Maharashtra : ओमिक्रोन व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका? देशासह राज्यात पुन्हा निर्बंध लागणार?

कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर आता कुठे उद्योगधंदे पूर्वपदावर येत होते. त्यातच या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री झाल्यानं पुन्हा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. गेल्या लॉकडाऊनचा पोल्ट्री व्यवसायला सर्वात मोठा फटका बसला होता. काही काळ वाहतूक ठप्प झाल्यानं त्याचाही फटका अनेक उद्योधंद्यांना व्यापाऱ्यांना बसला. 

Maharashtra : ओमिक्रोन व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका? देशासह राज्यात पुन्हा निर्बंध लागणार?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 12:38 PM

दक्षिण अफ्रिकेत आढळेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं महाराष्ट्राचीही चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं हाय अलर्ट जारी केला आहे. देशात आणि राज्यात पहिला लॉकडाऊन झाल्यानंतर त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला होता. कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त उद्योगधंदे आहेत. लॉकडाऊन झाल्यानं उद्योगधंदे बंद झाले. छोट्या व्यापाऱ्यांनाही त्याचा सर्वाधिक फटका बसला.

नव्या व्हेरिएंटचा राज्याला किती धोका?

कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर आता कुठे उद्योगधंदे पूर्वपदावर येत होते. त्यातच या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री झाल्यानं पुन्हा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. गेल्या लॉकडाऊनचा पोल्ट्री व्यवसायला सर्वात मोठा फटका बसला होता. चिकन खाल्यानं कोरोना होतो अशा अफवा पसरल्यानं पोल्ट्री व्यवसायाचं मोठा नुकसान झालं होतं. काही काळ वाहतूक ठप्प झाल्यानं त्याचाही फटका अनेक उद्योधंद्यांना व्यापाऱ्यांना बसला.

शेतकऱ्यांना मोठा फटका

पहिल्या लॉकडाऊमध्ये शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारापर्यंत पोहोचत नव्हता त्यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. लाखो रुपयांचा शेतमाल शेतात सडून गेला. त्यामुळे बळीराजा पुन्हा कर्जबाजारी झाला.

छोट्या व्यापाऱ्यांना किती धोका?

गेल्या लॉकडाऊननं छोट्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं.  काही व्यावसाय जे बुडाले ते आजपर्यंत पुन्हा उभे राहिले नाहीत. आता कुठे कोरोना रुग्णाची संख्या कमी झाल्यानंतर नियम शिथील करण्यात आले होते. लोक घरातून बाहेर पडू लागले होते. कामधंदे पुन्हा सुरू झाले होते. नव्या व्हेरिएंटचा फटका जागतिक बाजाराला तर बसलाच आहे, पण महाराष्ट्राला आणि देशाला याचा किती फटका बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी रॉयच्या कातीलाना अदा, फोटो पाहून चाहत्यांच्या नजराही खिळल्या!

Shivendraraje | पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडू नये; शिवेंद्रराजे, शशिकांत शिंदे यांच्यात जुंपली

कुर्ल्यात 20 वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, इन्स्टा व्हिडीओ शूटिंगसाठी गेलेल्या तरुणांना आढळला मृतदेह