Maharashtra Breaking News LIVE 14 April 2025 : आमदार अर्जुन खोतकर यांनी केली जलकुंडाच्या कामाची पाहणी;साडे 11 कोटी रुपये खर्चाची चर्चा 

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 14 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 14 April 2025 : आमदार अर्जुन खोतकर यांनी केली जलकुंडाच्या कामाची पाहणी;साडे 11 कोटी रुपये खर्चाची चर्चा 
live breaking
| Edited By: | Updated on: Apr 15, 2025 | 7:42 AM

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायांनी गर्दी केली आहे. महाराष्ट्रासह देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमीवर आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमीवर जाणार आहे. पुण्यात उन्हाळी सुट्ट्यात फिरण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. यामुळे पुणे जिल्ह्यातील एमटीडीसी रिसोर्ट ७० टक्के फुल झाले. राज्यात दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Apr 2025 08:12 PM (IST)

    सोलापुरात एसटी बसला भीषण आग, मोठी दुर्घटना टळली

    सोलापुरातील कुंभारी येथे एसटी बसला भीषण आग

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाजवळ घडला प्रकार

    बस अक्कलकोटहून कुर्डुवाडीच्या दिशेने जात असताना घेतला पेट

    गाडीच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात आल्यावर वाहन चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी केली, मोठी दुर्घटना टळली.

    बसमध्ये असलेले सर्व प्रवाशी सुरक्षीत

     

     

  • 14 Apr 2025 07:36 PM (IST)

    बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाक्याचा आवाज काढत पुण्यात मध्यरात्री तरुणांचा धिंगाणा

    बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाक्याचा आवाज काढत तरुणांचा मध्यरात्री धिंगाणा

    पुण्यातील बंडगार्डन मेट्रो स्टेशन परिसरातील घटना

    वाहतूक पोलिसांकडून बुलेट मधून कर्कश आवाज काढणाऱ्या वाहनांवर कारवाई

    कारवाई सुरू असून देखील बशिस्त तरुणांचा धिंगाणा सुरूच

  • 14 Apr 2025 06:59 PM (IST)

    पुण्यात प्रवासी आणि पीएमपी वाहकामध्ये हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

    पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, पीएमपीएलच्या मागच्या दाराने उतरण्यास तरुणाला विरोध केल्याने प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये चांगलीच हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.  पुण्यातील हडपसर- मुंढवा रस्त्यावर ही  घटना घडली आहे.

     

  • 14 Apr 2025 02:37 PM (IST)

    शिरपुर धान खरेदी केंद्रात दोन कर्मचारी निलंबित; अजून काही मोठ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता

    गडचिरोली जिल्ह्यात धान घोटाळा प्रकरणी कर्मचारी, अधिकाऱ्यांची चौकशी जिल्हाधिकारी स्वतः करणार असल्याचं म्हटलं जात आहे. दोन कोटी रुपयाचे राईस मिलची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या प्रकरणात शिरपुर धान खरेदी केंद्रात दोन कर्मचारी निलंबित करण्यात आलं आहे. 2011 पासून 2025 पर्यंत धान घोटाळा संदर्भात अनेक फाईल जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी करीत आहेत. सदर धान खरेदी आदिवासी विकास महामंडळ मार्फत केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. यात अजून काही मोठे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

     

  • 14 Apr 2025 02:17 PM (IST)

    आमदार अर्जुन खोतकर यांनी केली जलकुंडाच्या कामाची पाहणी;साडे 11 कोटी रुपये खर्चाची चर्चा 

    जालना शहरातील मोती बाग येथे जवळपास साडे 11 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या जलकुंडाची आमदार अर्जुन खोतकर यांनी पाहणी केली. गणपती मूर्ती विसर्जन, दुर्गादेवी मूर्ती विसर्जन आणि छठ पूजेसाठी या जलकुंडाचा वापर होणार असल्याचं म्हटलं जात आहे.याशिवाय जालना शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी संगीत कारंजे सुद्धा जलकुंडात लावण्यात येणार आहे. दरम्यान,यावर्षाच्या शेवटपर्यंत या जलकुंडाचे काम पूर्ण होईल अशी माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.

  • 14 Apr 2025 12:56 PM (IST)

    नवी दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

    नवी दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाली. आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी महाराष्ट्र सदनातील अधिकारी यांच्यासह महाराष्ट्र सदनातील सुरक्षा रक्षक आणि दिल्लीतील अनेक लोक उपस्थित होते.

  • 14 Apr 2025 12:49 PM (IST)

    भीम जैसा सूरज अगर निकला ना होता.. – एकनाथ शिंदे

    “बाबासाहेब हा आपला श्वास आहे. बाबासाहेब हा आपला दीपस्तंभ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता आणि बंधुतेचा संदेश दिला. अनेक देशातल्या घटनेचा अभ्यास करून त्यांनी सर्वोत्कृष्ट घटना लिहिली. भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, हमारे जीवन मै ये उजाला न होता. मर गए होते युँ ही जुल्म सहकर, अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 14 Apr 2025 12:36 PM (IST)

    नवी दिल्ली – गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनानंतर पक्ष ॲक्शन मोडवर

    नवी दिल्ली – गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनानंतर पक्ष ॲक्शन मोडवर आलं आहे. आगामी काळात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘संघटन सुजन अभियान’ जाहीर करण्यात आली. अभियानात महाराष्ट्रातील ६ नेत्यांवर AICC कडून जबाबदारी दिली जाणार आहे. बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, अस्लम शेख, सुनील केदार, के सी पाडवी, प्रफुल गुडधे यांच्यावर विशेष जबाबदारी असेल. विभागवार संघटनांवर नेते लक्ष ठेवणार आहेत.

  • 14 Apr 2025 12:26 PM (IST)

    ‘सामना’ अग्रलेखावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

    चंद्रपूर- ‘सामना’ अग्रलेखावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. “गरज असेल तिथे देवेंद्रजी पुढाकार घेतील. सामनाच्या सल्ल्यानुसार देवेंद्रजी काम करत नाहीत, जनतेच्या हितासाठी ते काम करतात,” असं ते म्हणाले.

  • 14 Apr 2025 12:19 PM (IST)

    पुण्यात सोसायटीच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या फर्निचरच्या वादावरून जोरदार हाणामारी

    पुण्यातील धायरी भागातील रिद्धी-सिद्धी पॅराडाईज रोजवुड सोसायटीच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या फर्निचरच्या वादावरून जोरदार हाणामारी झाली. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महिलेलाही मारहाण झाली असून सोसायटीतील वाद व्हिडिओच्या माध्यमातून चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • 14 Apr 2025 12:09 PM (IST)

    नाशिकमधील शिवसेना शिबिराबाबत संजय राऊतांची माहिती

    नाशिकमधील शिवसेना शिबिराबाबत संजय राऊत म्हणाले, “16 एप्रिलला मनोहर गार्डन लॉन्स इथं शिवसेनेचे विभागीय शिबिर घेणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात विभागीय शिबीर होणार आहेत. दिवसभर हे शिबीर असतील. प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकत्र घेऊन ही चर्चा होते. नाशिकच्या शिबिरातसुद्धा सुटसुटीतपणा आहे. उद्धव ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. इतर नामवंत मार्गदर्शक शिबिरात येणार आहेत. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे येणार आहेत.”

  • 14 Apr 2025 11:56 AM (IST)

    काँग्रेसचा पक्षाध्यक्ष मुस्लिम का नाही? पीएम मोदींचा सवाल

    हिसारमधील कार्यक्रमात मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका. काँग्रेसने कायमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना व्यवस्थेबाहेर ठेवलं. काँग्रेसचा पक्षाध्यक्ष मुस्लिम का नाही? असा पीएम मोदींचा सवाल.

  • 14 Apr 2025 11:55 AM (IST)

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पीएम मोदी म्हणाले….

    ”सर्व देशवासीयांच्या वतीने भारतरत्न पूज्य बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन. त्यांच्याच प्रेरणेने देश आज सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित वृत्तीने प्रयत्न करत आहे. त्यांची तत्त्वे आणि आदर्श आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देणारी आहेत” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

  • 14 Apr 2025 11:36 AM (IST)

    गुजरातच्या समुद्रात तटरक्षक दलाची मोठी कारवाई

    गुजरातच्या समुद्रात तटरक्षक दलाची मोठी कारवाई. 1800 कोटी रुपयांच्या ड्रग्सची बोट पकडली. गुजरात ATS ने 300 किलो ड्रग्ज केले जप्त. गुजरात ATS च्या मदतीने बोट पकडण्यात यश.

  • 14 Apr 2025 11:35 AM (IST)

    आम्हाला शाहंचे पाय चाटण्याची गरज नाही – संजय राऊत

    “चंद्रकांत पाटलांनी आमची चिंता करु नये. आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील पाटलांनी चिंता करु नये. आम्हाला शाहंचे पाय चाटण्याची गरज नाही” असं संजय राऊत म्हणाले. “नेहरुंच्या संपत्ती आज टाच आणली जातेय. 16 एप्रिलला ठाकरेंच्या शिवसेनेच विभागीय शिबीर होणार आहे. त्यात बाळासाहेब ठाकरेंच न ऐकलेलं भाषण दाखवलं जाईल” असं संजय राऊत म्हणाले.

  • 14 Apr 2025 10:57 AM (IST)

    Maharashtra Breaking: इगतपुरीमध्ये एल्गार कष्टकरी संघटना आक्रमक

    इगतपुरीमध्ये एल्गार कष्टकरी संघटना आक्रमक… एल्गार कष्टकरी संघटनेचा हंडा मोर्चा मंत्रालयावर धडकणार… जलजीवन मिशनची अपूर्ण कामे, पाणी समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी… टँकरनं पाणीपुरवठा करण्याचीही मागणी…

  • 14 Apr 2025 10:41 AM (IST)

    Maharashtra Breaking: राज्यातील विविध भागात काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता

    राज्यातील विविध भागात काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता… मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला पुढील 3 दिवस पावसाचा इशारा… चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट…

  • 14 Apr 2025 10:21 AM (IST)

    Maharashtra Breaking: देशाच्या विकासात संविधानाचा मोलाचा वाटा – देवेंद्र फडणवीस

    नॅशनल ग्रीड, कामगार अधिकार या सर्व बाबासाहेबांच्या संकल्पना… देशाच्या विकासात संविधानाचा मोलाचा वाटा… डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे राष्ट्रपुरुष… असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

     

  • 14 Apr 2025 10:14 AM (IST)

    जळगावातील अनेक टेकड्या नामशेष होण्याच्या मार्गावर, तातडीने लक्ष देण्याची मागणी

    मुक्ताईनगर जळगाव : जिल्ह्यातील अनेक टेकड्या ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात रस्त्याच्या कडेला आणि निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यात दगडी टेकड्या आहेत. या दगडी टेकड्या सध्या नामशेष तर होत नाही ना ?अशी भीती नागरिक व्यक्त करतात. मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून टेकड्या नामशेष होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. महसूल विभागाचे या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा निसर्गप्रेमीचा ठपका आहे. याप्रकरणी तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी महसूल विभागाकडे केली आहे.

  • 14 Apr 2025 10:12 AM (IST)

    Maharashtra Breaking: नाशिकच्या सिडको परिसरात 61 फूट उंच बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती उभारली

    प्रतिकृतीचा आकार 60 बाय 40 फूट, वजन साडेचार टन… स्टील आणि फायबरचा वापर करून भव्य प्रतिकृतीची निर्मिती… माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या पुढाकारातून उपक्रम राबवला… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खास आकर्षण…

  • 14 Apr 2025 10:05 AM (IST)

    इंदू मिल स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होणार, संजय शिरसाठांचा विश्वास

    आज बाबासाहेबांची १३४ वी जयंती माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. मी भाग्यवान आहे की सामाजिक न्याय मंत्री म्हणून मला संधी मिळाली. बाबासाहेब नसते तर आम्ही कुठे असतो हयाची कल्पनाही करवत नाही. इंदू मिल स्मारकाचं काम सुरू आहे, हे काम लवकरच पुर्ण होईल, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

  • 14 Apr 2025 09:13 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये 24 तासांत चोरी उघड

    पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये 24 तासांत चोरी उघडकीस आली आहे. सुमारे साडे सोळा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अवघ्या 24 तासांत कारवाई करत एकाला अटक केली असून त्याच्याकडून 25 तोळे सोन्याचे व 160 ग्रॅम चांदीचे दागिने असा सुमारे 16 लाख 92 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे

  • 14 Apr 2025 08:55 AM (IST)

    Marathi News: मंदिरात द्राक्षाची आरास

    पुण्याच्या भोर तालुक्यातल्या पसुरे येथील ग्रामदैवत श्री वाढेश्वर मंदिरात, वर्धापन दिन आणि अखंड हरिनाम सप्ताह निमित्त देवाला द्राक्षांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. देवाच्या गाभाऱ्यात भाविक विशाल विलास धुमाळ यांनी ५५१ किलो द्राक्षांची देवाला आकर्षक आरास करुन मंदिर परिसराची सजावट केली.

  • 14 Apr 2025 08:42 AM (IST)

    Marathi News: बाबासाहेबांची जयंती, 134 किलोचा केक कापला

    अमरावतीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीच्या इर्विन चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायांची रात्री 12 वाजता गर्दी उसळली होती. यावेळी फटाक्यांच्या आतषाबाजी करत जल्लोष करण्यात आला. रिपब्लिकन पक्ष गवई गटाच्या वतीने राजेंद्र गवई यांनी तब्बल 134 किलोचा केक कापत आंबेडकर जयंतीच्या यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

  • 14 Apr 2025 08:29 AM (IST)

    कांदळवनाचा ऱ्हास, गुन्हा दाखल

    दिवा येथील उग्रेश्वर मंदिराजवळ गणेश घाट खाडीलगत कांदळवनाचा ऱ्हास केल्याबाबत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिवा पश्चिमेकडील देसाई खाडीपट्ट्यात भूमाफियांनी बेकायदा खारफुटींचा ऱ्हास करून भराव केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला.

  • 14 Apr 2025 08:19 AM (IST)

    आदित्य ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदित्य ठाकरे यांच्याकडून मध्यरात्री वरळी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. वरळी बीडीडी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले.