AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईव्हीएम हॅक करण्याची गुजरातमधून आली होती ॲाफर, पवार गटाच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, थेट नाव घेतलं, किती कोटी मागितले?

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्यानं केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर गुजरातमधून आली होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

ईव्हीएम हॅक करण्याची गुजरातमधून आली होती ॲाफर, पवार गटाच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, थेट नाव घेतलं, किती कोटी मागितले?
evmImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2025 | 9:01 PM
Share

विधानसभेत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता, तर राज्यात लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर महायुतीनं जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं. महायुतीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं, तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सातत्यानं महाविकास आघाडीकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात आहे, ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदानावर शंका घेतली जात आहे. आगामी काळात मतदान बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी विरोधक करत आहे.

एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकी संदर्भात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला होता.  ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 माणसं मला भेटायला आली होती. ही 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते’, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं, शरद पवार यांच्या या दाव्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याकडून ईव्हीएम संदर्भात मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन मॅनेज करून देण्याची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट  सटाण्याचे माजी आ.संजय चव्हाण यांनी केला आहे.  संजय चव्हाण हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार आहेत.

त्यांनी पुढे बोलताना असं देखील म्हटलं आहे,  की ही ऑफर  गुजरातच्या नारायणदास पटेल या व्यक्तीने दिली होती. पटेल हे गुजरातच्या भूज येथे आयटी तज्ज्ञ आहेत.  50 हजार ते दीड लाखापर्यंत मताधिक्य वाढवून देण्याचा दावा पटेल यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी 5 ते 8 कोटी रुपयांची मागणी केली होती. ईव्हीएम आणि पोलीसही गुजरातचे असल्यामुळे मशीन मॅनेज करणं शक्य असल्याचा दावा करण्यात आला होता, ही बाब  तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही कळवली होती, मात्र महाविकास आघाडीला चांगला जनाधार असल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पटेल सटाण्यात देखील येऊन गेला होता, तुम्ही नाही केले तर विरोधी उमेदवारांची  भेट घेणार असल्याचंही त्याने सांगितलं होतं.  त्याची तक्रारही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती, असा खळबळजनक दावा चव्हाण यांनी केला आहे.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?