Gaurav Khanna Bigg Boss Winner : ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट, पत्नीच्या हाती ट्रॉफी देत म्हणाला..
Bigg Boss 19 Winner : बिग बॉसच्या नव्या सीझनचा विजेता मिळाला आहे. टीव्ही अभिनेता गौरव खन्नाने सर्वांना पछाडत 'बिग बॉस 19' चं विजेतेपद पटकावलं. ट्रॉफी जिंकल्यामुळे तो प्रचंड खुश असून, विजेत ठरव्यावर त्याने सोशल मीडियावरील त्याच्या अकाऊंटवर पहिली पोस्टही केली आहे.

Gaurav Khanna Social Media Post : टीव्ही इंडस्ट्रीतल सर्वात मोठा, ज्याची बरीच चर्चा सुरू असते अशा ‘बिग बॉस’ चा 19 वा सीझ नुकताच संपला असून, शो ला त्यांचा नवा विजेताही मिळाला. काल पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेता डीके अर्थात गौरव खन्ना याने बिग बॉसच्या या सीझनचं विजेतेपद पटाकवलं. फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल यांच्यासह गौरव हा टॉप 5 मध्ये होता, मात्र अखेर प्रेक्षकांनी गौरव खन्ना याच्या नावालाच पसंती दिली आणि तो विजेता ठरला. शोचा होस्ट सलमान खान याच्या हस्ते गौरवने बिग बॉसची विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारली. शोमध्ये त्याच्या साडेतीन महिन्यांच्या संघर्षाचे फळ मिळाले आणि त्याने इतर सर्व स्पर्धकांना मागे टाकून ट्रॉफी जिंकली. विजेतेपदामुळे गौरवच्या आनंदाला पारावर नव्हता. आता त्याच्यावर जगभरातील चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यावर गौरवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्रॉफीसह काही फोटो पोस्ट केले आहेत. विजायचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर साफ झळकतोय. यासोबतच त्याने एक पोस्टही लिहीली आहे, त्यात त्याच्या चाहत्यांसाठी तर त्याने काही मेसेज लिहीलेला नाही, पण गौरवने एक इमोशनल पोस्ट लिहीली आहे.
बिग बॉस जिंकल्यानंतर गौरवची पहिली पोस्ट
बिग बॉस 19 ट्रॉफी जिंकल्यानंतर गौरव खन्नाने त्याची पहिली पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्याच्या टीमतर्फे शेअर करण्यात आली आहे. पहिल्या फोटोत गौरव हा बिग बॉसच्या ट्रॉफीसोबत आनंदात, हसताना दिसतो. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तो त्याची पत्नी आकांक्षासोबत दिसतोय, त्याने ट्रॉफीही पत्नीच्या हाती दिली आहे. बिग बॉसचं विजेतेपद हे गौरवसाठी अतिशय महत्वाच आहे. त्याच्यावर चहुकडून अभिनंदनाचा, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
काय आहे गौरवची पोस्ट ?
त्याच्या टीमतर्फे ही पोस्ट करण्यात आली आहे . “तीन महिन्यांचा प्रवास अखेर संपला. आणि किती छान शेवट झाला. ट्रॉफी घरी आली आहे. लोक विचारायचे ‘जीके’ काय करेल?. पण नेहमीप्रमाणे जीके आपल्या सर्वांसाठी ट्रॉफी घरी घेऊन आला आहे. त्याने ते करून दाखवलं. हा प्रवास अनेक सुंदर मार्गांनी आनंददायी होता. आपण सर्वजण प्रत्येक दिवस अभिमानाने जगलो, मग तो शोमधील त्याचे चढ-उतार असोत किंवा शक्ती आणि आदराचे अनेक क्षण असोत. आणि आज, जेव्हा जीके जिंकलाय, तेव्हा असं वाटतं की आह आपलाच विजय आहे ” असं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं .
View this post on Instagram
” हा विजय त्या सर्व लोकांचा आहे ज्यांनी जीकेवर विश्वास ठेवला, त्याला मतदान केले आणि शोच्या शेवटपर्यंत त्याला पाठिंबा दिला, ज्यामुळे तो या हंगामाचा विजेता ठरला. आज आपण फक्त ट्रॉफी (मिळणं) साजरं करत नाहीयोत, तर विश्वास, प्रेम आणि एकतेचाही विजय साजरा करतोय. आपण ही ट्रॉफी एकत्र जिंकली. प्रेमाने ” असं गौरव खन्नाच्या टीमने पोस्टमध्ये लिहीलं आहे.
बिग बॉस19 च्या अंतिम फेरीत पाच स्पर्धकांमध्ये जोरदार लढत झाली. गौरव खन्ना विजेता ठरला, तर फरहाना भट्ट दुसऱ्या क्रमांकावर होती. टॉप 5मध्ये असलेले प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि अमाल मलिक हे एकेक करून बाहेर पडले. बिग बॉस जिंकल्यावर गौरवला ट्रॉफी आणि 50 लाखांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली.
