AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेच नंबर 1, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मागं टाकलं, काय घडलं?

Tukaram Mundhe Social Media: महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात आपल्या कडक शिस्तीसाठी जे ओळखले जातात ते अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची आता सोशल मीडियावरही जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे.

Tukaram Mundhe: आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेच नंबर 1, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मागं टाकलं, काय घडलं?
| Updated on: Aug 27, 2026 | 9:38 AM
Share

Tukaram Mundhe FDA: महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात आपल्या कडक शिस्तीसाठी जे ओळखले जातात ते अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची आता सोशल मीडियावरही जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्राम असो वा ‘X’ (ट्विटर), फॉलोअर्सची संख्या आणि पोस्टवर मिळणारा डिजिटल प्रतिसाद पाहिला तर  मुंढेंचा प्रभाव अधिक ठळकपणे समोर येत आहे. राजकीय नेत्यांपेक्षा मुंढे यांची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत. अन्न व औषध प्रशासाचे आयुक्त पद जेव्हा पासून त्यांनी सांभाळले आहे तेव्हापासून ते चर्चेचा विषय बनला आहे. अगदी कमी कालावधीत त्यांनी आपल्या कामाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

कमी पोस्ट्स आणि प्रचंड प्रतिसाद यामुळे तुकाराम मुंढे हे केवळ एक अधिकारी राहिले नाही, तर सोशल मीडियावरील एक मोठा ‘डिजिटल ब्रँड’ ते बनले आहेत. अनेक लोक त्यांच्या कार्यावर रिल बनवत आहे आणि सोशल मीडियावर शेअर करत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी अनेक रिल स्टार त्यांच्यावर रिल, व्हिडिओ बनवत आहे. त्यांच्या फोटोंवर, व्हिडिओवर अनेक लाईक्स, कमेंट्सचा वर्षावही होत आहे.  त्यामुळे सोशल मीडिया रीच आणि एंगेजमेंट रेटमध्ये त्यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मागे टाकले आहे.

Instagram Data : इन्स्टाग्रामवर मुंढे ‘नंबर वन’! इन्स्टाग्रामवरील आकडेवारीनुसार तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फॉलोअर्स आणि एंगेजमेंट या दोन्ही बाबतीत मागे टाकल्याचे समोर येत आहे

इन्स्टाग्राम फॉलोअर्स : तुकाराम मुंढे : ३४ लाख १५ हजार देवेंद्र फडणवीस : २९ लाख २ हजार एकनाथ शिंदे : १३ लाख १ हजार

मागील 60 दिवसांतील पोस्ट्स : तुकाराम मुंढे (१३), देवेंद्र फडणवीस (९७), एकनाथ शिंदे (२५).एंगेजमेंट रेट :
तुकाराम मुंढे : २०.३५ टक्के देवेंद्र फडणवीस : ०.५० टक्के एकनाथ शिंदे : ०.२४ टक्केX Platform Analysis :  ‘X’ (ट्विटर) वर राजकीय नेत्यांचे फॉलोअर्स अधिक असले तरी प्रतिसादाच्या बाबतीत मुंढेंची आघाडी जास्त असल्याचे दिसून येते.X फॉलोअर्स : देवेंद्र फडणवीस (५.०२ लाख) एकनाथ शिंदे (३.८७ लाख) तुकाराम मुंढे (२.६५ लाख).

X एंगेजमेंट रेट : तुकाराम मुंढे : ४.६२ टक्के देवेंद्र फडणवीस : ०.०७ टक्के एकनाथ शिंदे : ०.०४ टक्के

ऑफिसर इन्स्टाग्राम फॉलोअर्स :  तुकाराम मुंढे – ३४.१५ लाख समीर वानखेडे – ८.४७ लाख विश्वास नांगरे पाटील – ६.१२ लाख.

इन्स्टाग्राम एंगेजमेंट :  तुकाराम मुंढे – २०.३५% विश्वास नांगरे पाटील – ३.६०% समीर वानखेडे – ३.२०%.

तुकाराम मुंढे यांचे अधिकृत व्हेरिफाइड फेसबुक पेज उपलब्ध नसल्याने फेसबुकच्या आकडेवारीची थेट तुलना करता येत नाही. पण जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यावरुन एक गोष्ट स्पष्ट दिसते. फॉलोअर्सची संख्या एक गोष्ट असली तरीही आणि त्या फॉलोअर्सचा प्रत्यक्ष प्रतिसाद मिळवणं हे महत्त्वाचे आहे. अनेकांनाकडे मोठ्या संख्येने फॉलोअर्स असतील  पण तुकाराम मुंढेंच्या पोस्टवर एंगेजमेंट रेट (Engagement Rate) मोठ्या प्रमाणात दिसत आहे. नेते विरुद्ध अधिकारी या तुलनेत सोशल मीडिया एंगेजमेंटचं हे गणित तुकाराम मुंढेंच्या बाजूने वळलेले दिसत आहे.

आज सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा भाग राहिला नसून, अन्न-औषध प्रशासन असो, आरोग्य असो, शिक्षण असो किंवा नागरिकांच्या रोजच्या जीवनाशी संबंधित कोणताही प्रश्न असो या सर्व गोष्टींची माहिती यावरु प्राप्त करता येते.   प्रशासन आणि नागरिकांमधला संवादही आता सोशल मीडियावर सोपा झाला आहे. म्हणूनच एखाद्या अधिकाऱ्याच्या कामाची चर्चा होणं यापेक्षा त्याच्या कामाला मिळणार प्रतिसाद महत्त्वाचा आहे. जो तुकाराम मुंढे यांनी मागील काही दिवसांपासून सतत मिळत आहे.

Follow Us
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा