाच्या स्वरुपाने पाहतोय, असं थोरात म्हणाले.

शरद पवारांची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Bhima Koregaon) यांनी आज पत्रकार परिषद घेत भीमा कोरेगाव तपासाबाबत भाष्य केलं.

“एल्गार परिषद ही वेगळी आहे. कोरेगाव भीमाशी तिचा संबंध नव्हता. एल्गार परिषद त्याच्या काही दिवस आधी झाली होती.  एल्गार परिषदेशी संबंध नसलेल्या, हजर नसलेल्या लोकांवर खटले भरले गेले. नामदेव ढसाळांची कविता जिला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार आहे, ती सादर केल्याने गुन्हा दाखल झाला. याप्रकरणात त्यावेळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संशयास्पद भूमिका घेतली. पुणे पोलिसांतील त्यावेळच्या अधिकाऱ्यांचं वर्तन संशयास्पद आहे. पोलिसांनी सरकारच्या संगनमताने काम केलं. सत्य काय आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. आमची पोलिसांच्या वर्तनाविरोधात तक्रार आहे. पोलीस आणि तत्कालिन सरकारमधील लोकांची चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे”, असं शरद पवार म्हणाले.

संबंधित बातम्या 

भीमा कोरेगाव : पोलीस आणि तत्कालिन सरकारकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार  

हिंमत असेल तर पुन्हा लोकसभा निवडणूक घ्या, शरद पवारांचं फडणवीसांना आव्हान 

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.