‘आजी आजोबा’ आणि ‘नातू’ यांच्यातील नाते सांगणारा ‘हा’ दिवस आता शाळेतही होणार साजरा

सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात.

'आजी आजोबा' आणि 'नातू' यांच्यातील नाते सांगणारा 'हा' दिवस आता शाळेतही होणार साजरा
GRANDFATHER DAYImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 11:44 AM

मुंबई : आजी, आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते. नातवाचे पहिले मित्र हे आजी आजोबाच असतात. नात्याची खरी जडण घडण तिथूनच होत असते. आजी आजोबांच्या या घट्ट नात्याची ओळख नातवांशी होणे हे आजच्या काळात महत्वपूर्ण आहे. पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे नाते गरजेचे आणि प्रेरणादायी आहे यासाठी शिंदे फडणवीस सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे. दरवर्षीं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येणारा ‘आजी आजोबा’ दिवस आता राज्यातील शाळांमध्ये साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासंदर्भात सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

१० सप्टेंबर २०२३ रोजी ‘आजी आजोबा’ दिवस आहे. या दिवशी राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. त्यांनतर प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करण्यात यावा. या दिवशी शासकीय सुट्टी आल्यास त्याच्या पुढच्या कार्यालयीन दिवशी ह्या दिवसाचे कार्यक्रम घेण्यात यावेत. तसेच, प्रस्तावित दिवशी कार्यक्रम घेता आला नाही तर शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस ‘आजी आजोबा’ दिवस साजरा करावा असा निर्णय सरकारने घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

शाळेतील अनुभव यासह आजी आजोबांचे अनुभव, त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती पाल्यांना मिळणे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख करून देणे, शाळेबरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी ‘आजी आजोबा’ दिवस साजरा होणे आवश्यक आहे असे या शासन निर्णयात म्हटले आहे.

आजी आजोबांकरिता हे उपक्रम राबविणार

  • विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करून द्यावा.
  • आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावे.
  • विटीदांडू, संगीत खुर्ची असे खेळ ठेऊन बालपणीच्या आठवणी ताज्या करता येतील.
  • आजी आजोबांसोबत शाळेतील शिक्षकांचाही सहभाग असावा
  • पारंपरिक वेशभूषेमध्ये आजी आजोबा यांना बोलवावे. ( ऐच्छीक बाब )
  • महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करणे.
  • आपल्या लाडक्या आजी आजोबांसाठी विद्यार्थ्यांनीही कलाकृती सादर करावी.
  • आजीच्या बटव्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे.
  • झाडे लावणे व पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे.
Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.