विदर्भात 150 ते 200 कोटी वर्षांपूर्वी समुद्र असल्याचा दावा, यवतमाळमध्ये सापडले दुर्मिळ जीवाश्मांचे अवशेष

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Namrata Patil

Updated on: Jun 19, 2021 | 11:26 AM

विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात 150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ-प्रोटेरोझोईक (Nioproterozoic) काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्मे आढळतात. (The first fossils were found near Yavatmal district Wani town)

विदर्भात 150 ते 200 कोटी वर्षांपूर्वी समुद्र असल्याचा दावा, यवतमाळमध्ये सापडले दुर्मिळ जीवाश्मांचे अवशेष
first fossils yavatmal

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरालगतच्या ग्रामीण भागात अति प्राचीन काळात समुद्रात तयार झालेले विविध काळातील चूनखडक आढळतात. याच चुनखडकात 150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ-प्रोटोरोझोईक काळातील अतिशय दुर्मिळ जीवाश्म सापडले आहेत. समुद्रात पृथ्वीवर प्रथम विकसित झालेल्या सायनोबेक्टेरीया ( स्ट्रोमाटोंलाईट ) या सूक्ष्म जीवांचे हे जीवाश्म चुनखडकात सापडले आहेत. चंद्रपूर येथील पर्यावरण आणि भुशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ही दुर्मिळ जीवाश्म शोधून काढली आहेत. (The first fossils were found near Yavatmal district Wani town)

चुनखडकात आढळली जीवाश्मे

पृथ्वीची उत्पत्त्ती 4.6 अब्ज वर्षापूर्वी झाली. पण सजीवांची उत्पत्ति मात्र 3 ते 4 अब्ज वर्षादरम्यान झाली. जगात काही ठिकाणीच असे जीवाश्म सापडले आहेत, त्यांना स्ट्रोमाटोंलाईट (Stromatolite) असे म्हणतात. या सूक्ष्मजीवांना सायनो बेक्टेरीया (Cyanobacteria) असे म्हणतात. विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात 150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ-प्रोटेरोझोईक (Nioproterozoic) काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्मे आढळतात.

तेव्हा समुद्राच्या उथळ उष्ण पाण्यात तयार झालेल्या चिखलात हे जीवाणू विकसित झाले. ती पृथ्वीवरील प्रथम विकसित झालेली जीव होती. ही सर्व आदीजीव खनिजे खाऊन ती जगत होती. पुढे अशाच जीवांपासून बहुपेशीय जीव विकसित होत गेले. मासोळ्या, सरपटणारे जीव, विशाल आकाराचे डायनोसोर ते पुढे मानव असा सजीवांचा विकास झाला.

करोडो वर्षानंतरही चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा

चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पेनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोलाईटची जीवाश्मे आढळली. या सजीवांना शास्त्रीय भाषेत कुकोकल्स (Chroococales) आणि ओर्कोटोंरीअल्स (Oschilatorials) असे म्हणतात. ही जीवाश्मे चिखलात गोल आकाराची गुंडाळी करून समुहाने राहत होती. पुढील क्रिटाशिअस काळात भूगर्भीय घडामोडीमुळे समुद्र दूर गेला. त्यामुळे चिखलांचे रुपांतर चुनखडकात झाले आणि जीवांचे रुपांतर जीवाश्मात झाले. आजही करोडो वर्षानंतरही चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा स्पष्ट दिसतात. ही जीवाश्मे यवतमाळ जिल्ह्यातील वणी जवळ मोहोरली-बोर्डा परिसरात आढळली आहे, असे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

प्रा. सुरेश चोपणे हे मूळचे वणीचे असून ते या परिसरात नियमित ऐतिहासिक आणि भौगोलिक संशोधन करीत असतात. दोन वर्षापूर्वी त्यांनी चंद्रपूर जवळ स्ट्रोमाटोंलाइटची जीवाश्मे शोधून काढली होती. 15 वर्षापूर्वी वणी परिसरातील बोर्डा येथे झालेल्या भूकंपाचा त्यांनी अभ्यास केला होता. यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी 5 ठिकाणी पाषाणयुगिन स्थळे, तर ४ ठिकाणी कोट्यावधी वर्षापूर्वीची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे शोधून काढली आहेत.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जीवाश्मं आढळली

चंद्रपूर येथे त्यांचे स्वताचे शैक्षणिक दृष्ट्‍या ‘अश्म,जीवाश्म संग्रहालय स्थापन केले आहे. चुनखडकात आढळलेली ही अतिशय महत्वाची स्ट्रोमाटोंलाईटची जीवाश्मे प्रथमच त्यांना आढळली आहेत. ते गेल्या 2 वर्षापासून ते ही जीवाश्मे शोधत होते. प्रथम आस्ट्रेलिया मध्ये ही जीवाश्मे मोठ्या प्रमाणावर आढळली होती.

भारतात भोजुन्दा,राजस्तान ,चित्रकुट, मध्य प्रदेश आणि चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आढळली आहेत. या संशोधनामुळे वणी शहराचा प्राचीनतम भौगोलिक इतिहास कळला असून या वणी शहराचे नाव जगभर पोहोचेल. या जीवाष्मांच्या संशोधनामुळे जीवशास्त्र, भुशास्त्र आणि जीवाश्म शास्त्राच्या अभ्यासाला चालनां मिळेल, असा विश्वास प्रा सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला. (The first fossils were found near Yavatmal district Wani town)

संबंधित बातम्या : 

दक्षिणेकडील गंगा असलेली ‘गोदावरी’ पानवेलीच्या विळख्यात, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

केंद्राने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा द्यावा; सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार: विजय वडेट्टीवार

तब्बल 10 वर्षांपासून वीज जोडणी नाही, शेवटी विहिरीत उतरून आत्महत्येचा प्रयत्न, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI