AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी रूपये तयार, इंटरनॅशनल ड्रग लॅाबीचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्या पथकाने अनेक ठिकाणी धाड टाकत भेसळयुक्त पदार्थ जप्त करत संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई केलेली आहे. आता त्यांच्या बदलीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी रूपये तयार, इंटरनॅशनल ड्रग लॅाबीचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Tukaram Mundhe And AwhadImage Credit source: Google
| Updated on: Jun 24, 2026 | 6:22 PM
Share

तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातील एक धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख आहे. ते सध्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. या पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्या पथकाने अनेक ठिकाणी धाड टाकत भेसळयुक्त पदार्थ जप्त करत संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई केलेली आहे. तसेच तुकाराम मुंढे या विभागात आल्यापासून ड्रग्स माफियांचे धाबे दणाणले आहेत. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी…

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॅाबीकडून 250 कोटी रूपये गोळा करण्यात आले आहेत. ड्रग्ज लॉबी, मेडिकल कंपन्या असे अनेकजण एकत्र येऊन तुकाराम मुंढे यांच्या पाठीमागे लागलेले आहेत. पुढच्या आठवड्यात मी नावानिशी सगळं समोर आणणार आहे असं आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन हे खातं नरहरी झिरवाळ नव्हे तर इतर कोणीतरी चालवत असल्याचेही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा प्रश्नच नाही…

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी, एफडीएकडून चांगली कारवाई सध्या सुरू आहे, त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा प्रश्नच येत नाही. अधिकाऱ्यांना गाड्या नाहीत, कार्यालय नाहीत. अत्यंत दयनीय अवस्था आहे. गाड्यांची व्यवस्था केली जाईल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळात हा विभाग आणखी आक्रमकपणे काम करण्याची आशा आहे.

तुकाराम मुंढे यांना संरक्षण द्या…

दुसरीकडे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, तुकाराम मुंढे यांच्यातील टी हा टायगरमधील टी झाला आहे. ते चांगले काम करतायत, त्यांना तीन वर्षे पदावर ठेवले पाहिजे. तर अर्जुन खोतकर यांनी तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा