जैतापूर प्रकल्पामुळे भारत-फ्रेंच उद्योगांमध्ये सहकार्य वाढेल; वाणिज्यदूत शॉर्ले यांचा आशावाद, फ्रान्सचा भारतात ‘बॉनजो इंडिया’ महोत्सव

जैतापूर प्रकल्प हा तब्बल 9,900 मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. केंद्र सरकारनेही या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली आहे.

जैतापूर प्रकल्पामुळे भारत-फ्रेंच उद्योगांमध्ये सहकार्य वाढेल; वाणिज्यदूत शॉर्ले यांचा आशावाद, फ्रान्सचा भारतात 'बॉनजो इंडिया' महोत्सव
मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 2:35 PM

मुंबईः फ्रान्सच्या सहकार्याने होत असलेला जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प असून, या प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल, असे प्रतिपादन फ्रान्सचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी केले आहे. शॉर्ले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोमवारी राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

बॉनजो इंडिया महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि फ्रान्सचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांची भेट मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी शार्ले यांनी फ्रान्स सन २०२२ साली भारतात आपला सांस्कृतिक महोत्सव ‘बॉनजो इंडिया’ आयोजित करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर भारत देखील फ्रान्समध्ये नमस्ते फ्रान्स या भारताच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार आहे. करोना काळात भारतातील फ्रेंच कंपन्यांनी एकही कामगार कपात केली नाही, असे वाणिज्यदूतांनी राज्यपालांना आवर्जुन सांगितले.

फ्रान्सच्या विद्यापीठांना सहकार्याचे आवाहन

राफेल सहकार्यामुळे भारत – फ्रान्स संबंध अधिक मजबूत झाले असून, फ्रेंच कंपनी दासाऊँ एव्हिएशनच्या सहकार्याने नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. राज्यातील २२ सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती या नात्याने फ्रान्समधील विद्यापीठांनी राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य करण्यास प्रस्ताव केल्यास आपण त्याचे स्वागत करू, असे राज्यपालांनी वाणिज्यदूतांना सांगितले.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला तत्वतः मान्यता

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात माडबन-जैतापूर येथे फ्रान्सच्या सहकार्याने होत आहे. तब्बल 9,900 मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. केंद्र सरकारनेही या अणुऊर्जा प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत नुकतीच याबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. मात्र, शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध आहे. जैतापूरच्या मुद्यावर आम्ही स्थानिकांच्या सोबत असून, याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

फ्रान्सच्या सहकार्याने होत असलेला जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प असून, या प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल. फ्रान्स सन २०२२ साली भारतात आपला सांस्कृतिक महोत्सव ‘बॉनजो इंडिया’ आयोजित करणार आहे. – जॉन मार्क सेर शॉर्ले, फ्रान्सचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत

इतर बातम्याः

Nashik| महापालिका निवडणुका लांबणार, अजित पवारांचे संकेत; ओबीसी जनगणना झाल्यावरच रणधुमाळी

Special Report| रामकथेचा पट उलगडला इथल्या मातीवरती; नववर्षात रम्य गाव कुसुमांचे बघाच, नाशिकला फिरायला याच…!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.