Thane Drive in Vaccine | ठाण्यातही ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र, कुठे सोय? नियम आणि अटी काय?

लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह इन' सुविधा ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली (Drive in Vaccination center Thane)

Thane Drive in Vaccine | ठाण्यातही 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्र, कुठे सोय? नियम आणि अटी काय?
Photo Courtesy : BMC Instagram
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 7:59 AM

ठाणे : ठाणे शहरातील विवियाना मॉलच्या (Viviana Mall Thane) पार्किंगमध्ये फक्त नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र (Drive in Vaccination) आजपासून सुरु करण्यात येत आहे. केवळ 100 ज्येष्ठ नागरिकांनाच दुपारी 2 ते 5 या वेळेत कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. केंद्रावर फक्त कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार असून ज्या नागरिकांनी पहिल्या डोससाठी नोंदणी केली आहे, त्यांना लस देण्यात येणार नाही. तरी त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (TMC set up Drive in Vaccination center at Viviana Mall in Thane for Senior Citizens)

कुठे मिळणार?

ठाणे शहरात लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह इन’ सुविधा ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. विविनाना मॉलच्या पार्किंगमध्ये लसीकरण केंद्रावर रोज नोंदणी केलेल्या 100 ज्येष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस देण्यात येणार आहे.

वयाचे बंधन काय?

ही सुविधा 60 वर्षांवरील नागरिकांसाठीच असून लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच कोरोना लसीचा फक्त दुसऱ्या डोसच या केंद्रावर घेता येणार आहे. तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे.

केवळ दुसरा डोस

विवियाना मॉलच्या पार्किंगमधील लसीकरण केंद्रावर नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांनाच कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी पहिल्या डोससाठी नोंदणी केली आहे, त्यांना लस देण्यात येणार नाही. तरी त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ म्हणजे काय?

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे न राहता लस घेता यावी, या उद्देशाने ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी ज्यांना लस घ्यायची आहे, त्यांनी एका पार्किंग गेटने आत जायचे. त्यानंतर गाडीमध्येच बसून लस घ्यायची आणि मग वेगळ्या एक्झिट पॉईंटमधून बाहेर पडायचे, असा ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा प्लॅन असतो. (TMC set up Drive in Vaccination center at Viviana Mall in Thane for Senior Citizens)

ठाण्यात ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र – महत्त्वाचे प्रश्न

कुठे मिळणार? : ठाणे शहरात विविनाना मॉलच्या पार्किंगमध्ये महापालिकेतर्फे लसीकरण केंद्र

किती जणांना मिळणार? : दररोज नोंदणी केलेल्या 100 ज्येष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस

वयाचे बंधन काय? : केवळ 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीच उपलब्ध

कोणती लस मिळणार? : कोविशिल्ड

पहिला डोस घेऊ शकतो का? : केवळ दुसरा डोस मिळणार, पहिला डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही मुभा नाही

थेट केंद्रावर जायचे का? : ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक, थेट प्रवेश नाही

संबंधित बातम्या :

मुंबईकरांनो लक्ष द्या, ‘कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’नुसारच लसीकरण

मुंबईत प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण होणार, तुमच्या जवळचे केंद्र बघा

(TMC set up Drive in Vaccination center at Viviana Mall in Thane for Senior Citizens)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.