AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूशय्येवर पडलेल्या बिबट्याला नाशिकमध्ये जीवदान, प्राणीप्रेमींचे कौतुकास्पद काम, आपणही आदर्श घ्यावा…!

नाशिकमध्ये टीक पॅरालीसिस या जीवावर बेतणाऱ्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या बिबट्या मादीला वनविभाग, पशुधन विकास अधिकारी आणि प्राणीमित्र संघटना यांनी एकत्रित मिळून जीवदान मिळवून दिले आहे.

मृत्यूशय्येवर पडलेल्या बिबट्याला नाशिकमध्ये जीवदान, प्राणीप्रेमींचे कौतुकास्पद काम, आपणही आदर्श घ्यावा...!
नाशिकमध्ये मृत्यूकडे वाटचाल करणाऱ्या बिबट्यावर उपचार करून प्राणीमित्रांनी त्याला जीवदान दिले आहे.
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 11:51 AM
Share

नाशिकः अशा घटना दुर्मिळ असतात. अशी मदत करणारी माणसेही दुर्मिळ असतात. अशीच घटना घडली नाशिकमध्ये. अशी माणसंही सापडलीही इथेच. त्याचे झाले असे की, नाशिकमध्ये टीक पॅरालीसिस या जीवावर बेतणाऱ्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या बिबट्या मादीला वनविभाग, पशुधन विकास अधिकारी आणि प्राणीमित्र संघटना यांनी एकत्रित मिळून जीवदान मिळवून दिले आहे. या साऱ्यांनी या बिबट्या मादीवर उपचार केले. ती आता ठणठणीत झाली आहे. मात्र, हे वाटते तितके सोपे काम नव्हते.

अर्धे शरीर लुळे…

नाशिक आणि बिबट्या हे समीकरण काही वेगळे नाही. मागील काही वर्षांमध्ये बिबट्यांचे मानवीवस्ती सोबतच शहराकडे देखील वावरण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून अनेकवेळा बिबट्या आणि मानवी संघर्ष देखील पाहायला मिळाला. यातच एका नैसर्गिक आजाराने ग्रस्त बिबट्यावर वनविभाग, प्राणी मित्र संघटना व पशुधन विकास अधिकारी यांनी मिळून यशस्वी उपचार करून त्याला जीवनदान दिले. नाशिकरोड भागात हा बिबट्या आढळून आला होता. आजाराने ग्रस्त असलेल्या या बिबट्याचे अर्धे शरीर हे निकामी झाल्याने चालणे देखील मुश्किल असल्याचे समोर आले होते. त्यामुळे बिबट्याला ताब्यात घेत त्याच्यावर उपचार करण्यात आले, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली.

उपचारानंतर सोडले…

खरे तर बिबट्यांमध्ये हा आजार क्वचित आढळून येतो. मात्र, या आजारावर वेळीच उपचार झाला नाही, तर बिबट्याचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. तर वेळीच उपचार मिळाल्याने या मादी बिबट्याला जीवनदान देणे शक्य झाल्याचे यावेळी बिबट्यावर उपचार करणारे पशुधन विकास अधिकारी डॉ. सचिन वेंधे आणि डॉ. संदीप पवार यांनी सांगितले. उपचाराअंती बिबट्या ठणठणीत झाला. त्याला चालता येऊ लागले. त्यानंतर या मादीला अधिवासात सोडून देण्यात आले, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.

वन्यजीवांकडून शिका…

खरे पाहिले गेले तर बिबट्या हा हिंस्त्र प्राणी असल्याने त्याला संभाळणे आणि त्यावर उपचार करणे अत्यंत कठीण बाब होती. यावेळी वनविभागासोबतच इको-इको या प्राणीमित्र संघटनेनेही बिबट्याला ताब्यात घेण्यापासून ते त्यावर यशस्वी उपचार करण्यापर्यंत वेळोवेळी चांगले सहकार्य केले. वाढते शहरीकरण आणि उद्धवस्त होणारी जंगले यामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे भक्ष्याच्या शोधात येत आहेत. वन्यजीवांना काही पर्यायच उरला नसल्याने ते मानवी वस्तीत शिरत आहेत. त्यामुळे मानावाने देखील या वन्य जीवांसोबत कसे सहजीवन जगात येतील, हे या वन्यजीवांकडून शिकावे, असे आवाहन प्राणीमित्रांनी केले आहे.

इतर बातम्याः

Maharashtra Assembly Speaker Election: महाविकास आघाडीपाठोपाठ भाजपचा आमदारांना व्हीप; विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार?

Video: कठीण आहे काँग्रेसचं? स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा खाली पडला, सोनिया गांधीही बघत राहिल्या

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.