Maharashtra Assembly Session Live : आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस
देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
धुळे शहराचा जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला
धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 5.4 अंश सेल्सिअस. जनजीवनावर परिणाम. गेल्या काही दिवसापासून सतत तापमानात घट होत आहे. थंडीचा गहू आणि हरभरा पिकांना मोठा फायदा.
-
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला 60 टक्के जागा द्या
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला 60 टक्के जागा दिल्या पाहिजेत. सत्ताधारी आमदाराला 60 टक्के जागा तर मित्र पक्षाला 40 टक्के जागा. शिवसेना उत्तर मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा भाजप व दादाच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव. नांदेड महानगरपालिकेवर 100% भगवा फडकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आमदार बालाजी कल्याणकर यांचा महाविकास आघाडीसह युतीतील मित्र पक्षांना इशारा.
-
-
थायलंडचा कंबोडियावर एअर स्ट्राइक
थायलंड आणि कंबोडिया दरम्यान पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. थायलंडने पुन्हा एकदा कंबोडियाच्या सीमेवर एअर स्ट्राइक केला आहे
-
विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे
विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे. भास्कर जाधव यांचं नाव केवळ चर्चेत ठेवून आदित्य ठाकरेंच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे केल्याची सुत्रांची माहीती.
-
निफाडचा पारा घसरला
निफाडचा पारा घसरला. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.4 अंश सेल्सिअस किमान तापमानची नोंद. अचानक थंडीच्या लाटेत वाढ झाल्यामुळे 11 अंश सेल्सिअस वरून पारा 6.4 अंशावर. उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या. अचानक थंडीत वाढ झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांची वाढली डोकेदुखी. फुगवणीच्या स्टेजला असलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची द्राक्ष उत्पादकांना भीती.
-
-
आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस
आजपासून महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, रोजगार या मुद्यांवरुन हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.
आजपासून महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, रोजगार अशा मुद्यांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच चार्टर विमानातून प्रवास केला. दोघेही एकाच विमानाने नागपूरला आले. महायुतीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये अचानक मनोमीलन झाल्याचं चित्र पहायला मिळालं. धोबतोला गावात बिअर बारविरोधात आंदोलन पेटले. महिलांचे सलग 11व्या दिवशी रस्त्यावर ठिय्या. मुख्य रस्त्यावर सुरू झालेल्या बारमुळे महिलांची असुरक्षितता वाढली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचीही चिंता. आंदोलनात सोबत बसू असं आश्वासन देऊनही आमदार गैरहजर. आंदोलनकर्त्या महिलांचा आरोप. बारला परवानगी आणि ग्रामस्थांचा विरोध आहे. बार तात्काळ बंद करा, महिलांचा ठाम पवित्रा. आता प्रशासनाची भूमिका महत्वाची.
Published On - Dec 08,2025 8:23 AM
