AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस सरकारला आंदोलकांनी घेरलं, आदिवासी विद्यार्थीही मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघणार का?

फडणवीस सरकारला विविध आंदोलकांनी घेरलं आहे. आता आदिवासी विद्यार्थीही मुंबईत पोहोचले असून ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

फडणवीस सरकारला आंदोलकांनी घेरलं, आदिवासी विद्यार्थीही मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघणार का?
devendra fadnavis government news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 10:26 AM
Share

राज्यात आंदोलकांचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आजपासून उपोषणाला बसणार आहे. ओबीसी समर्थकांनी आंदोलनाचा नारा दिला आहे. त्यापाठापोठ आदिवासी विद्यार्थ्यांचं विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलक आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बैठकीत तोडगा निघणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पहाटे मुंबईकडे रवाना झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे. आज होणाऱ्या बैठकीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. विद्यार्थी आपल्या मागण्यांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत 10 वाजता चर्चा करणार आहे. त्यात नागपुरात आज सहाव्या दिवशीही आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा होईल. त्यामुळे चर्चेकडे नागपूरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागलं आहे. “मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या तर आम्ही आंदोलन मागे घेऊ, असे आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे.

विद्यार्थी आंदोलनावर ठाम 

सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. नोकरभरतीसह विविध २९ मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. नागपूर आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

अमरावतीहून आदिवासी विद्यार्थी थेट यवतमाळमध्ये

अमरावतीहून यवतमाळमध्ये आलेल्या आदिवासी विद्यार्थीच्या मागण्यासंदर्भात आदिवासी विकास विभाग सकारात्मक आहे. यवतमाळच्या बाभूळगाव बाजार समितीत आलेल्या विद्यार्थ्यांची काल आदिवासी विकास मंत्र्यांशी भेट झाली. त्यानंतर आज सकाळी आदिवासी विकास विभागाचे अधिकाऱ्यांकडून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आदिवासी विकास विभागाने विद्यार्थ्यांना लेखी स्वरुपात आश्नासन दिलं. त्यानंतर त्यांनी आंदोलन थांबवून पुन्हा अमरावतीकडे जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Follow Us