TOP 9 Headlines | 03 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणावरही मोठा निर्णय झाला आहे. यावरून विरोधक आणि सत्ताध्याऱ्यांमध्ये जोरदार घमासान झाले आहे. त्याच मोठ्या बातम्यांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.

TOP 9 Headlines | 03 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
आजच्या मोठ्या बातम्या
Image Credit source: tv9
| Updated on: Mar 03, 2022 | 6:27 PM
  1. सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारची खरडपट्टी, मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरुन ताशेरे, जोपर्यंत OBC आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत निवडणुका नाही; मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब, भाजपचीही राजकीय आरक्षणावरुन सडकून टीका https://bit.ly/3pveUAL
  2. अभिभाषण पटलावर ठेवून राज्यपालांचा सभागृहातून काढता पाय, राष्ट्रगीतालाही न थांबल्यानं सत्ताधाऱ्यांची राज्यपालांवर टीका, तर खाली डोकं वर पाय करत राष्ट्रवादी आमदाराच निषेधासन…. https://bit.ly/34f1eCQ
  3. नवाब मलिकांना दिलासा नाही! 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी, तर मलिकांविरोधात भाजप आक्रमक, संजय राठोडचा राजीनामा घेतलात तर मग मलिकांचा का नाही? फडणवीसांचा सवाल https://bit.ly/3puTfZC
  4. विधिमंडळात घमासान; सभागृहाबाहेर दोस्ती, मिलिंद नार्वेकर आणि शेलारांचे गूत्फगू कॅमेऱ्यात कैद, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://bit.ly/3pu5buL
  5. अखेर नाशिक महापालिकेवर प्रशासक, तर औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, निवडणुकांबाबत नेमका निर्णय काय? वाचा https://bit.ly/3vANuNK
  6. उद्ध्वस्त घरं, भुताटकी रस्ते, एकीकडे आकाशात शत्रूच्या घिरट्या तर दुसरीकडे चिमुकल्यांचा टाहो! बेचिराख यूक्रेनचे अस्वस्थ करणारी दृश्यं, वाचा रशिया युक्रेन युद्धाचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3IHGVwF
  7. पालघरच्या केळवे समुद्रात 6 जण बुडाले, एकाला वाचवण्यात यश, तिघे बेपत्ता तर एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्येनं यवतमाळ हादरलं https://bit.ly/3hAcH2Y
  8. ‘गंगुबाई’ची कमाल, सहा दिवसात कमाई सहा दशकांपार, आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल! तर नागराज दिग्दर्शित ‘झुंड’मधील ओरीजनल बच्चन टीव्ही 9वर..https://bit.ly/3vAMZDm
  9. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग XI बद्दल रोहितच मौन, विराटच्या 100 व्या कसोटीवर मोठं वक्तव्य, तर भारताला धास्ती चार श्रीलंकन फलंदाजांची…https://bit.ly/3pxkVgk