तुळजाभवानीच्या दारातच भाविकांची लूट, भाविकांनी दान केलेल्या हजारो रुपयांवर डल्ला!

तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोरील मुख्य जिजाऊ महाद्वारसमोर प्रति तुळजाभवानी मुर्ती स्थापन करून भाविकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळजाभवानी मंदीर समोरील गेटवर खुलेआम भविकाकडून पैसे गोळा करण्याचा हा प्रकार टीव्ही 9 च्या कॅमेरात कैद झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

तुळजाभवानीच्या दारातच भाविकांची लूट, भाविकांनी दान केलेल्या हजारो रुपयांवर डल्ला!
तुळजाभवानी मंदिरासमोर भाविकांची लूट


उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोरील मुख्य जिजाऊ महाद्वारसमोर प्रति तुळजाभवानी मुर्ती स्थापन करून भाविकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळजाभवानी मंदीर समोरील गेटवर खुलेआम भविकाकडून पैसे गोळा करण्याचा हा प्रकार टीव्ही 9 च्या कॅमेरात कैद झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. कोरोनाचे संकट असल्याने तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने भाविक महाद्वारवर माथा टेकून तुळजाभवानी दर्शन घेत आहेत याचाच फायदा काही पूजारी घेत असून त्यांनी लूट सुरू केली आहे. (Looting of devotees using idols and photos of Goddess in front of Tulja Bhavani Temple)

जिजाऊ महाद्वार या ठिकाणी काही पुजाऱ्यानी तुळजाभवानी मातेची प्रति मूर्ती व फोटो ठेवून भाविकांनी अर्पण केलेले पैसे लुटण्याचा धंदा सुरू केला होता. मुळात भाविकांनी अर्पण केलेले हे पैसे तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पेटी म्हणजेच दानपेटीत जमा व्हायला हवे होते. मात्र, मंदिर बंद असल्याचा गैरफायदा घेऊन काही पुजाऱ्यानी देवीचा फोटो व त्यासमोर दानपेटी ठेवत पैसे गोळा केले जात होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार राजरोस सुरू आहे. मुख्यद्वारासमोर हा धंदा कोणाच्या आशीर्वादने सुरू होता याची चर्चा आता रंगली आहे.

मंदिर संस्थानची बैठक सुरु असतानाही लुटीचा प्रकार सुरु

विशेष म्हणजे तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक निवा जैन, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त अधिकारी उपस्थित होते व त्यांची बैठक सुरू असताना हा लुटीचा धंदा सुरू होता. तुळजाभवानी मंदिर संस्थानची बैठक सुरू असतानाही भक्तांची लूट सुरू होती. याचे विडिओ टीव्ही 9 कॅमेरात कैद झाल्यानंतर हा प्रकार सांगताच उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार योगिता कोल्हे,सौदागर तांदळे, इंतुले यांनी कारवाई सुरू केली.

Tuljabhavani 6

तुळजाभवानी मंदिरासमोर भाविकांची लूट

तुळजाभवानी मंदिरासमोर 24 तास मंदिर प्रशासन व पोलीस विभागाचा स्वतंत्र बंदोबस्त आहे. तरी देखील या प्रकाराकडे कानाडोळा केला जात होता. या प्रकारानंतर संबंधित पुजारी कोण होते ? सुरक्षारक्षक कोण होते व त्यांनी याकडे कानाडोळा का केला? याबाबत नोटीस व चौकशी करण्याचे आदेश मंदिर उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी तहसीलदार योगीता कोल्हे यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले आहे.

आशीर्वाद कोणाचा? फौजदारी कारवाई व चौकशी होणार का?

तुळजाभवानी देवीच्या पुरातन शिवकालीन 72 नाण्यावर डल्ला मारल्या प्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना पोलिसांनी अटक केलीली आहे. सध्या त्यांची पोलीस कोठडी सुरू आहे. देवीचे मंदिर बंद असताना प्रतिमूर्ती ठेवून भाविकांनी दान केलेली रक्कम लुटणाऱ्या संबंधित पुजारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या विरोधात फौजदारी कारवाई करून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व पोलीस अधीक्षक निवा जैन चौकशी करणार का? तुळजापूर येथील बिघडलेली यंत्रणा सुधारणार का? हे पाहावे लागेल. प्राप्त माहिती नुसार जिजाऊ महाद्वार समोर काही पुजारी गेली अनेक दिवस पासुन हा लुटीचा प्रकार करत होते. यात दररोज हजारो रुपये जमा केले जात होते.

Tuljabhavani 3

तुळजाभवानी मंदिरासमोर भाविकांची लूट, प्रशासनाची कारवाई

कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन, मास्क सोशल डिस्टन्सचे तीन तेरा

तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरात कोरोना नियमाचे सर्रास उल्लंघन होत असुन मास्क , शोशल डिस्टन्सचे तीनतेरा झाले आहे, असे असले तरी मंदिर प्रशासन, नगर परिषद व पोलीस प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. शारदीय नवरात्र महोत्सवास 29 सप्टेंबर रोजी मंचीकी निद्राने सुरुवात होणार आहे या काळात देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते. 7 ऑक्टोंबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे. हा उत्सव 21 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. मंदिर बंद असले तरी सर्व धार्मिक विधी, पूजा परंपरेनुसार साजरी केली जाणार आहे. 29 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार आयोजित करण्यात आले आहेत. या काळात तुळजापुरात प्रवेश बंदी असणार आहे.

इतर बातम्या : 

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करा, जयंत पाटलांचे आदेश

परवा एका एकराला 18 कोटी दिले, आता लोकं भेटून सांगतात, दादा तेवढा रस्ता आमच्या शेतातून न्या की…! : अजित पवार

Looting of devotees using idols and photos of Goddess in front of Tulja Bhavani Temple

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI