
जळगावच्या पाचोरा, भडगाव मतदार संघात महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर, भाजपनेही आता स्वबळाचा नारा दिला आहे. पाचोरा, भडगाव मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढणार आहे. जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेच्या १० हजार लाभार्थ्यांची खाते अद्यापही केवायसी विना आहेत. प्रशासनाकडून केवायसी करण्याचा आवाहन अन्यथा अनुदान मिळणे बंद होणार. कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सॅटिस प्रकल्पाला वेग आला असून पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत “गर्डर लॉन्चिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्री-दिवस काम करण्याचे ठेकेदारांना निर्देश देण्यात आले आहेत. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
दिवाळीनंतर बिहारमध्ये राजकीय सभांचा एक मोठा प्रवाह सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी 23 ऑक्टोबर रोजी सभा घेणार आहेत. ते सासाराम, भागलपूर आणि गया येथे जाहीर सभांना संबोधित करतील.
दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला स्थगिती वाढवला नसल्याने, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरण पुढील सुनावणीसाठी सूचीबद्ध केले आहे. तक्रारदार भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी उच्च न्यायालयातून त्यांचे अपील मागे घेऊ इच्छितात. राऊस अव्हेन्यू न्यायालयाने 29 नोव्हेंबर रोजी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाने यापूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना समन्स बजावले होते.
बिहार निवडणुकीसाठी झामुमो महाआघाडीपासून वेगळे झाले आहे. झामुमो सहा विधानसभा जागांवर उमेदवार उभे करेल. यात चकाई, धाम्धा, कटोरिया, पिरपैंती, मनिहारी आणि जमुई या जागा असतील. या सर्व जागांसाठी मतदान दुसऱ्या टप्प्यात होईल.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या ताफ्यातील एका कारचा दिल्ली-डेहराडून बायपासवर अपघात झाला. ही घटना मेरठमधील एमआयआयटी कॉलेजजवळ घडली. ताफ्यातील एका एस्कॉर्ट वाहनाला कारची धडक झाली. महामार्गावर अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाला. या घटनेत एक पोलिस अधिकारी जखमी झाला. या अपघातातून हरीश रावत बचावले आणि त्यांना दुसऱ्या वाहनाने डेहराडूनला पाठवण्यात आले.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने नरकटियागंजमधून शाश्वत केदार पांडे, किशनगंजमधून कमरुल हुडा, कसबामधून मोहम्मद इरफान आलम, पूर्णियामधून जितेंद्र यादव आणि गया टाउनमधून मोहन श्रीवास्तव यांना उमेदवारी दिली आहे.
69 वे विदर्भ साहित्य संमेलन यवतमाळ च्या ऊबंटू शाळेत पार पडणार आहे. 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी हे साहीत्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सारस्वतांचा मेळा यवतमाळ मध्ये भरणार असून मोठी तयारी आयोजन समिती कडून करण्यात आली आहे.
सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांवर पोहोचले आहेत. असं असलं तरी दिवाळी सणातील धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोने खरेदीला नागरिकांकडून पसंती मिळत आहे. आज अनेकांनी सोन्याचे दागिने खरेदी केले.
धाराशिव मध्ये दीपावलीच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. यावर्षी धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली असली तरी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये लोकांची खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. दीपावली सणासाठी आवश्यक त्या वस्तूची खरेदी करण्यासाठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
दिवाळीच्या अनुषंगाने कॉफर्ड मार्केट मध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली आहे. हे मार्केट होलसेल मार्केट असून इकडे गिफ्ट हॅम्पर तसेच छोटी छोटी गिफ्ट सुद्धा उपलब्ध असल्याने दूरदूरचे लोक ही या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी येत असतात.
आज मनोज जरांगे पाटील यांनी घोडेस्वारीचा आनंद घेत फेरफटका मारला, यावेळी त्यांनी काळा चष्मा घातला होता, तसेच त्यांच्या गळ्यात भगवा रुमाल देखील होता. आता दिल्लीला जायचे आहे, कारण मराठ्यांचे अधिवेशन आहे, 70 ते 80 लाख मराठे दिल्ली जाणार आहेत. असं देखील यावेळी जरांगे पाटील म्हणाले आहेत.
वसई, विरार शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन फुटली
पाईपलाइनमधून हजारो लिटर पाणी वायाला
ऐन दिवाळी सणाच्या काळात वसई, विरार शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
दुरुस्तीसाठी बारा तासांचा अवधी लागणार असल्याची पाणीपुरवठा विभागाची माहिती
मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांना बोनस न मिळाल्यानं आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, कर्मचाऱ्यांकडून काम बंदचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात पुन्हा वाहतूक कोंडी, स्वारगेट चौक जाम
वाहने गेल्या 1 तासापासून वाहतूक कोंडीत अडकली
नागरिकांना मोठा मनस्ताप, दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक वाहतूक कोंडीत अडकले
सुट्टी निमित्त गावाकडे निघालेल्या नागरिकांचा वाहतूक कोंडीमुळे खोळंबा
ठाकरे बंधूंची युती पक्की, ठाण्यात 75 जागा जिंकणारच असा विश्वास संजय राऊतांनी दिला आहे. ‘दो ठाकरे सब पे भारी. ठाकरे ठिकऱ्या उडवणार’ असं म्हणत राऊतांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरु असलेली दिसत आहे. दिवाळीनिमित्त मुंबईतील दादर मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच नागपुरातही साहित्य खरेदीसाठी नागरीकांची तुंबड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
जैन बोर्डींग जमीन व्यवहार प्रकरणाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जैन बोर्डींगच्या विद्यार्थांची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली असून 13 नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टा सुनावणी होणार आहे.
श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरेंचा ड्रायव्हर आता सारखा बदलतोय. आतापर्यंत काँग्रेसच्या जीवावर मतं मिळाली’ असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर खरपूस टीका केली आहे. “अजित पवारांनी वेळीच सावध होणं गरजेच आहे. नाहीतर भुजबळ अजित पवारांचा राजीनामा घेतील ” असं म्हणत जरांगे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
दिल्लीत ब्रम्हपुत्रा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आग झाल्याची घटना घडली आहे. इमारतीत अनेक खासदारांची घरे आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यात विजय चव्हाण यांनी थेट झाडावर चढून आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. उपोषणकर्त्याला आमरण उपोषणासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने थेट झाडावर चढून आंदोलन सुरू केल आहे.एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळतोय.
BVG कंपनीने दिवाळी भेट म्हणून विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना चिकनच्या मसाल्यांच्या पाकिटांची भेट दिली आहे. मंदिर समितीनं
BVG कंपनीला नोटीस बजावली आहे.
बावनकुळे यांनी कर्डिले कुटुंबाची भेट घेतली. शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची भेट घेत बावनकुळे यांनी सांत्वन करत धीर दिला.
मला तुम्ही जबाबदारी दिल्याने पुणे आणि बीड पालकमंत्री असल्याने खूप वेळ द्यावा लागतो. पिंपळी ग्रामपंचायत इमारत उदघाट्न झाले हे जाहीर करतो. आमदाराला पाच कोटी निधी असतो मात्र करोडो रुपये निधी बारामती शहर आणि तालुक्यासाठी आणत असतो. कामं होताना दर्जेदार व्हावं हे माझं मत असतं. कॉन्ट्रॅक्टर चांगला नसला की त्याचा त्रास सरकारला होतो. स्थानिक मुलांना काम देण्यासाठी हरकत नाही मात्र ते काम दर्जेदार केलं पाहिजे. ज्यांना राजकारणी व्हायचं त्यांनी कॉन्ट्रॅक्टर होऊ नये आणि ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्याने राजकारणात येऊ नये असे अजित पवार म्हणाले.
सांगलीच्या विटा शहराच्या मतदार यादीत घोळ असून तब्बल 1200 हून अधिक दुबार नावे असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडुन करण्यात आला आहे.मतदार यादी मध्ये काहींच्या वडिलांचे,पतींचे नाव नमुद नाही तर काहींचे पत्ते गायब झाले असून सदर मतदार यादी सदोष असल्याचा आरोप करत ती रद्द करण्यात यावी तसेच यादीमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये,अशी मागणी युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल सुतार यांनी प्रशासनाकडे केली आहे.
मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या बीएसयूपी योजनेतील घरांच्या किल्ल्या लाभार्थी आदिवासींना देण्यात आल्या, यावेळी।परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विवेक पंडित, महापालिका आयुक्त राधाबीनिद शर्मा , आ नरेंद्र मेहता उपस्थित आहेत
सांगली जिल्ह्यातल्या 108 अत्यावश्यक रुग्णवाहिकांची अवस्था दयनीय झाली आहे. रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचार सुविधा देखील उपलब्ध नसल्याने रुग्णांना घेऊन जाताना रुग्णांची प्रकृती आणखी गंभीर बनत असल्याचा आरोप करण्यात येत आहे कुपवाड शहरातल्या बामणोली येथील रुग्णाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल 50 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 90 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला सोन्याचे दर जीएसटी सह 81 हजार रुपये होते. यंदा दर हे जीएसटी सह 1 लाख 31 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षी चांदीचे दर 85 हजार रुपये होते तरी यंदा चांदीचे दर हे एक लाख 75 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. चांगला परतावा मिळत असल्यामुळे सोन्याने चांदीमध्ये गुंतवणुकीकडे नागरिकांबरोबरच तरुणांचा देखील कल वाढल्याचं सराफ व्यावसायिक यांनी सांगितलं. नवरात्रीपासूनच काही ग्राहकांनी दिवाळीसाठीची सोन्याने चांदीची बुकिंग करून ठेवली होती असे देखील सराफ व्यावसायिक यांनी सांगितले.
राज्यासमोर मोठ संकट आलं होतं. ३२ हजार कोटी रुपयांच पॅकेज जाहीर केलं मग शरद पवार यांना कसली अस्वस्थता आहे. आता लोकं त्यांना मानत नाही. त्यामुळे स्वतः अस्तित्व जपण्याचा शरद पवारांचा प्रयत्न सुरू आहे.शरद पवार यांना सांगायचं आहे. आपण मुख्यमंत्री असताना कारखान्याकडून सक्तीने पैसे वसूल केले. तुम्ही वसंतदादा शुगर कडून पैसे वसूल करता मग ते तुम्हाला चालत मग सरकारने पैसे घेतले तर काय अडचण आहे, असा सवाल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना केला. त्यांच्यावर टीका केली.
ओबीसींचे आरक्षण कमी होतेय याचा पुरावा आहे का असा सवाल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला. समाजात तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न का होतेय असा सवाल करत त्यांनी नाव न घेता ओबीसी नेत्यांकडे अंगुली निर्देश केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे छगन भुजबळ यांना भेटून चर्चा करणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात पिकप पलटी होऊन झालेल्या अपघातात सात ठार तर सतरा हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी मधील सात जणांची प्रकृती गंभीर त्यांना उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयाहून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवले अस्तंबा यात्रेहून परतत असताना अपघात झाला. पिकअपमध्ये चाळीसहून अधिक प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींमध्ये नंदुरबार तालुक्यातील घोटाणा आणि शहादा तालुक्यातील वैशाली येथील भक्तांचा समावेश आहे. तळोदा रुग्णालयात नातेवाईकांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश सुरू आहे.
तुम्ही निवडणुकीत उभे राहा, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू असे वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. यापूर्वी त्यांनी लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आता त्यांनी कार्यकर्त्यांसमोर तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू, असे वक्तव्य केले आहे.
जळगावच्या सराफा बाजारात अवघ्या पंधरा मिनिटात चांदी पुन्हा एक हजार रुपयांनी स्वस्त झाली. आज सकाळी चांदीचे भावात 5 हजार रुपयांची घसरण झाली होती. अवघ्या पंधरा मिनिटात पुन्हा 1 हजार रुपयांनी चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. चांदीचे दर आता विना जीएसटी 1 लाख 69 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे… सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार रूपयांनी घसरण झाली असून तर चांदीच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांनी घसरण झाली आहे… सोन्याचे दर विना जीएसटी एक लाख 28 हजार रुपयांवर आले आहे तर चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 70 हजार रुपयांवर आले आहेत… धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अनेक जण सोन्या-चांदीची खरेदी करत असतात… सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे आज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे…
समृद्धी महामार्गावर वाशिम च्या डव्हा लोकेशन (232) ला रात्री दोन वाजता सुमारास एक भीषण अपघात घडला. इनोव्हा गाडीचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली, यात विदेशी म्यानमार देशातील तीघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. इनोव्हा गाडी मुंबईहून नागपूरच्या दिशेने प्रवास करत होती, ते जगनाथ पुरी येथे जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडरला धडकली. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला.
सोन्याच्या भावात घट , सोन्याचे दर 5 हजारांनी घटले … 1 लाख 36 हजार रुपये सोन्याचे दर होते. आता ते 1 लाख 30 हजार रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 25 हजार रुपयांची घट झाली आहे. 1 लाख 95 हजार किलोहून चांदी 1 लाख 70 हजार रुपयांवर पोहोचली आहे.
अतिवृष्टीतील आर्थिक मदत वाटपाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप, आमदार प्रवीण स्वामी यांची कारवाईची मागणी… भाजपाचे नेते बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील यांच्या हस्ते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वाटप करण्यात आली होती आर्थिक मदत… उमरगा तालुक्यातील मुरूम येथे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत घरांची पडझड व अन्य नुकसानीची प्रशासकीय मदत करण्यात आली आहे वाटप… प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राजशिष्टाचाराचा भंग झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची आमदार प्रवीण स्वामी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी… संबंधित अधिकाऱ्यांवर हक्क भंग दाखल करण्याचा आमदार प्रवीण स्वामींचा इशारा
मला टार्गेट करून भुजबळ सरकारचं संरक्षण करत आहेत. सरकारकडून ओबीसींवर अन्याय, त्यावर बोला – विजय वडेट्टीवार
सोन्याच्या भावात घट , सोन्याचे दर 5 हजारांनी घटले … 1 लाख 36 हजार रुपये सोन्याचे दर होते. आता ते 1 लाख 30 हजार रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 25 हजार रुपयांची घट झाली आहे. 1 लाख 95 हजार किलोहून चांदी 1 लाख 70 हजार रुपयांवर पोहोचली आहे.
धाराशिव -उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या डिग्गी गावामध्ये रसायन मिश्रित सिंधी पिल्याने 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
अजय गोपीचंद डिग्गीकर असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दोन दिवसापासून हा युवक गायब होता. रसायन मिश्रित सिंधी पिल्याने मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय. घटना घडल्यानंतर डिग्गी गावातील ग्रामस्थांकडून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी होत आहे.
राज व उद्धव ठाकरे एकत्र काम करतील, ते एकत्र राहण्यासाठीच एकत्र आले आहेत – संजय राऊत.
पंजाबमधील सरहिंद स्टेशनवर रेल्वेच्या डब्याला आग लागली आहे. अमृतसह-सहरसा एक्स्प्रेसच्या डब्याला आज सकाळी 7.30 च्या सुमारास आग लागली. रेल्वेच्या डब्यातून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं,
जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे.
जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो. मी अनगर गावात गेल्यावर माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला पण ‘अपने गली मे कुत्ता भी शेर होता है’ असं ते म्हणाले.
सोलापुरात भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. सीना नदीला आलेल्या पुरामुळे दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे, डोंणगाव, पाथरी, तेलगाव, नंदूर आदी गावात मोठे नुकसान झालं होतं. या भागातील अनेक घर पाण्याखाली गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य पूर्णतः खराब झाले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेल कडून सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलं.
कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सॅटिस प्रकल्पाला वेग आला आहे. पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत “गर्डर लॉन्चिंगचे काम युद्धपातळीवर सुरू, रात्रं-दिवस काम करण्याचे ठेकेदारांना निर्देश देण्यात आले आहेत. पुढील तीन ते चार महिन्यात या सॅटिसचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली. सॅटिसमुळे कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी संपुष्टात येणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात यंदा रब्बीचं क्षेत्र वाढणार असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं. बियाणे आणि खताचा तुटडवा भासणारा नाही याची काळजी घ्या. त्यासाठी बियाणे आणि खतांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे.