AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Somnath Suryawanshi : सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी मुंबईच्या दिशेने

Somnath Suryawanshi : आंबेडकरी अनुयायांनी लॉन्ग मार्च काढला आहे. आज या लाँग मार्चचा दुसरा दिवस आहे. शुक्रवारी सायंकाळी परभणीतून या लाँग मार्चला सुरुवात झाली. काल कुंभकर्ण टाकळी येथे पहिला मुक्काम जिल्हा परिषद शाळेत होता.

Somnath Suryawanshi :  सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी मुंबईच्या दिशेने
Long March
| Updated on: Jan 18, 2025 | 9:39 AM
Share

आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च काढला आहे. आज लॉन्ग मार्चचा दुसरा दिवस आहे. परभणीत संविधान अवमाननेच्या घटनेनंतर आंदोलन झालं होतं. या आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी तसच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबांच शासनाने पूर्नवसन करावं. त्यांना वाढीव आर्थिक मदत द्यावी. निरपराध युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांनी लॉन्ग मार्च काढला आहे. आज या लाँग मार्चचा दुसरा दिवस आहे. शुक्रवारी सायंकाळी परभणीतून या लाँग मार्चला सुरुवात झाली. काल कुंभकर्ण टाकळी येथे पहिला मुक्काम जिल्हा परिषद शाळेत होता.

आज दुसऱ्यादिवशी काही वेळात लॉन्ग मार्च जिंतूर तालुक्यातील बोरी कडे रवाना होणार आहे. मोठ्या प्रमाणावर आंबेडकर अनुयायी मार्चमध्ये सहभागी झालेत. त्यामध्ये महिलांचाही सहभाग आहे. परभणी ते मुंबई असा लाँग मार्च आयोजित करण्यात आलेला आहे. रस्त्यामध्ये लॉन्ग मार्चमध्ये अनेक अनुयायी सहभागी होत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची प्रमुख मागणीसाठी लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे.

…म्हणून लॉन्ग मार्चचा निर्णय

कुंभकर्ण टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेतच लाँग मार्चमध्ये सहभागी असलेल्या अनुयायांसाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था स्थानिकांकडून केली जात आहे. काही वेळात मार्च जिंतूर तालुक्यातील बोरीकडे निघणार आहे. या लॉन्ग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने महिला, युवक, आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. मागच्या 33 दिवसांपासून परभणीत आंदोलन सुरु होतं. पण शासनाकडून मागण्यांची दखल घेतली गेली नाही. म्हणून आंदोलकांनी अखेर परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च काढण्याचा निर्णय घेतला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. ही मदत सुपूर्द करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी त्यांच्या कुटुंबियांना भेटले. पण जो पर्यंत दोषी पोलिसांवर कारवाई होत नाही, तो पर्यंत मदत स्वीकारण्यास कुटुंबाने नकार दिला आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल