5

Nashik Gold: सोन्याची गगन भरारी, 24 कॅरेटचे दर 50 हजारांच्या पल्याड!

ऐन दिवाळीनंतर नाशिकच्या सराफा बाजारपेठेमध्ये सोन्याच्या दरांनी गगन भरारी घेतली असून, गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 50 हजार 900 रुपये नोंदवले गेले.

Nashik Gold: सोन्याची गगन भरारी, 24 कॅरेटचे दर 50 हजारांच्या पल्याड!
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 1:42 PM

नाशिकः ऐन दिवाळीनंतर नाशिकच्या सराफा बाजारपेठेमध्ये सोन्याच्या दरांनी गगन भरारी घेतली असून, गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 50 हजार 900 रुपये नोंदवले गेले आहेत, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

नवसे म्हणाले की, नाशिकच्या सराफा बाजारात सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49 हजार 250 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 280 रुपये नोंदवले गेले. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 750 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 250 रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे दर किलोमागे 67000 रुपये नोंदवले गेले. मात्र, गुरुवारी सोन्याच्या दरांनी उसळी घेतली. त्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 50 हजार 900 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 49500 रुपयांवर गेले. चांदीच्या दारीतही वाढ झालेली पाहायला मिळाली. चांदीचे दर किलोमागे 2 हजारांनी वाढून 69000 हजारांवर पोहचले आहेत. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, ‘बीआयएस’च्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे ज्वेलर्स किंवा किरकोळ विक्रेत्याकडून प्राप्त झालेल्या बिल / इनव्हॉइसमध्ये हॉलमार्क केलेल्या वस्तूंचा तपशील असणे आवश्यक आहे. हॉलमार्क केलेल्या मौल्यवान धातूच्या वस्तूंच्या विक्रीचे बिल किंवा इनव्हॉइसमध्ये प्रत्येक वस्तूचा तपशील, मौल्यवान धातूचे निव्वळ वजन, कॅरेट, शुद्धता आणि हॉलमार्किंग शुल्क नमूद केले पाहिजे.

नाशिकच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरांनी उसळी घेतलेली पाहायला दिसली. हा सारा आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम आहे. येणाऱ्या काळात या दरात अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन (The price of 24 carat gold is 50,900 per 10 grams in Nashik)

इतर बातम्याः

बहीण-भावाच्या अंगावर पाण्याची टाकी कोसळली; नाशिकमध्ये 4 वर्षांची मुलगी ठार

Good News: रब्बीच्या पेरणीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला देत हा खासदार म्हणाला... अर्धवटराव
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला देत हा खासदार म्हणाला... अर्धवटराव
आमदाराची पोलीस निरीक्षकाला सस्पेंड करण्याची धमकी, कारण अगदीच शुल्लक
आमदाराची पोलीस निरीक्षकाला सस्पेंड करण्याची धमकी, कारण अगदीच शुल्लक
पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
पंकजा मुंडे यांच्या नाराजीची भाजपकडून दखल, बावनकुळे स्पष्ट म्हणाले...
पंकजा मुंडे यांच्या नाराजीची भाजपकडून दखल, बावनकुळे स्पष्ट म्हणाले...
MPSC परीक्षा पास पण हाकतोय मेंढ्या, पण का? व्हिडीओ होतोय व्हायरल
MPSC परीक्षा पास पण हाकतोय मेंढ्या, पण का? व्हिडीओ होतोय व्हायरल
बहिणीसाठी भाऊ पुढं सरसावला, पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडेंनी काय केलं?
बहिणीसाठी भाऊ पुढं सरसावला, पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडेंनी काय केलं?
आधी लगीन कोंढाण्याचं.. बाप्पासाठी तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक देखावा
आधी लगीन कोंढाण्याचं.. बाप्पासाठी तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक देखावा
मोबाईल चार्जिंगला लावून दुर्लक्ष करताय? मग काळजीपूर्वक बघा व्हिडीओ
मोबाईल चार्जिंगला लावून दुर्लक्ष करताय? मग काळजीपूर्वक बघा व्हिडीओ
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी २१ फुटी रथ, बघा रथाची पहिली झलक
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी २१ फुटी रथ, बघा रथाची पहिली झलक
चिखलात लोळून लोकांनी कुठं केलं आंदोलन? आक्रमक स्थानिकांची मागणी काय?
चिखलात लोळून लोकांनी कुठं केलं आंदोलन? आक्रमक स्थानिकांची मागणी काय?