
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून केला जात आहे. शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर, वाकड याठिकाणी अजित पवार यांचे इंग्रजीमधून फ्लेक्स लावण्यात आले आहेत. ‘He Promises, He Delivers’ , ‘Action.Works. Speaks. Inspire’, तसंच ‘Happy Birthday to the driving force behind Maharashtra’s progress’ अशा आशयाचे फ्लेक्स झळकत आहेत. अजित पवार शब्दाचे पक्के असल्याचा फ्लेक्सच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार नाही. 22 जुलै ही तारीख कम्प्युटर लिस्टेड दाखवण्यात आली होती. मात्र मुख्य यादीत या तारखेचा समावेश नाही. त्यामुळे आज सुनावणी होणार नाही. नवीन तारीख कोर्टाकडून दिली जाणार आहे. तर दुसरीकडे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिल्यामुळे कमालीचं आश्चर्य व्यक्त होत आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
शाळकरी मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा गावऱ्यांनी भांडाफोड केला आहे. तृतीयपंथीच्या वेशातील तिघांना चोप देऊन गावकऱ्यांना त्यांना वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
लोअर परेल येथे असलेल्या शिवालया हॉल इमारतीच्या दुरुस्ती व नूतरीकरण कामाचा शुभारंभ आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार निधीतून हे काम करण्यात येत आहे. या इमारतीत तळमजल्यावर दवाखाना पहिला मजल्यावर अभ्यासिका व तिसऱ्या मजल्यावर ती सभागृह आहे.
सावली बारची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अंजली दमानिया उद्या कांदिवली येथे जाणार आहेत.
कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण झाल्याने दाखल मनसे नेता अविनाश जाधव पीडित मुलीच्या घरी दाखल झाले आहेत.
जालनातील मंठा तालुक्यातील शिरपूर आणि वडगाव सरहद्द शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उद्या बुधवारी 23 जुलै रोजी कांदिवली येथे जाणार आहे. अंजली दमानिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी कांदिवलीला जाणार आहेत.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारची सत्यता बघण्यासाठी आणि खरी परिस्थिती समजून घेण्यासाठी मी उद्या सकाळी 10 वाजता कांदिवली येथे जाणार आहे,अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.
कल्याण मराठी तरुणी मारहाण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मनसे आणि भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पीडित मुलीच्या घराजवळ जमा झाले आहेत. खासगी रुग्णालयातील मराठी रिसेपशनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाने मारहाणा केली. या प्रकरणात तरुणाला 18 तास उलटल्यानंतरही अटक करण्यात आली नाही. त्यामुळे भाजप आणि मनसे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
आरोपीला चार तासात अटक करा अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने चोप देत अरेस्ट करून पोलिसांच्या ताब्यात देऊ, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
जळगावात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला आहे. यावेळेस शप गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामाची मागणी केली.
कल्याण पूर्व परिसरातील मराठी रिसेप्शन तरुणीला मारहाण प्रकरणी कल्याण डोंबिवलीत वातावरण तापले आहे. आठ तास उलटून देखील आरोपी फरार आहे. मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पीडित मुलीच्या घराजवळ दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार गोपाळ झा हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रीय क्रीडा विधेयकाच्या कक्षेत बीसीसीआय येईल, अशी माहिती मिळत आहे. सरकार या संसदेच्या अधिवेशनात विधेयक आणू शकते. सध्या बीसीसीआय ही स्वायत्त संस्था आहे.
दिल्लीत काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणाले, “जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा याची आम्ही खात्री करू. त्यासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत.”
येमेनमध्ये मृत्युदंडाची वाट पाहत असलेली भारतीय परिचारिका निमिषा प्रियाची लवकरच सुटका होऊ शकते. या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर केए पॉल यांनी दावा केला की निमिषा प्रियाची लवकरच सुटका होऊ शकते. त्यानंतर ती भारतात परत येईल. निमिषाला १६ जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती पण डॉक्टर पॉल आणि भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे ती थांबवण्यात आली.
काँग्रेसच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी मंत्री जयकुमार रावळ यांची भेट घेतली आहे. जयकुमार रावळ यांच्या दोंडाईचा येथील निवासस्थानी शोभा यांनी भेट घेतली. दोन दिवसांपूर्वी दोंडाईचा येथे कार्यक्रमानिमित्त गेले असता मंत्री रावळ यांची भेट घेत चहाही घेतला. मंत्री जयकुमार रावल यांची प्रकृती ठीक नसल्याने दौऱ्यावर आले असताना त्यांनी रावळ यांची भेट घेतली.
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांची समस्या काही केल्या सुटताना दिसत नाहीये. या खड्ड्यांचा फटका वाहनचालकाला बसताना दिसत आहे. नागोठणे जवळील मिरानगर परिसरात महामार्गावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे एक पिकप वाहन थेट खड्ड्यामध्ये अडकलं. अनेकदा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम, दर्जाहीन डांबरीकरण आणि वेळोवेळी देखभालीचा अभाव यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
नालासोपाराच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर सापडला एक संशयास्पद कंटेनर सापडला आहे. मालवाहू जहाजामधून तो समुद्रात पडला असावा आणि तो वाहत आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या कंटेनरमध्ये प्रथमदर्शनी त्यात वॉल पेपर असल्याची माहिती आहे. मात्र पोलिसांनी त्याचा पंचनामा करून तो पूर्ण खोलल्यानंतरच त्यात नेमके काय आहे हे समजणार असल्याचं म्हटलं आहे. सध्या अर्नाळा पोलीस, कोस्टल गार्ड, आणि संबंधित यंत्रणा समुद्र किनाऱ्यावर याचा तपास करत आहेत.
“गिरीश महाजनांमध्ये हिंमत असल्यास माझी चौकशी करावीं. देवेंद्रजींबद्दल मी काहीच आक्षेपार्ह बोललो नाही. प्रफुल लोढांवर आताच कसे गुन्हे दाखल व्हायला लागले आहेत” असं म्हणत एकनाथ खडसे यांनी त्यांची बाजू मांडली आहे.
उज्ज्वल निकम यांनी आम्ही विनंती केली तुम्ही आतापर्यंत जशी ही केस लढलात तशीच पुढे लढावी, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.
जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण सोबत आहोत. आणि ते ही केस पुढे लढतील असा विश्वास आहे. यावर त्यांचा रिप्लाय सकारात्मक वाटला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
इंदोर हैदराबाद महामार्गाच्या बांधीत शेतकऱ्यांच्या आंदोलना प्रसंगी मुक्ताईनगरच्या आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात ताब्यात घेऊन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनमध्ये मोठे गोंधळाचे वातावरण आहे.
नालासोपाराच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद कंटेनर वाहत आला आहे. मालवाहुक जहाजामधून तो समुद्रात पडला असावा आणि तो वाहत आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात आहे. सध्या कंटेनर मध्ये प्रथमदर्शनी त्यात वॉल पेपर असल्याची माहिती आहे. मात्र पोलिसांनी त्याचा पंचनामा करून तो पूर्ण खोलल्या नंतरच त्यात नेमके काय आहे हे समजणार आहे. सध्या अर्नाळा पोलीस, कोस्टल गार्ड, आणि संबंधित यंत्रणा समुद्र किनाऱ्यावर आहे.
ते रमी नाही तर बुद्धिबळ खेळत होते, असा चिमटा जितेंद्र आव्हाड यांनी काढला. हत्ती घोडा येते ते नसून किलावर ,इस्पिक , चौकट आमचा नजर दोष होता महाराष्ट्र चा नजर दोष होता, असा टोला त्यांनी लगावला. राजीनामा मुख्यमंत्रीमंत्र्यांकडे द्यावयाचा असतो राज्यपालकडे नाही, असा टोला त्यांनी माणिकराव कोकाटे यांना लगावला.
शेवटच्या दिवशी मी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि महसूल मंत्र्यावर आरोप केले. त्यांच्या मातोश्रीच्या नावाने असलेला बार आहे, त्यात डान्सबार चालवला जात होता. अश्लील नृत्य केलं जात होतं. पैसे उडवले जात होते. मी सर्व माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली आहे. ही माहिती खोटी असू शकत नाही. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत २२ बारबाला, २२ गिऱ्हाईक आणि चार कर्मचारी यांच्यावर कारवाई केली आहे. बारचे नियम तुडवले गेले आहेत. परंतु याबाबत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं की पत्नीच्या नावाने बार आहे. त्यात डिस्प्युट राहिला नाही, अशी टीका अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर केली.
कल्याणच्या नांदिवली परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाजगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाने मारहाण केली. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नाशिक मध्ये काँग्रेसचे कृषी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन रम्मीचा डाव खेळला आहे. रम्मी मास्टर कृषिमंत्री पोस्टर झळकवत केला निषेध. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोध घोषणाबाजीही केली.
अंबरनाथ येथे एका महिलेचा रुळ ओलांडताना मृत्यू झाला आहे. कानात हेडफोन घालून रूळ ओलांडत असल्यामुळे येणाऱ्या गाडीचा हॉर्न महिलेला ऐकू गेला नाही. महिलेला वाचवायला गेलेल्या तरुणानेही जीव गमावला आहे. अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ ही घटना घडली आहे.
गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर अनेक मंत्री संसद भवनात दाखल झाले आहेत. नितीन गडकरीही पोहोचले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळात दाखल होणार आहेत. वेगवेगळ्या विषयावर कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार आहे.
जेलमधून सुटल्यावर आरोपींनी जंगी सेलिब्रेशन केलं. त्यांना हे सेलिब्रेशन भोवलं आहे. उल्हासनगर पोलिसांकडून ८ ते ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक कारवाईही करणार असल्याचे डीसीपी सचिन गोरे यांनी सांगितलं आहे.
“सरकार हतबल झाले आहे, मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हनी ट्रॅपचा विषय निघाला तर त्यावर कोणी बोलायला तयार नाही, स्पष्टीकरण दिलं जात नाही. काही लोकांनी पुरावे दाखवण्याचे प्रयत्न केला तर त्यांना अटक केली जाते. आज देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा. मात्र काही मंत्र्यांमुळे त्यांची प्रतिमा मलिन होत आहे. कधी तरी निर्णय घेण्याचं धाडस दाखवावं” असं शशिकांत शिंदे म्हणाले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांजा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला. “धनखड यांच्या निरोगी आरोग्याची कामना करतो. जगदीप धनखड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली” अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया आहे.
नालासोपाराच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद कंटेनर वाहत आला आहे. मालवाहतूक करणाऱ्या जहाजामधून तो समुद्रात पडला असावा आणि तो वाहत आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सध्या कंटेनरमध्ये प्रथमदर्शनी त्यात वॉल पेपर असल्याची माहिती आहे. मात्र पोलिसांनी त्याचा पंचनामा करून तो पूर्ण खोलल्या नंतरच त्यात नेमके काय आहे हे समजणार आहे.
माणिकराव कोकाटेंकडे प्रश्नाची उत्तर नव्हती. कोकाटेंना तर धड बोलताही येत नव्हतं असं अंजली दमानिया म्हणाल्या. माणिकराव कोकांटेनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर होत असलेल्या ऑनलाइन रमी खेळण्याच्या आरोपावर स्पष्टीकरण दिलं.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला असून त्यामुळे करडाल मोठा दणका बसला आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शासकीय निवासस्थानाच्या बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्त.
परभणी – तब्बल १२ दिवसांनंतर संस्थाचालक प्रभाकर चव्हाण,पत्नी रत्नमाला चव्हाण यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला फिसवरून केली होती संस्थाचालकांनी मारहाण. मारहाणीनंतर पालक जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या 12 दिवसांपासून संस्थाचालक पती पत्नी फरार फरार होते . अखेर आज पुणे परिसरातून पोलिसांनी चव्हाण दाम्पत्याला ताब्यात घेतल.
उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्या राजीनाम्याने संसदेत गोंधळ माजला असून दोन्ही सभागृहं 12 पर्यंत तहकूब करण्यात आली आहेत.
जगदीप धनगड यांच्या राजीनाम्याने दोन्ही सभागृहात विरोधकांनी सवाल उपस्थित केले .
पुरामुळे जिल्ह्यातील रिसोड – मेहकर,करडा – गोभणी, सरपखेड – धोडप बुद्रुक हे मार्ग झाले बंद… तिन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प… नदी काठावरील गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा…
मोबाईल उघडला तर गेम समोर आला, तो स्कीप होत नव्हता… 30 सेकंद स्कीप होत नाही, तेवढ्या वेळचा व्हिडीओ शूट झाला… संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा, असं मी पत्र देणार… असं वक्तव्य कोकाटे यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांच्यावतीनं फडणवीस दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो… फडणवीस दादांच्या वाढदिवसानिमित्त कृषी समृद्धी योजना लाँच… शेतकऱ्यांसाठीच्या योजना यशस्वी होणार…. शेतकऱ्यांसाठी बियाणं इतर बाबींसाठी अनुदान सुरु करतोय… असं वक्तव्य कोकाटे यांनी केलं आहे.
जळगाव :महामार्गावर राखीचा ट्रक जात असताना मध्येच मोकाट जनावर आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही, यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांना मोठ्या समस्येला समोरे जावे लागत आहे. महामार्गावर सातत्याने असे अपघात घडत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
ठाणे पालिका क्षेत्रामध्ये गेल्या १५ दिवसांमध्ये डेंगुचे ८८, तर मलेरियाचे ५८ रुग्ण आढळले आहेत. ठाणे जिल्हा रुणालयातही जून ते १६ जुलैपर्यंत एकूण मलेरियाचे ११५ तर डेंगुचे ८४ रुग्ण आढळले आहेत. मलेरिया, डेंगीचे प्रमाण वाढत असताना ठाणे शहारांसह जिल्ह्यात ससंर्गजन्य ताप, काविळीचे रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये वाढ झाली आहे.
कृषीमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी सर्कल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. नवापूरमधील शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रमी खेळत कोकाटे यांचा निषेध केला असून, त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. विधान भवनात शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना जर मंत्री बेजबाबदारपणे वागत असतील, तर त्यांना मंत्रिपदावर ठेवू नये, अशी मागणी नवापूरच्या शिवसैनिकांनी केली आहे. कोकाटे यांनी यापूर्वीही अनेकदा शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत, अशा मंत्र्यांना तातडीने सरकारमधून बाहेर काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सरकारने कोकाटे यांना मंत्रिमंडळातून बाहेर न काढल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण रचनेच्या जाहीर झालेल्या आराखड्यावर एकूण १२१ हरकती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे ६८ गट आणि पंचायत समित्यांचे १३६ गण जाहीर झाल्यानंतर, २१ जुलैपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये शेवटच्या दिवसापर्यंत मोठ्या संख्येने हरकती दाखल झाल्या आहेत. विशेषतः चाळीसगाव तालुक्यातून सर्वाधिक ४४ हरकती तर चोपडा तालुक्यातून ४२ हरकती प्राप्त झाल्या आहेत.
याशिवाय, जामनेरमधून ६, मुक्ताईनगरमधून ११, रावेरमधून १०, तर यावल आणि भुसावळ तालुक्यातून प्रत्येकी एक हरकत दाखल झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील सात तालुक्यांतून एकही हरकत प्राप्त झालेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची या हरकतींच्या प्रक्रियेने सुरुवात झाली आहे. ज्यामुळे स्थानिक राजकारणात आता हालचालींना वेग येणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप युतीत निवडणूक लढवणार असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) किती जागा द्यायच्या यावर सध्या विचारमंथन सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन चालावे, असे स्पष्ट आदेश दिल्लीतून महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मिळाल्याचे समजते. मुंबई मनपा निवडणुकीसह इतर निवडणुकाही एकत्र लढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महायुती एकत्र लढल्यास ठाकरे गटाला मुंबईत ४० ते ४५ जागा मिळण्याची शक्यता आहे, मात्र भाजप आणि शिंदेसेना स्वतंत्र लढल्यास मतविभागणीमुळे ठाकरे गटाला ६० ते ६५ जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते. ठाकरे गटाने पुन्हा उभारी घेतल्यास भाजपला मोठा फटका बसू शकतो, जे भाजपला अपेक्षित नाही. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते दिल्लीत एकत्रित रणनीती ठरवण्यासाठी जाणार आहेत.
हिंगोली पोलिसांनी राज्याच्या विविध भागांत दरोडे घालून धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी दरोडेखोरांकडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीवर नंदुरबार, यवतमाळ, नागपूर, लातूर यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या टोळीने सहा दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरातील एका सोन्या-चांदीच्या दुकानावर दरोडा टाकला होता. हिंगोली पोलिसांच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून मुक्ताईनगर सह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. पावसाअभावी शेतातील सोयाबीन, मका आणि इतर पिके अक्षरशः कोलमडून पडली आहेत. विशेषतः मुक्ताईनगर तालुक्यातील सोयाबीन पिकाने मान टाकली असून अनेक ठिकाणी पिके सुकली आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं मोठं संकट ओढवलं आहे.
कासारसाई धरणात बुडून 19 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मावळच्या कासारसाई धरणाच्या जलाशयात बुडून एका 19 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. संतोष राऊत असं त्या मुलाचं नाव असून तो पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी होता.
मणिकराव कोकाटे यांना पुन्हा पक्षाकडून समज देण्याता आला आहे. पक्ष नेतृत्वाने माणिकराव कोकाटे यांना जाब विचारलंय. पक्षाकडून काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र पक्ष नेतृत्व माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याने नाराज आहे. पक्षाकडून माणिकराव कोकाटे यांना जाब विचारल्याची माहिती समोर येत आहे. विरोधी पक्षाचे आमदार रोहित पवारांनी रमी खेळतानाचा वीडियो शेअर केला होता.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या 15 ऑगस्टच्या डेडलाईननंतर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली. फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. ड्रग्स प्रकरणांमध्ये गेली साडेतीन महिन्यापासून फरार असलेले तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणेला पुण्यातुन तर स्वराज उर्फ पिनू तेलंग याला सोलापूरमधून ताब्यात घेतलंय.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी पकडण्यासाठी पोलिसांना 15 ऑगस्टची डेडलाईन दिली होती.
मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरात सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. कोथाळा गावातील सरस्वती नदीला पूर आला आहे. मध्यरात्री पुन्हा पाऊस झाल्याने सरस्वती नदी तुडुंब भरून वाहतेय. दरम्यान चांगला पाऊस झाल्याने परिसरातील खरीप हंगामाला मोठा फायदा झाला असून या परिसरातील शेतकरी सुखावला आहे.
नाशिकमधील हनी ट्रॅपप्रकरणी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ‘त्या’ हॉटेल व्यवसायिकाच्या संस्थांना मदत केली का, याची चौकशी सुरू आहे. हॉटेल व्यवसायिकाच्या जमिनी व्यवहारांबाबत सखोल तपास होणार आहे. महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स आणि संबंध तपासणीच्या चौकटीत आहेत.
अहिल्यानगर- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एकवीस वर्षीय विवाहित महिलेने गुन्हा दाखल केला. पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात होणारे सततचे वाद मिटवण्यासाठी पीडिता ही किरण काळे यांच्या संपर्कात आल्यानंतर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
कोकाटेंच्या व्हिडीओवरून फडणवीस नाराज झाले आहेत. विरोधकांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. कृषीमंत्री कोकाटेंची आज पत्रकार परिषद असून अजितदादांनी कोकाटेंना फोन केला आहे.
आज संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी खासदार झाल्यानंतर प्रथमच विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे उपस्थित राहणार आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील उपस्थित असतील. आरोपीचे सर्व वकील उपस्थित राहणार आहेत. आजच्या या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्र. ४, ५ व ६ या परिसरातील मंजूर विकास आराखड्यानुसार नियोजित रस्त्यांचा विकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांच्यामार्फत करण्यात येत आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.