AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज, पाणी, घर नाही, सहा महिने उलटूनही तिवरे धरणग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन नाही

काही महिन्यांपूर्वीच चिपळून येथे तिवरे धरण फुटलं होते. त्यामुळे संपूर्ण गावा पाण्याखाली गेले होते. काही क्षणात अनेकांच्या संसाराची राख (Tivre Dam rehabilitation)  रांगोळी झाली.

वीज, पाणी, घर नाही, सहा महिने उलटूनही तिवरे धरणग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन नाही
| Edited By: | Updated on: Jan 13, 2020 | 3:58 PM
Share

रत्नागिरी : काही महिन्यांपूर्वीच चिपळून येथे तिवरे धरण फुटलं होते. त्यामुळे संपूर्ण गावा पाण्याखाली गेले होते. काही क्षणात अनेकांच्या संसाराची राख (Tivre Dam rehabilitation)  रांगोळी झाली. यामध्ये अनेकांची घरं वाहून गेली होती. त्यासोबतच अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले होते. या घटनेला आज सहा महिने उलटूनही अद्याप सरकारकडून प्रकल्पग्रस्तांना हक्काचे घर मिळालेलं (Tivre Dam rehabilitation) नाही.

तिवरे धरणात ज्यांची घरं वाहून गेली आहेत त्यांना सरकारने तात्पुरते राहण्यासाठी कंटेनरची व्यवस्था करुन दिली आहे. पण या कंटेनरमध्येही वीज, पाण्यीची पुरेशी सोय नाही. त्याोसबतच ते मदतीसाठी आपलं धान्यही पुरवून खात आहेत.

या घटनेत एक 70 वर्षीय आजीनेही आपल्या व्यथा मांडल्या आहेत. या घटनेपूर्वीच आजीची मुलं देवाघरी गेली होती. सध्या त्या एकट्या राहत आहेत. आजींचेही पुनर्वसन झाले. पण व्यवस्थित चालता न येणाऱ्या आजीला अगदी टोकाला कंटेनर दिला आहे. ज्यामुळे त्यांना येजा करण्यास त्रास होत आहे. त्याोसबतच कंटेनरमध्ये दिलेला टेकू सुद्ध अगदी तकलादू आहे. त्यामुळे इथे राहण्यासाठी भीती वाटते, अशी खंत आजींनी व्यक्त केली.

राधिका आजीप्रमाणे या गावातील हिराबाई कनावजे यांचीही परिस्थिती वाईट आहे. कुटुंबात दहा लोकं पण राहायला एकच कंटेनर दिला आहे. तिवरे धरणात कनावजे यांचे घर सुद्धा वाहून गेले होते. तिवरे धरण फुटीत रेशन कार्डही वाहून गेले. त्यामुळे रेशन दुकानावर मिळणारे धान्य बंद झाले. आता जगायचे कसे असा प्रश्न हिराबाईसमोर उभा आहे.

“तिवरे धरण फुटीनंतर आज पाच कुटुंबीय कंटेनरमध्ये राहत आहेत. पुर्नवसन फक्त नावापुरतेच आहे”, असा आरोप इथल्या स्थानिकांनी केला आहे.

तिवरे धरणग्रस्तांच्या व्यथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी समाजून घेतल्या असून लवकरच यावर सर्व प्राथमिक सुविधा तात्काळ पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.