AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात

Tukaram Mundhe: नाशिकमध्ये खाद्यतेल व्यापाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. तुकाराम मुंडे यांच्या सुट्टे खाद्यतेल विक्रीबंदीच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी मोठे पाऊल उचलले आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात
तुकाराम मुंढेImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 24, 2026 | 8:49 AM
Share

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या राज्यात चर्चेत आहेत. ते करत असलेल्या धडाकेबाज कारवाईने अनेकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या कारवाईची दहशत अनेक ठिकाणी पाहायला मिळाली. पण तुकाराम मुंढे यांनी नाशिकमध्ये केलेल्या कारवाईची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या कारवाईच्या विरोधात अनेक व्यापारी एकवटले आहेत. तसेच त्यांनी आवाज देखील उठवला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नाशिकमध्ये खाद्यतेल व्यापाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. तुकाराम मुंडे यांच्या सुट्टे खाद्यतेल विक्रीबंदीच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी एकजुटीने आवाज उठवला. बैठकीत व्यापाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा निर्णय लहान व्यावसायिकांना आर्थिक संकटात ढकलणारा आहे. व्यापाऱ्यांनी ठरवले आहे की, तुकाराम मुंडे यांच्या निर्णयाला ते न्यायालयात आव्हान देतील. त्याचबरोबर राज्य सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कालावधीत निर्णय मागे न घेतल्यास राज्यातील सर्व खाद्यतेल व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला. केवळ राज्य सरकारपुरते मर्यादित न राहता केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

“आम्ही अतिरेकी आहोत का?”

बैठकीत व्यापाऱ्यांनी दंड आणि कारावासाच्या तरतुदीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “१० लाख रुपये दंड आणि कारावासाची तरतूद पूर्णपणे अन्यायकारक आहे. आम्ही अतिरेकी आहोत का?” असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, सुट्टे तेल विक्री हा अनेक वर्षांपासून चालत आलेला व्यवसाय असून, अचानक बंदी घातल्याने हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडणार आहेत.

नाशिकमध्ये झालेल्या या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांतील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. व्यापाऱ्यांनी सांगितले की, ग्राहकांनाही सुट्टे तेल स्वस्त दरात उपलब्ध होते. बंदीमुळे पॅक्ड ऑइलची किंमत वाढेल आणि सामान्य ग्राहकांवर अतिरिक्त भार पडेल. त्यामुळे सरकारने व्यापारी आणि ग्राहक दोघांच्या हिताचा विचार करून निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली.

व्यापारी संघटनांनी आता पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. १५ दिवसांच्या कालावधीनंतर आंदोलनाचा फॉर्म काय असेल, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. नाशिकमधील या बैठकीने राज्यभरातील खाद्यतेल व्यापाऱ्यांमध्ये एकजुटीची भावना निर्माण केली आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु