बदलापूरच्या शिक्षकावर उपासमारीची वेळ; कुटुंबासह आत्महत्येची मागितली परवानगी

पंकज बेद्रे असं या आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकाचं नाव आहे. बेद्रे हे गेल्या तीन वर्षांपासून अंबरनाथ तालुक्यातील काराव आदिवासी आश्रमशाळेत कायमस्वरूपी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत होते.

बदलापूरच्या शिक्षकावर उपासमारीची वेळ; कुटुंबासह आत्महत्येची मागितली परवानगी
pankaj bedre

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील काराव इथल्या आदिवासी आश्रमशाळेतील एका शिक्षकाचा पगार गेल्या वर्षभरापासून रखडलाय. त्यामुळे या शिक्षकांसह त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, या शिक्षकानं आता शेवटचा पर्याय म्हणून कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी मागितलीय.

आदिवासी आश्रमशाळेत कायमस्वरूपी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत

पंकज बेद्रे असं या आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकाचं नाव आहे. बेद्रे हे गेल्या तीन वर्षांपासून अंबरनाथ तालुक्यातील काराव आदिवासी आश्रमशाळेत कायमस्वरूपी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र कोरोना काळात 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यानं विज्ञान शाखेचे दोन्ही वर्ग आश्रमशाळेने बंद केले. त्यामुळे आश्रमशाळेला सरकारी अनुदान असलं तरी बेद्रे यांचं वेतन मात्र शासनानं थांबवलं. या गोष्टीला आता वर्ष उलटून गेलं, तरी शासनाच्या सेवेत कायमस्वरूपी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या बेद्रे यांना पगारच मिळालेला नाही.

बेद्रे बदलापुरात पत्नी आणि दोन लहान मुलांसह भाड्याच्या घरात वास्तव्याला

बेद्रे यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलीय. बेद्रे हे बदलापुरात पत्नी आणि दोन लहान मुलांसह भाड्याच्या घरात वास्तव्याला आहेत. मात्र पगारच नसल्यानं घरभाडे, मुलांची शाळेची फी, घरखर्च यासाठी त्यांच्यावर उसनवारी करण्याची वेळ आलीये. यामुळे त्यांच्यावर मोठं कर्ज झालं असून त्यांनी अक्षरशः बायकोचं मंगळसूत्रही गहाण ठेवलंय. त्यामुळं आता यापुढे घर चालवणंही कठीण असल्याची उद्विग्न भावना बेद्रे व्यक्त करतायत.

तरीही माझं वेतन बंद करण्यात आलं, बेद्रेंची उद्विग्न भावना

आपण शासनाच्या सेवेतील कायमस्वरूपी शिक्षक असून एखादा वर्ग अतिरिक्त झाल्यास त्या शिक्षकांचं वेतन बंद न करता येत नाही. त्यांचं समायोजन होईपर्यंत वेतन सुरू ठेवावं, असा शासनाचा आदेश आहे. मात्र तरीही माझं वेतन बंद करण्यात आलं, असं बेद्रे यांचं म्हणणं आहे. आपली दुसऱ्या एखाद्या शाळेत नेमणूक करावी, आणि आपलं वेतन सुरू करावं, यासाठी आदिवासी विभागाशी पत्रव्यवहार करूनही आपल्याला न्याय मिळाला नाही, त्यामुळे आता मला घर चालवणं कठीण झालं असून आता परिवारासह आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, असं पत्र बेद्रे शासनाला लिहिलंय. त्यामुळं शासनदरबारी त्यांची दखल घेतली जाते का? हे आता पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या

वर्षातील 12 महिने चिखलातून प्रवास, शहापूरमधील ‘या’ गावात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ताच नाही

एमआयएमच्या शहराध्यक्षावर खंडणी आणि बलात्काराचे आरोप, इम्तियाज जलील यांची एसआयटी चौकशीची मागणी

Time of starvation on Badlapur teacher; Permission sought to commit suicide with family

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI