दक्षिणेकडील गंगा असलेली ‘गोदावरी’ पानवेलीच्या विळख्यात, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

या पानवेली लवकरात लवकर काढाव्या, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. (Nashik Godavari River Pollution People health in problem)

दक्षिणेकडील गंगा असलेली 'गोदावरी' पानवेलीच्या विळख्यात, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Nashik Godavari River Pollution 1

नाशिक : देशभरात नदी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातच दक्षिणेकडील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदी ही पानवेलीच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे तिचा श्वास कोंडला गेला आहे. या पानवेलीमुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या सहा ते सात गावांना पूर पाण्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. या पानवेली लवकरात लवकर काढाव्या, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. (Nashik Godavari River Pollution People health in problem)

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राज्यात मान्सून दाखल झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्रंबकेश्वर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. पावसाचे पाणी गोदावरी नदीच्या प्रवाहातून निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणात दाखल होते. नांदूर मधमेश्वर धरणाच्या बॅक वॉटरला चांदोरी, सायखेडा ही गाव आहेत. या गावांच्या परिसरात गोदावरी नदीत नाशिक भागातून सोडण्यात आलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात पानवेली वाहून आल्या आहे. इतकंच नव्हे तर अनेक कंपन्यांमधील केमिकल युक्त दूषित पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी असलेले जलचर प्राणी आणि त्यावर असलेले पाणी योजनेतील लाभार्थी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

….अन्यथा आंदोलन करु

दरम्यान इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास या पानवेली सायखेडा येथील पुलाला अडकतील. त्यामुळे पाण्याचा फुगवठा निर्माण झाला तर संपूर्ण पाणी हे चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव या गावातून वाहत जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. तसेच पूर पाण्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे या पानवेली वेळेवर काढाव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जर या पानवेली न काढल्यास आंदोलन करु, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

गोदावरी नदीतील पानवेलीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने गोदावरी नदी मोकळा श्वास कधी घेणार? नागरिकांच्या समस्या कधी मिटणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

(Nashik Godavari River Pollution People health in problem)

संबंधित बातम्या : 

सर्व्हे : कृष्णा सहकारी साखर कारख्यान्याच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी?

Knowledge | चित्राप्रमाणे सुंदर दिसणारं, पाण्यावर वसलेलं शहर ‘व्हेनिस’, जाणून घ्या का आणि कसं वसवलं?

“ये आम हैं कुछ खास”, 7 आंब्यांच्या सुरक्षेसाठी 4 गार्ड, 6 भनायक श्वान, जाणून घ्या यामागील कारण