
मस्साजोग ते बीडपर्यंत काँग्रेसची आज व उद्या सद्भावना रॅली निघणार आहे. मस्साजोगमधून या रॅलीला सुरूवात होणार आहे. बीड प्रकरणावरून काँग्रेसकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील प्रमुख 40 खाणपट्ट्यांसदर्भात होणार चर्चा. महिला दिनाचे औचित्य साधून गोंदियामध्ये आगार प्रमुखांनी मेकॅनिकल विभागातील महिलांचे स्वागत केलं. गोंदिया आगारात एसटीची दुरुस्ती, देखभाल महिलांच्या खांद्यावर देण्यात आहे. एसटी महामंडळात महिलांचा सहभाग वाढला.महिला दिनानिमित्त भांडुप दातार कॉलनी या ठिकाणी सूर्य वंदना कार्यक्रम ठेवण्यात आला होता. योग स्टुडिओच्या वतीने 108 सूर्यनमस्कार संकल्पना म्हणून मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाले.यासह महाराष्ट्र, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा सह सर्वत क्षेत्रातील महत्वाच्या अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की हिंदू राष्ट्र निर्माण करण्यापूर्वी आपल्याला हिंदू राज्ये, हिंदू जिल्हे, हिंदू गावे, हिंदू समाज निर्माण करावा लागेल आणि हिंदू कुटुंबांमध्ये कट्टरता आणावी लागेल. तुम्हाला हिंदू धर्मांध व्हावे लागेल. बाबा बागेश्वर यांनी स्वतः जागे व्हा आणि इतरांनाही जागे करा असे आवाहन केले. ते म्हणाले की, सध्याचा काळ शांतीचा नाही तर क्रांतीचा आहे.
भाजपने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले होते की ते होळी आणि दिवाळीला लोकांना मोफत सिलिंडर देतील. आता दिवाळीनिमित्त, भाजप उद्या म्हणजे 9 मार्च रोजी समुद्र भवन, परमाणी चौक, सेक्टर 7, रोहिणी येथे आपली घोषणा करेल. उज्ज्वल योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हा लाभ दिला जाईल. दिल्लीत अंदाजे 2.59 लाख उज्ज्वल गॅस कनेक्शन आहेत.
यूपी एटीएसने काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील रहिवासी उल्फत हुसेनला अटक केली आहे. मुरादाबाद पोलिसांनी उल्फत हुसेनवर 25 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. उल्फत 18 वर्षांपासून फरार होता. अटक करण्यात आलेला उल्फत हुसेन हा हिजबुल मुजाहिदीनचा सदस्य आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तो एक मोठी दहशतवादी घटना घडवण्यासाठी मुरादाबादला पोहोचला होता.
महिलांच्या वरील आंदोलनासंदर्भात सह्याद्री गेस्ट हाऊस समोर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची कन्या मंत्री रोहिणी खडसे यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे.
महिलांच्या वरील आंदोलनासंदर्भात सह्याद्री गेस्ट हाऊस समोर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची कन्या मंत्री रोहिणी खडसे यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे.
महिला सक्षमीकरणाच्या आपण कितीही गोष्टी करत असलो तरी राज्यात घाण घाण घटना घडत आहेत, मंत्री गुलाबराव पाटील
महिला सक्षमीकरण करत असलो,तरी राज्यात घाण घाण घटना घडत आहेत, महिलेने तिच्या पर्समध्ये मिरचीची पूड आणि रामपुरी चाकू ठेवला पाहिजे,असं बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते आणि त्यावरून त्यांच्यावर खूप टीका सुद्धा झाली होती अशी आठवण मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केली.
भाईंदर कोर्टाची इमारत बांधायला उशीर जरी झाला तरी न्याय मात्र फास्ट ट्रॅकवर मिळेल अशी उपमुख्यमंत्री भाईंदर येथील कोर्टाच्या इमारत उद्घाटनाप्रसंगी म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिन्यांची मुदत वाढ दिल्याने सांगलीत तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच भरत गोगावले यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून जल्लोष करण्यात आला आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त सीएसएमटीतून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारतचे सारथ्य पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी केले आहे.
जागतिक महिला दिनाच्या दिवशीच बुलढाणा तालुक्यातील देवपूरच्या असंख्य महिला ग्रामपंचायत आमरण उपोषणास बसल्या आहेत. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत रखडलेलं अर्धवट काम पूर्ण करण्याबद्दल महिला आमरण उपोषणास बसल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून देवपूर या गावात जलजीवन मिशनचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत काम पूर्ण करण्यात आलेलं नाहीये. योजनेचं पाणी नागरिकापर्यंत पोहोचलेलंच नसल्याचं येथील नागरिक सांगतात. ठेकेदार , सरपंच व अधिकारी यांच्या घरातच योजनेचे पाणी वळवण्यात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
पुण्यात भर रस्त्यात एका तरूणाचे विचित्र कृत्य समोर आलं आहे. पुण्यातील शास्त्रीनगर चौकातील सिग्नलवर या तरुणाने कार थांबवून स्त्रियांच्या समोर अश्लील चाळे केल्याचं समोर आलं आहे. हा तरूण मद्यधुंद असून त्याच अवस्थेत तो BMW कार चालवत असल्याचं स्पष्ट झालं. मद्यधुंद अवस्थेत त्याने केलेल्या विचित्र कृत्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तसेच त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्रही मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणाबाबत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. पुणे पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरु करण्यात आला आहे.
पुण्यात भर रस्त्यात एका तरूणाचे विचित्र कृत्य समोर आलं आहे. पुण्यातील शास्त्रीनगर चौकातील सिग्नलवर या तरुणाने कार थांबवून अश्लील चाळे केल्याचं समोर आलं आहे. हा तरूण मद्यधुंद असून त्याच अवस्थेत तो कार चालवत असल्याचंही स्पष्ट झालं. मद्यधुंद अवस्थेत त्याने केलेल्या विचित्र कृत्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.आता पुणे पोलीस यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
ऐन जागतिक महिला दिनाच्या दिवशीच बुलढाणा तालुक्यातील देवपूरच्या असंख्य महिला ग्रामपंचायत मधेच आमरण उपोषणास बसल्या आहेत. जल जीवन मिशन योजने अंतर्गत काम रखडल्याने पाण्यासाठी त्यांना वणवण फिरावे लागते म्हणून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जळगावच्या पारोळा येथील इतिहासाची साक्ष देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा भुईकोट किल्ल्याची दुरवस्था झाली असून किल्ल्याचे बांधकाम जीर्ण झाले आहे. जिल्हा नियोजन समितीतून निधीला मंजुरी मिळूनही किल्ला सुशोभीकरण आणि दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.
चालक हा मद्य प्राशन केलेला आहे, येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर लघवी केल्याचे समोर आले. त्यानंतर आरोपी पळाले.
ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने प्रवाशांना दिलासा देताना अर्थसंकल्पात बस भाडेवाढ टाळली आहे. ठाणे परिवहनचा 2025 – 26 चा 895 कोटी 35 लाख रकमेचा मूळ अर्थसंकल्प ठाणे परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी पालिका आयुक्त सौरभराव यांच्याकडे सादर केला. पर्यावरण पूरकतेवर भर देताना शून्य उत्सर्जन असलेल्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी बस परिवहन उपक्रमात दाखल करण्यात येणार आहेत. ठाणे परिवहनने भाडेवाढ टाळली आहे.
यंदाच्या हंगामात मार्चच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानाने 40 च्या पुढे मजल मारली असून विदर्भातील यवतमाळ येथे सर्वाधिक 41.2 सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालीय. राज्यातील कोकण गोव्यात पुढील तीन दिवस कमाल तापमानात वाढ होईल. त्यामुळे मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढणार आहे.
सतीश भोसले हा अतिशय विकृत माणूस आहे. त्याने एकाला बॅटने मारले, हरण पकडत असताना एकाने विरोध केला म्हणून एकाचे दात तोडले, यावरून याची विकृती दिसते, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.
काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पंकजा ताईंवर टीका केली आहे. पंकजा मुंडेंचा आजकाल वादग्रस्त वक्तव्य करण्याचा सपाटा सुरु आहे, अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवसारी येथील एका कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग. या कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी महिला पोलिस कर्मचारी संभाळणार. देशात पहिल्यांदाच आज पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था महिला सांभाळणार. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुजरात पोलिसांचा अनोखा उपक्रम.
“शिंदेंच्या बोलण्याला राज्यात काहीही किंमत राहिलेली नाही. शिंदे आणि फडणवीसांमध्ये वॉर सुरु ते रोज दिसतय. शिंदे पैसे देऊन सत्कार करुन घेत आहेत. फडणवीसांप्रमाणे ठाकरेंनी गैरकारभारला स्थगिती दिलेली होती” असं संजय राऊत म्हणाले.
पुणे – कोरेगाव पार्क हद्दीतील अवैध स्पा सेंटरवर बुलडोझर. पोलिस प्रशासन आणि पुणे महानगर पालिका आक्रमक.
कोरेगाव पार्कमध्ये अवैध स्पा सेंटर दिवसें-दिवस वाढत आहेत. अनेक ठिकाणी स्पा सेंटर मध्ये चालतो वेश्या व्यवसाय. यामुळे स्थानिकांनी तक्रार केली होती. अनेक स्पा सेंटर अनधिकृत बांधकाम असल्यामुळे महापालिकेला सोबत घेत चालवण्यात बुलडोझर आला .
अबू आझमींनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र लिहीत निलंबन रद्द करण्याची मागणी केली आहे. छत्रपती संबाजी महाराजांबद्दल कोणतंही वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
पुण्यात मद्यधुंद तरुणाचे रस्त्यावर अश्लील चाळे. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर केली. मित्रांह दारू प्यायली आणि फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले. सकाळच्या सुमारास तरुणाचा सिग्नल वर अश्लीलपणा. पुणे नगर रोड शास्त्रीनगर चौकातील धक्कादायक घटना.
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार तुळजापूर येथे दाखल. आशिष शेलार थोड्याच वेळात तुळजाभवानी मंदिरामध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी करणार आहेत.
मस्साजोग ते बीडपर्यंत काँग्रेसची आज व उद्या सद्भावना रॅली निघणार आहे. मस्साजोगमधून या रॅलीला सुरूवात होणार आहे. बीड प्रकरणावरून काँग्रेसकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी उपस्थित असतील.