शिंदे सरकार राहणार की जाणार ? या तारखेला होणार सुनावणी

राज्यामध्ये शिवसेनेचा शिंदे गट म्हणजेच बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आहे, याच सत्तेचे भविष्य काय ? याची स्पष्टता सुप्रीम कोर्टात 01 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.

शिंदे सरकार राहणार की जाणार ? या तारखेला होणार सुनावणी
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 10:00 PM

प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, दिल्ली : राज्यात गेल्या तीन महिन्यापूर्वी स्थापन झालेले सरकार (Goverment) राहणार की जाणार याचा फैसला 01 नोव्हेंबरला होणार आहे. सुप्रीम कोर्टाने (Court) राज्यातील सत्तासंघर्षाबाबत 01 नोव्हेंबर पाच खंडपीठासमोर सुनावणी (Hearing) होणार असल्याचे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड, एम आर शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली, पी नरसिंमा यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सरकार राहणार की टिकणार, सुप्रीम कोर्टात सुनावणी कधी होणार ? अशी चर्चा सुरू होती. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर सरकार बेकायदेशीर असल्याचाही आरोप केला जात होता. त्यामुळे सरकारचं नेमकं काय होणार हे आता 01 नोव्हेंबरला याबाबत स्पष्टता होण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये शिवसेनेचा शिंदे गट म्हणजेच बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आहे, याच सत्तेचे भविष्य काय ? याची स्पष्टता सुप्रीम कोर्टात 01 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आणि ठाकरे गटाचे सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

उद्धव ठाकरे गटाने 16 आमदारांचे निलंबन, विधानसभा अध्यक्ष पदावरून घेतलेले निर्णय याच्या विरोधात धाव घेण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविरोधात याचिका दाखल करत ठाकरेंना आव्हान देत आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा केला आहे.

त्यामुळे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याचा पेच सुप्रीम कोर्टात सुटणार आहे. याशिवाय शिवसेना कुणाची याचा देखील फैसला सुप्रीम कोर्टातच होणार आहे.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड, एम आर शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली, पी नरसिंमा यांच्यासमोर ही सुनावणी होणार असुन या सुनावणीकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....