
विरारच्या अर्नाळा बस डेपोमध्ये सप्ताहिक सुटीच्या वादातून बस वाहक मॅनेजरला चालकाने लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे. सिद्धेश्वर सूर्यवंशी ( वय 40 ) असे जखमी मॅनेजर नाव असून त्यांच्या पाठीवर लोखंडी सळईचा मार लागला आहे. मुनीर तडवी ( वय 37 ) असे लोखंडी सळईने मारहाण करणाऱ्या चालकाचे नाव आहे. हे दोघेही अर्नाळा बस अगारात मॅनेजर आणि चालक पदावर कार्यरत आहेत. काल बुधवारी ही घटना घडली असून या बाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी चालक मुनीर तडवी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण रेतीबंदर पाठोपाठ डोंबिवली मोठागाव रेतीबंदरवर तहसीलदारांची कारवाई. रेती साठवणूकीसाठीच्या आठ कुंड्या फोडल्या. खाडीकिनारी साठवण्यात आलेला रेतीसाठा जेसीबी मशीनच्या सहाय्याने खाडीपत्रात ढकलला.
गुरुग्राममध्ये एका 34 वर्षीय परदेशी महिलेने 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दुपारी 12 वाजता डीएलएफ फेज 5 (डीएलएफ पीएच 5) पार्क प्लेसच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून एका जपानी महिलेने आत्महत्या केली. मृताचे नाव माडोका असे आहे, तो जपानचा रहिवासी होता. गेल्या वर्षी 24 सप्टेंबर रोजी ती तिच्या मुलांसह भारतात आली होती आणि डीएलएफ फेज 5 च्या पार्क प्लेस सोसायटीमध्ये राहत होती.
जळगावात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “बेटी बचाव, बेटी पढाव”असा संदेश देत जनजागृतीसाठीभव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये जिल्हा पोलीस दलातील तब्बल 75 महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी घेतला होता. महाराष्ट्र शासनाच्या बेटी बचाव, बेटी पढाव” या उपक्रमाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
औरंगजेब प्रकरणात मुंबई पोलिस अबू आझमी यांची चौकशी करणार आहेत. या प्रकरणी सपा नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिकडेच आझमी म्हणाले होते की औरंगजेबाच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होती.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. खरगे म्हणाले की मोदीजी म्हणाले होते की ‘मां गंगा ने बुलाया है’ पण सत्य हे आहे की ते गंगा स्वच्छ करण्याची त्यांची हमी “विसरले” आहेत. सुमारे 11 वर्षांपूर्वी, 2014 मध्ये, नमामि गंगे योजना सुरू करण्यात आली. मार्च 2026 पर्यंत नमामि गंगे योजनेत 42500 कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार होता, परंतु संसदेत दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांवरून असे दिसून येते की डिसेंबर 2024 पर्यंत फक्त 19271 कोटी रुपये खर्च झाले आहेत. याचा अर्थ असा की मोदी सरकारने नमामि गंगे योजनेतील 55% निधी खर्च केलेला नाही. गंगा मातेबद्दल इतकी उदासीनता का?
मोठी बातमी समोर आली आहे. मनसेकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. मनसेने भैय्याजी जोशी यांच्या पोस्टरला जोडे मारुन निषेध केला आहे. मनसेने भैय्याजी जोशीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच जोशी यांना फिरकून देणार नसल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
मुंब्य्रातून मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने मुंब्रातील SDPI कार्यालयावर कारवाई केली आहे. एसडीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष एम के फैजी यांच्या अटकेनंतर हा छापा टाकण्यात आला. मुंब्य्रात दोन दिवसांपूर्वीच ईडीविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. एम. के. फैजींची सुटका न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
ठाण्याच्या वाहतुकीच्या समस्येचा प्रश्न आमदार प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केले. ठाण्याच्या टोईंग वाहने आणि वाहतूक पोलिसांच्या गैरव्यवहाराला प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत वाचा फोडली.
डोंबिवली एमआयडीसी कंपनीत महिलेला मारहाण झाली. या प्रकरणी कंपनीच्या मॅनेजर आणि मुकादमाला मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रणजित आगवलेसह त्याचा साथीदार विजय बेंडल या दोघांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
‘बटेंगे ते कटेंग’ म्हणतात. त्या ‘बटेंगे ते कटेंग’चा अर्थ म्हणजे हिंदू-मुस्लीम नाही. मराठी -अमराठी आणि मराठा आणि अमराठा असा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. सविस्तर वाचा
भैय्याजी जोशी चिल्लर माणूस आहे, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा मी मुख्यमंत्री असताना केला होता. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. सविस्तर वाचा
गुजरात मधील नामे निराली बोटीचा समुद्रात अपघात. समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना हा अपघात झाला.अपघातात पालघरमधील चार मच्छीमार खलाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.अपघातात जीव गमावलेले खलाशी पालघरच्या घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई येथील रहिवाशी आहेत. अक्षय वाघात , अमित सुरम , सुरज वळवी आणि सूर्या शिंगडा असं या चौंघाची नावे आहेत. तर यांसोबतच समुद्रात गेलेल्या अनिल वांगड आणि जलाराम वळवी यांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
विधीमंडळात नवीन कॅबिनेट हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. विधीमंडळाच्या दुसऱ्या मजल्यावर कॅबिनेट हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. या नव्या कॅबिनेट हॉलचं उद्घाटन मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.
विधानसभेत मंत्री जयकुमार गोरेंकडून संजय राऊतांवर हक्कभंगाचा आरोप करण्यात आला आहे. मंत्री जयकुमार गोरेंकडून संजय राऊतांविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. “राऊत माझ्यावर करत असलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. काही आमदारांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचत माझ्या विरोधत गुन्हा दाखल केला. त्यानंतर एका युट्यूब चॅनलकडून माझ्यावर सतत खालच्या पातळीची टीका करण्यात आली” असं म्हणत जयकुमार गोरेंकडून राऊतांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
विधानसभेत धान, कापसाच्या मुद्द्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “शेतकऱ्यांविरोधात जाणाऱ्या कोण आहे ते शोधाव लागेल. शेतकऱ्यांविरोधात जाणाऱ्या अधिकाऱ्याला माफ करू नका” असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. सुधीर मुनगंटीवार सातत्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आले आहेत.त्यामुळे त्यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे.
जलसंपदा विभागाचे निर्णय मोहित कंबोज घेतात, असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला.
भैय्याजी जोशींच्या वक्तव्याचा भाव समजून घ्या, असे घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम म्हणाले.
सतीश भोसलेवर कारवाई झाली पाहिजे असे आमदार सुरेश धस म्हणाले. भोसले कधी कधी भेटतो पण काय उद्योग करतो हे मला माहिती नाहीत, असे धस म्हणाले.
तो सतीश भोसले नाही खोक्या भोसले आहे. हा सुरेश धसांचा एकदम किचन कॅबिनेट कार्यकर्ता आहे. सुरेश धसांचा अर्ज भरताना शंभर गाड्या घेऊन येणारा हा खोक्या भोसले आहे. आता या खोक्या भोसलेचा आक्का कोण?? असा खणखणीत सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
कोणी कितीही प्रयत्न करा, मराठा धनगर वाद होणार नाही. गावखेड्यातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. चूक ही चूकच म्हणतात. चुकीचे समर्थन करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
काल मुख्यमंत्री बोलले CID कडे कुठला पुरावा असा तर अजून यात गुन्हेगार झाले असते परंतु तपास संपला असता तर त्या गोष्टीला मी मान्य केल असत, तपास अजून संपला नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.
जयकुमार गोरे हे ज्युनिअर किरीट सोमय्या असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. जयकुमार गौरेनी नक्कीच हक्कभंग आणावा, महिला प्रकरणात हे तुरुंगात गेले तरी फडणवीस यांना मंत्रीमंडळात घेतले. मंत्री झाल्यावर आता त्या महिलेला त्रास देत आहेत, असा आरोप राऊत करत आहेत.
मुंबईत बाइक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार. एका किलोमीटरसाठी 3 रुपये भाडे हा दर ठरल्याची माहिती.
बाईक टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा आवश्यक असेल. पाठी बसणाऱ्याससुध्दा हेल्मेट बंधनकारक असणार आहे. बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीकडे कमीतकमी 50 दुचाकी वाहने असणं आवश्यक असेल. नोंदणी क्रमाकांची (नंबर प्लेट) पाटी पिवळ्या रंगाची असेल.
भय्याजी जोशींचं कृत्य औरंगजेबापेक्षा भयंकर आहे. जोशी यांच वक्तव्य महाराष्ट्राचा अपमान नाही का ? त्यांचं हे वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे – संजय राऊतांचा संताप.
यवतमाळ – पोलीस पाटील यांच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला, शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल.
जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती. अरुण डुकरे असे जखमी पोलीस पाटलाचे नाव, तर मोरेश्वर सरोदे असे हल्ला करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव
ठाकरेंच्या सेनेचे 3 बडे नेते आज शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सोलापुरातील 2 माजी आमदार, 1 जिल्हाप्रमुखाचा पक्षप्रवेश होणार आहे. कोकणानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंच्या सेनेला गळती…
सातपूर सह पंचवटीत करत होते 20 टक्के व्याजाने धंदा… पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात कोरे धनादेश दस्तऐवज नोटरी केले सप्त… महिलांना आवैधरीत्या पैसे देऊन अतिरिक्त वसुली करणाऱ्या महिलेच्या घरावर छापा… पोलिसांचे उपाय निबंध कार्यालयाने छापा मारून कोरे धनादेश आणि दस्तऐवज केले जप्त… पंचवटीत देखील एका महिला सावकारावर तक्रारीवरून गुन्हा दाखल…
अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार तुर्तास अजित पवार यांच्याकडे सोपावण्यात आलाय… धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर कारभार तुर्तास अजित पवार यांच्याकडे आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज बैठक होणार आहे. शरद पवार, उद्धव
ठाकरे, विजय वडेट्टीवरांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
इगतपुरी शहरातील सह्याद्रीनगर परिसरात घरफोडी. परिसरातील दोन ते तीन घरं चोरट्यांनी फोडली. मात्र घरात काही न भेटल्याने चोरटे आल्या पावली माघारी फिरले. चोरी करायला आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. परिसरातील नागरिकांनी केली पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता. पोलिस गणवेश परिधान करून फिरत असल्याचे फोटो समोर आल्यानंतर या गैरप्रकाराचा वेगळा गुन्हा पोलिस दाखल करण्याच्या तयारीत.
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधान भवनात सलग तीन दिवस त्या गैरहजर राहिल्या. पक्षातील अंतर्गत वादामुळे तसेच साहित्य संम्मेलनातील विधानामुळे टिकेची झोड उठल्याने निलम गोऱ्हे या गैरहजर राहत असल्याची माहिती.
माढ्यातील कुर्डूवाडीत डीजेमुळे 14 तरुणांना बहिरेपणा आलाय. कुर्डूवाडी शहरात मिरवणुकीतील मोठ्या आवाजाचा दुष्परिणाम समोर आला आहे. महापुरुषांच्या जयंतीला कर्णकर्कश डिजे लावण्याची वाईट प्रथा कुर्डूवाडीत रुढ होऊ लागली आहे. डिजेच्या दणदणाटामुळे कुर्डूवाडी. शहर व परिसरातील 14 तरूणांना बहिरेपणा आला असून डॉक्टरांनी त्या तरुणांना श्रवणयंत्र वापरण्यास सांगितले आहे.