AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरातला आमदार करण्यासाठी…तृप्ती देसाईंच्या नव्या दाव्याने खळबळ; थेट नाव घेत म्हणाल्या…

मंत्रिपद मिळावे यासाठी भविष्य पाहण्याकरिता नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरातची भेट घेतली होती, असा दावा केला जातोय. या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले आहे. आता तृप्ती देसाई यांनी आणखी मोठा दावा केला आहे.

अशोक खरातला आमदार करण्यासाठी...तृप्ती देसाईंच्या नव्या दाव्याने खळबळ; थेट नाव घेत म्हणाल्या...
ashok kharat and trupti desai and neelam gorheImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 30, 2026 | 9:43 PM
Share

Trupti Desai : भोंदू अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. कित्येक महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपखाली सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याविरोधात एकूण 10 गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मंत्रिपद मिळावं यासाठी भविष्य पाहण्यासाठी खरातची भेट घेतली होती, असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन हा दावा फेटाळला आहे. आता नीलम गोऱ्हे यांच्या पत्रकार परिषदेनंतर तृप्ती देसाई यांनी गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नीलम गोऱ्हे खोटं बोलत आहेत, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

खरातला भेटलेच नसल्याचा दावा खोटा

नीलम गोऱ्हे या खोटं बोलत आहेत. नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरात याला हात दाखवला होता. गोऱ्हे यांनी आपलं भविष्य पाहिलं होतं. मात्र मी अशोक खरात यांना भेटलेच नाही असं त्या खोटं बोलत आहेत, असा थेट दावा देसाई यांनी केला आहे. तसेच, पत्रकार परिषदेमध्ये नीलम गोऱ्हे चक्क वाचून दाखवत आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण भेटलो का नाही हे सांगताना वाचून बोलण्याची काय गरज? असा रोखठोक सवालही त्यांनी केलाय.

खरातला आमदार करण्याची शिफारस तर..

एवढ्या अभ्यासू असलेल्या नीलमताई एवढं खोटं बोलत असतील असं वाटलं नव्हतं, अशी खंतही देसाई यांनी व्यक्त केली. ज्या पद्धतीने नीलम गोऱ्हे या खोटे बोलत आहेत यावरून असं वाटतंय की गोऱ्हे या स्वतःला मंत्रिपद मिळवण्यासाठी आणि अशोक खरातला आमदार करण्याची शिफारस त्यांनी पक्षप्रमुखाकडे केली असेल, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, आता तृप्ती देसाई यांच्या या दाव्यानंतर नीलम गोऱ्हे नेमकं काय प्रत्युत्तर देणार? तृप्ती देसाई आपला दावा खरा असल्याचे सांगताना एखादा पुरावा समोर आणणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात